Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gudi Padwa 2025: हिंदू नववर्षाला गुढीपाडवा का म्हणतात? जाणून घ्या या दिवशी का उभारली जाते गुढी

महाराष्ट्रामध्ये हा सण गुढीपाडवा आणि नवसंवत्सर म्हणून ओळखला जातो. गुढीपाडव्याच्या दिवशी अनेकजण प्रसाद म्हणून कडुलिंबाची पाने खाऊन तो साजरा करतात. जाणून घ्या हिंदू नववर्षाला गुढीपाडवा का म्हणतात

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Mar 27, 2025 | 12:31 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:

हिंदू नववर्ष चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून सुरू होते. चैत्र नवरात्रीलाही या दिवसापासून सुरुवात होते. याशिवाय महाराष्ट्रात गुढीपाडवा आणि सिंधीमध्ये चेटीचंद म्हणून साजरा केला जातो. मुख्यतः महाराष्ट्र आणि हिंदी भाषिक भागात हा सण गुढीपाडवा आणि नवसंवत्सर म्हणून ओळखला जातो.

पण गुढीपाडवा म्हणजे काय आणि या दिवशी लोक गुढी उभारुन तिची पूजा का करतात आणि या दिवसाला गुढी पाडवा का म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? यंदा कधी आहे गुढीपाडवा आणि त्याचे महत्त्व जाणून घेऊया

या दिवशी साजरा केला जाणार गुढीपाडवा

हिंदू पंचांगानुसार, चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथी शनिवार, 29 मार्च रोजी दुपारी 4.27 वाजता सुरू होईल. त्याचवेळी, तो दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवार, 30 मार्च रोजी दुपारी 12:49 वाजता संपेल. हिंदू धर्मात उदय तिथी वैध असल्याने त्यामुळे गुढीपाडवा हा सण रविवार, 30 मार्च रोजी साजरा होणार असून विक्रम संवत 2082 ची सुरुवातही 30 मार्चपासून होणार आहे.

Mahabharat: भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाचे 100 गुन्हे का माफ केले?

गुढीपाडवाचा अर्थ काय

गुढीपाडवा हा दोन शब्दांपासून बनलेला आहे, ज्यामध्ये गुढी म्हणजे विजयाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे विजयाचा ध्वज. गुढीपाडव्याच्या दिवशी मराठी समाज गुढी बनवतो, तिची पूजा करतो आणि घराजवळ उंच ठिकाणी ठेवतो.

कसा तयार झाला पाडवा शब्द

चैत्र प्रतिपदेनंतर चंद्र कलेकलेने वाढत जातो. त्यामुळे या दिवसाला पाडवा म्हणतात. ‘पडव’, ‘पाडवो’ या शब्दापासून नंतर पाडवा हा शब्द तयार झाला असावा, असे म्हटले जाते. चैत्र महिन्यानंतर शेतकरी पेरणीसाठी शेत तयार करण्याच्या कामाला सुरुवात करतात. गुढीपाडव्याच्या दिवशी निसर्गाचे आभार मानले जातात आणि गुढी उभारली जाते.

घराच्या प्रवेशद्वारावर गुढी का उभारावी

गुढीपाडव्याच्या दिवशी बहुतेक मराठी घरांमध्ये गुढी दारात उभारलेली दिसते. खरे तर यामागे एक प्रमुख कारण आहे. त्यानुसार, प्राचीन काळी, जेव्हा योद्धे युद्ध जिंकल्यानंतर येतात तेव्हा ते आपल्या घराच्या आणि राजवाड्याच्या गेटवर विजय ध्वज म्हणून राजवाड्यांबाहेर ध्वज फडकावत असत. तेव्हापासून, चैत्र प्रतिपदेच्या दिवसापासून, हिंदू नववर्ष आणि विजय उत्सवाचा भाग म्हणून गुढीची पूजा केली जाते आणि घराच्या दारात किंवा गच्चीवर उभारली जाते.

प्रदोष व्रताच्या दिवशी वारुणी योग तयार होत असल्याने या राशीच्या लोकांना होईल लाभ

गुढीची पूजा कशी करावी

गुढीपाडव्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून दारासमोर गुढी उभारली जाते. त्यानंतर गुढीची पूजा करुन गुढीभोवती आणि घरासमोर रांगोळी काढली जाते. तसेच दारावर फुलांचे तोरण बांधले जाते. गुढीला वस्त्र बांधून त्यावर आंब्याची पाने, बत्ताश्यांची माळ, कडुलिंबाचा टहाळा बांधून त्यावर तांब्याचा कलश ठेवला जातो.

परंपरेनुसार गुढीपाडव्याच्या दिवशी श्रीखंड-पुरी किंवा पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर सायंकाळी सूर्यास्ताच्या वेळी हळदीकुंकू, फुले, तांदूळ इत्यादी अर्पण करून गुढी उतरवली जाते.

(टीप – ही माहिती अभ्यासानुसार देण्यात आली आहे. या लेखातील सर्व माहिती ही वाचनासाठी असून ती तंतोतंत लागू होईल असं नाही. सामान्य ज्ञानासाठी ही माहिती वाचण्यात यावी.)

Web Title: Why is hindu new year called gudi padwa know the significance of raising the gudi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 27, 2025 | 12:19 PM

Topics:  

  • dharm
  • Gudi Padwa
  • Hindu Festival

संबंधित बातम्या

Papankusha Ekadashi 2026: भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय, जाणून घ्या पूजेचे नियम
1

Papankusha Ekadashi 2026: भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी करा हे उपाय, जाणून घ्या पूजेचे नियम

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी
2

Palmistry: दोन्ही तळहात जोडल्यावर अर्धचंद्र तयार होतो का? जाणून घ्या ५ रंजक गोष्टी

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी
3

Dev Puja Rules: सायंकाळी देवपूजा करताना दिवा, मंत्रजप आणि नैवेद्याचे काय आहेत नियम? जाणून घ्या महत्त्वाच्या गोष्टी

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान
4

Shri Madhvacharya: द्वैत वेदान्ताचे प्रवर्तक श्रीमध्वाचार्य कोण होते? जाणून घ्या जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.