Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोरंजन विश्वात शोककळा; प्राजक्ता माळीच्या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफरने वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अवघ्या 31 व्या वर्षी सिनेमॅटोग्राफर तन्मय राजेंद्र वनमाळी यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. तसेच, या बातमीमुळे मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत शोककळा पसरली आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Mar 11, 2026 | 12:15 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • प्राजक्ता माळीच्या चित्रपटाचा सिनेमॅटोग्राफरचे निधन
  • मराठी आणि हिंदी सिनेमासृष्टीत शोककळा
  • वयाच्या 31 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रतिभावान आणि तरुण सिनेमॅटोग्राफर तन्मय राजेंद्र वनमाळी यांचे अवघ्या 31 व्या वर्षी अकस्मात निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण सिने क्षेत्रात शोककळा पसरली असून अनेक कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अल्पावधीतच आपल्या मेहनत, सर्जनशीलता आणि कॅमेऱ्यामागील वेगळ्या दृष्टीकोनामुळे त्यांनी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती.

तन्मय वनमाळी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर महेश लिमये यांच्या मार्गदर्शनाखाली केली होती. त्यांच्या कामातील बारकावे, फ्रेमिंगची समज आणि दृश्यांना भावनिक स्पर्श देण्याची क्षमता यामुळे ते लवकरच दिग्दर्शक आणि निर्मात्यांच्या पसंतीस उतरले. सहाय्यक तसेच सिनेमॅटोग्राफर म्हणून त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी प्रोजेक्ट्समध्ये काम केले आहे.

‘जिवंत जाळण्याची दिली धमकी…’ अनुराग डोभालचा पर्दाफाश; पेड PR असल्याचा भावाने केले गंभीर आरोप

अभिनेत्री प्राजक्ता माळीच्या ‘फुलवंती’ या चित्रपटासाठी तन्मय यांनी केलेली सिनेमॅटोग्राफी विशेष चर्चेत आली होती. या चित्रपटातील दृश्यरचना आणि कॅमेऱ्याची मांडणी प्रेक्षकांनी आणि समीक्षकांनीही मोठ्या प्रमाणात कौतुकास्पद मानली होती. तसेच ‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटातही त्यांनी महत्त्वाचे काम केले होते. या चित्रपटांमध्ये गश्मीर महाजनी, प्रवीण तरडे आणि स्नेहल तरडे यांसारख्या कलाकारांच्या भूमिका होत्या.

याशिवाय लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘रामायण’ या चित्रपटासाठीही तन्मय यांनी काम केले होते. त्यामुळे त्यांच्या निधनामुळे एक अत्यंत दुःख आणि प्रतिभावान सिनेमॅटोग्राफर गमावल्याची भावना चित्रपटसृष्टीत व्यक्त केली जात आहे. या दुःखद घटनेनंतर वसई परिसरातील नेते हितेंद्र ठाकूर, आमदार क्षितिज ठाकूर तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनीही शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडियावर कलाकार, तंत्रज्ञ आणि चाहत्यांनी तन्मय वनमाळी यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

‘धुरंधर’ आणि ‘टॉक्सिक’च्या भीतीने ‘डकैत’ची रिलीज डेट ढकलली पुढे; आदिवी आणि मृणालचा चित्रपट कधी होणार प्रदर्शित?

तन्मय वनमाळी यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक उभरते, मेहनती आणि अत्यंत प्रतिभावान छायाचित्रकार गमावला आहे. मात्र त्यांच्या कॅमेऱ्यातून साकारलेली दृश्ये आणि त्यांनी केलेले काम प्रेक्षकांच्या स्मरणात कायम राहणार आहे.

Web Title: Prajakta mali phulvanti cinematographer tanmay rajendra vanmali passes away at 31 at vasai worked on ramayana

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • Bollywood
  • entertainment
  • Marathi News

संबंधित बातम्या

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका
1

Sangli : जात प्रमाणपत्र देता की जाता? कोळी समाजाची आक्रमक भूमिका

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक
2

Anshuman Vichare New House: अंशुमन विचारेचं स्वप्नातील घर पाहिलंत का? VIDEO शेअर करत पहिल्यांदाच दाखवली सुंदर झलक

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू
3

Entrainment News: कॉन्सर्टच्या काही तास आधीच काळाचा घाला; ४४ वर्षीय भारतीय गायकाचा दुबईत मृत्यू

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली
4

Raigad News: शार्लोट लेकचा गाळ नदीत सोडल्याने खळबळ! मोरबे धरणाच्या जलसाठ्याला धोका? नवी मुंबई महापालिका संतापली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.