फोटो सौजन्य: iStock
आज सगळीकडे शारदीय नवरोत्रोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. या 9 दिवसात आपल्याला सगळीकडेच देवीचा जागर पाहायला मिळतो. तसेच या शुभ काळात विविध देवीच्या मंदिरात भाविकांची गर्दी होताना दिसते. खरंतर देवीला प्रसन्न करण्यासाठी कोणी आरती म्हणतं तर कोणी विविध मंत्रोच्चार करत असतं तर कोणी पूजा आयोजित करतं.
संपूर्ण भारतात आपल्याला देवीचे अनेक मंदिरं पाहायला मिळतील, जिथे नेहमीच भाविकांची गर्दी असते. यातही काही मंदिरांची देवीची आराधना करण्याची पद्धत वेगळी आहे. मात्र, केरळमध्ये एक भद्रकाली मंदिर आहे जिथे भक्त चक्क देवीला शिवीगाळ करून तिची पूजा करतात. हो! तुम्ही बरोबर वाचत आहात. केरळमधील भद्रकाली मंदिरात, भक्त देवीला शिव्या देतात. मात्र, ते असे का करतात? चला याबद्दल जाणून घेऊयात.
Papankusha Ekadashi 2025: पापंकुश एकादशी कधी आहे? जाणून घ्या मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्त्व
दक्षिण भारतातील केरळमध्ये असलेल्या माता भद्रकालीच्या मंदिरात तिच्या उग्र स्वरूपाची पूजा केली जाते. येथे भक्त देवीला शिव्या देतात. परंतु आश्चर्याची गोष्ट म्हणजे या शिव्या अपमान म्हणून नव्हे तर श्रद्धेच्या रूपात दिल्या जातात.
या मंदिरात माता कालीचे भयंकर रूप म्हणेजच भद्रकालीची पूजा केली जाते, ज्यांना स्थानिक लोक कुरुंबा भगवती या नावाने ओळखतात. मंदिरात स्थापित असलेली त्यांची मूर्ती 8 भुजांची असून सुमारे 6 फूट उंच आणि क्रोधमूर्ती स्वरूपात आहे. दरवर्षी मार्च-एप्रिल महिन्यात येथे भरानी उत्सव साजरा केला जातो. या उत्सवात शिव्या, तलवारी आणि देवीची चेतना घेऊन वेढलेला वेलिचपड साधकांचा कार्यक्रम अत्यंत प्रसिद्ध मानला जातो.
Shardiya Navratri 2025: नवरात्रीमध्ये आपल्या राशीनुसार देवीच्या या रूपांची करा पूजा, जाणून घ्या उपाय
असे मानले जाते की रक्तबीजशी झालेल्या युद्धानंतर भद्रकालीचा राग अत्यंत उग्र झाला आणि भक्तांनी तिला शिवीगाळ करून शांत केले, ही परंपरा आजही या मंदिरात चालू आहे.
उत्सव संपल्यानंतर, देवीची मूर्ती चंदनाच्या लेपाने शुद्ध केली जाते. ही परंपरा शांतीचे प्रतीक आहे. मंदिर कनकी नावाच्या महिलेशी देखील संबंधित आहे, जिला भद्रकालीचा अवतार मानले जाते.
भारतातील अशा कित्येक गोष्टी आपल्या देशाला इतर देशांपेक्षा वेगळे बनवते. भारत हा विविधतेचा देश आहे, जिथे अनेक धर्म, परंपरा आणि संस्कृती एकत्रितपणे फुलतात.