फोटो सौजन्य- pinterest
हिंदू धर्मामध्ये एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. यावेळी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी तिथी म्हणजे पापंकुश एकादशीचे व्रत पाळले जाणार आहे. हे व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो. विष्णू भक्तांसाठी हे व्रत अत्यंत पुण्यपूर्ण मानले जाते.
ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार, व्यक्तीला जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्तता मिळते आणि भगवान विष्णूंचा आशीर्वाद मिळतो. पापंकुश एकादशीचे व्रत शारदीय नवरात्र आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पाळले जाते. त्यामुळे यावेळी हे व्रत 3 ऑक्टोबर रोजी पाळले जाणार आहे. जाणून घ्या पापंकुश एकादशी कधी आहे, पूजा पद्धत आणि महत्त्व.
पापकुंश एकादशी तिथीची सुरुवात गुरुवार, 2 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7.10 वाजता सुरू होणार आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवार 3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6.32 वाजता या तिथीची समाप्ती होईल. उद्यतिथीनुसार पापकुंश एकादशी व्रत शुक्रवार, 3 ऑक्टोबर रोजी पाळले जाईल. यावेळी पूजा करण्यासाठी मुहूर्त सकाळी 6.15 ते 10.41 राहील.
या दिवशी सकाळी ब्रम्ह मुहूर्तावर उठून आवरुन घ्यावे. त्यानंतर घरातील देव्हारा स्वच्छ करुन भगवान विष्णूंच्या मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. नंतर कलशाची स्थापना करुन त्यावर पाणी, आंब्याची पाने आणि नारळ ठेवा. पूजा झाल्यानंतर विष्णु सहस्रनाम किंवा “ओम नमो भगवते वासुदेवाय” या मंत्राचा जप करावा. तुळशीची पाने, पिवळी फुले, धूप, दिवे, फळे, पंचामृत आणि मिठाईचा भगवान विष्णू यांना नैवेद्य दाखवावा. नंतर भगवान विष्णूंची आरती करुन मंत्रांचा जप करावा.
पापकुंश एकादशीच्या व्रताचे पालन केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि पापांपासून सुटका होते. पापंकुश एकादशीचे व्रत करणाऱ्या भक्तावर भगवान विष्णूंचा आशीर्वाद राहतो. या दिवशी दान धर्म करण्याला देखील विशेष महत्त्व आहे. जो व्यक्ती हे व्रत करतो त्या व्यक्तीला मृत्यू आणि नरकाच्या भीतीपासून सुटका होते आणि भक्ताला मोक्ष मिळतो.
या दिवशी धान्य, तांदूळ, उडीद, मसूर, हरभरा आणि मांसाहारी पदार्थ शक्यतो खाण्याचे टाळावे.
राग, खोटेपणा आणि नकारात्मक विचार टाळावेत.
एकादशीच्या दिवशी गरीब आणि गरजूंना दान करा
पापंकुश एकादशीचे व्रत पाळल्याने पापांचे निर्मूलन होते आणि जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते. त्याचप्रमाणे भगवान विष्णूची भक्तिभावाने पूजा केल्याने या लोकात आणि परलोकातही शुभ फळे मिळतात.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)