Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘बोल बोल राणी’ची रिलीज डेट जाहीर; सुबोध, सई आणि चिन्मय १५ वर्षांनंतर एकत्र, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?

सुबोध, सई आणि चिन्मय या तिघांची जोडी तब्बल १५ वर्षानंतर पुन्हा प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. ‘बोल बोल राणी’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार असून, याची रिलीज डेट समोर आली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2026 | 01:46 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘बोल बोल राणी’ची रिलीज डेट जाहीर
  • सुबोध, सई आणि चिन्मय १५ वर्षांनंतर एकत्र
  • कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
 

निर्माते आणि दिग्दर्शक सिड विंचुरकर यांचा आगामी मराठी चित्रपट ‘बोल बोल राणी’सध्या प्रेक्षकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख देखील जाहीर झाली असून येत्या १० जुलै रोजी हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान सोशल मीडियावर रिलीज झालेल्या काही सेकंदांच्या व्हिडिओने प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच वाढवली आहे.

या व्हिडिओमध्ये रहस्य आणि थरार यांचं प्रभावी मिश्रण पाहायला मिळत आहे. खुर्चीत बसलेली एक तरुणी, तिचे बांधलेले हात, पार्श्वभूमीला घोंगावणारं रहस्यमय संगीत आणि अचानक बंदुकीतून सुटलेली गोळी, या सगळ्या दृश्यांमुळे “नेमकं घडलंय तरी काय?” हा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण होत आहे. व्हिडिओमध्ये कथानकाबद्दल कोणताही थेट उलगडा होत नसला, तरी त्यातील अस्वस्थ करणारी शांतता आणि गूढ वातावरण चित्रपटातील थरारक कथानकाची झलक देत आहे.

‘बिग बॉस 19’च्या मेकर्सनी गौरव खन्नाला बनवलं मूर्ख? विनिंग अमाउंटवर धक्कादायक अपडेट

या चित्रपटाचं आणखी एक मोठं आकर्षण म्हणजे १५ वर्षांनंतर सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि चिन्मय मांडलेकर हे तीन दमदार कलाकार एकत्र झळकणार आहेत. या तिघांच्या दमदार अभिनयामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे. त्यांच्यासोबत संभाजी ससाणे हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ही तरुणी नेमकी कोण आहे? तिचे हात का बांधलेले आहेत? गोळी कुणासाठी झाडली गेली? आणि या सगळ्यामागे कोणतं गूढ सत्य दडलं आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे प्रेक्षकांना सिनेगृहात चित्रपट पाहिल्यावरच मिळणार आहेत.

चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक सिड विंचुरकर म्हणाले, “थ्रिलर म्हणजे फक्त भीती दाखवणं नाही, तर प्रेक्षकांच्या मनात प्रश्न निर्माण करणं आणि शेवटपर्यंत त्यांना अस्वस्थ ठेवणं. ‘बोल बोल राणी’चा हा व्हिडिओ त्या प्रवासाचा पहिला टप्पा आहे. प्रत्येक आवाज, प्रत्येक शांतता आणि प्रत्येक दृश्यामागे एक अर्थ दडलेला आहे.”

हास्याचा जबरदस्त डोस! स्टँडअप कॉमेडियन मंदार भिडेची महाराष्ट्र टूर; प्रेक्षकांना खळखळून हसवण्यासाठी सज्ज

न्यूझीलंड मोशन पिक्चर्स आणि बावन्न शुक्रवार यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या या चित्रपटाचे अपूर्व मोतीवाले सहाय, सिड विंचूरकर आणि अमित भानुशाली निर्माते आहेत. तसेच यश मोदी, शब्बीर सबुवाला आणि रचना वोरा सहनिर्माते असून तपन विचारे, यश राम शाहानी आणि आयुष कृप्लानी असोसिएट निर्माते आहेत. संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांचं संगीत लाभलेल्या या चित्रपटात रहस्यमय कथानक, दमदार स्टारकास्ट आणि वेगळ्या मांडणीमुळे ‘बोल बोल राणी’ सध्या मराठी चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरत आहे.

Web Title: Bol bol rani marathi movie release date 10 july subodh bhave sai tamhankar chinmay mandlekar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 01:46 PM

Topics:  

  • entertainment
  • Marathi News
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल
1

Fight Video Goes Viral: कानशिलात, लाथा-बुक्क्या अन् पट्टा… थिएटरमध्ये चाहत्यांचा संताप अनावर, VIDEO व्हायरल

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट
2

Chandrapur News: गिधाडांच्या अस्तित्वावर संकट; मलेरिया आणि भूकबळीमुळे संख्येत चिंताजनक घट

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा
3

Raigad News: दहीहंडीचा असा थरार कधी पाहिलाय? २५ ते ४० फूट उंचीवरून विहिरीत उडी घेत गोविंदा फोडतात हंडी; कुर्डुसची अनोखी परंपरा

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम
4

मीरा-भाईंदरमध्ये दहीहंडीचा थरार! जय महाराष्ट्र, जय मल्हारने रचला आठ थरांचा विक्रम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.