स्वयंवरात द्रौपदीने कर्णाला सूतपुत्र म्हणून का हिणवलं ? हे सूतकुल म्हणजे नक्की काय ?
महाभारत म्हटलं की आठवतात ते कौरव, पांडव, द्रौपदी आणि पांडवांची सारखी श्रीकृष्ण त्याचंबरोबर आठवतो तो दानशूर सूतपुत्र कर्ण. सुदामा आणि श्रीकृष्णाच्या मैत्रीचे जसे गोडवे गायले जातात तसंच महाभारतात दुर्यौधन आणि कर्णाच्या मैत्रीचे दाखले देखील आढळतात. सूतपुत्र म्हणून हिणवल्या गेलेल्या कर्णाचा पराक्रम आणि प्रामाणिक निष्ठा ही कौरवांबरोबर विशेष:त दुर्योधनाबरोबर कायमच होती. दानशूर असलेला कर्ण मायाळू असण्याबरोबर मोठा प्रराक्रमी राजा देखील होता. पुराणकथांनुसार अंगप्रेदशाची सत्ता असलेला राजा असा हा अंगराज म्हणजे कर्ण.
थोर पराक्रम युद्ध, निती, चंपानगरीचं स्वामीत्व आणि दानशूर व्यक्तीमत्त्व असून ही कर्णाला द्रौपदीच्या स्वयंवरात झालेला अपमान सहन करावा लागला. याज्ञसेनी द्रुपद राजाची राज कन्या द्रौपदीच्या स्वयंवराला विविध देशाच्या राजांनी आपल्या धाडसी आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मत्स्यभेद करण्यास धनुष्य पेलण्याचा प्रयत्न केला मात्र ते कोणालाही जमलं नाही. या सगळ्या देशांच्या वीरांच्या प्रयत्नांनंतर हे आपलं साहस दाखवण्यास कर्ण सज्ज झाला. राजसभेतील स्वयंवरासाठी आलेल्या कोण्या राजाला जमणार नाही असं बळ राधेय कर्णामध्ये होतं.
आपल्या पराक्रमी आणि बलवान बाहुंनी धनुष्याचा बाण मारण्यासाठी नेम धरणार तोच द्रुपदकन्या याज्ञसेनी द्रौपदीने मी सूतपुत्र कर्णाला वरणार नाही असे सांगितले. तिचं वक्तव्य लखलखत्या वीजेसारखं लख्ख होतं. द्रुपदकन्या द्रौपदी पुढे असंही म्हणाली की, स्वयंवरास येणारे युवराज हे राजघराण्यातील आहेत. कर्णाने आजवर किती ही साहस, पराक्रम गाजविला असला किंवा पंचक्रोशीत त्याची कितीही किर्ती असली तरी कर्ण राजघराण्यातील नव्हे तर सूत कुलातील आहे. या सुतकूलातील कर्णाला मी माझा वर म्हणून कधीही स्विकारणार नाही. धनुष्यातून बाण बाहेर पडून छातीत आरपार जावा आणि संपूर्ण शरीर रक्ताच्या थारोळ्यात पडावं तशी अवस्था भरसभेत अपमानित झालेल्या कर्णाची झाली होती.
कर्णाला कायमच सूत पुत्र म्हणून हिणवलं गेलं. या सूतकुलाचा अर्थ पुरणातील ग्रंथांमध्ये दिलेला आहे. ब्राम्हण माता आणि क्षत्रिय पिता यांच्या पोटी जन्मेलेली पिढी ही सूतकुलातील पिढी म्हणून ओळखली जाते. कुंती सूर्य़देवांकडून वर मागितल्यानंतर तिला झालेली पुत्र प्राप्ती म्हणजे कर्ण. विवाहाआधीच झालेल्या पुत्राचा जन्म म्हणून भयभीत झालेल्या कुंतीने गंगेच्या प्रवाहात कर्णाला सोडून दिले. त्यानंतर सुतकुलातील अधिरथ आणि राधाईने कर्णाचा सांभाळ केला.
पुराणात या सूतकुलाचे कार्य देखील सांगितले गेले होते. सुतकुलातील पिढीने राजांच्या कथा सांगणे, पुराणकथांचे वाचन व निवेदन, युध्दांच्या आख्यायिका सांभाळणे, रथ चालवणे अशी कामं करावीत. व्यवसायाने रथ तयार करणाऱ्या सूतकुलातील अधिरथ आणि राधाईने कर्णाचं पालकत्त्व स्विकारलं होतं म्हणून कर्णाला सूतपुत्र म्हणून ओळख होती. त्याच्या धाडसाच्या आणि पराक्रमाच्या आड कायमचं कुलाचं इतिहास येत होता. कर्णाला सांभाळणारी राधाई आणि त्याचा पालनकर्ता अधिरध यांच्यामुळे कर्णाला राधेय असं देखील म्हटलं जातं याचा संदर्भ हा पुराणकथांमध्ये आहे.