Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

1 November Dinvishesh: आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची जयंती; जाणून घ्या १ नोव्हेंबरचा इतिहास..

1 November Dinvishesh: आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जयंती आहे. ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि पुरोगामी विचारवंत होते.  त्यांनी आयुष्यभर समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधात लढा दिला.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 01, 2026 | 11:36 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

1 November Dinvishesh: आज डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा जयंती आहे. ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध समाजसुधारक, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि पुरोगामी विचारवंत होते.  त्यांनी आयुष्यभर समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा, जादूटोणा आणि भोंदूगिरीविरोधात लढा दिला. व्यवसाय डॉक्टर असूनही त्यांनी सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीसाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतले होते. त्यांनी ‘साधना’ या साप्ताहिकाचे संपादक म्हणून काम करत तरुणांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी मोठे योगदान दिले. महाराष्ट्रात ‘अंधश्रद्धा विरोधी कायदा’ (जादूटोणा विरोधी कायदा) मंजूर व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने आणि कठोर प्रयत्न केले. २० ऑगस्ट २०१३ रोजी पुण्यामध्ये त्यांची हत्या झाली; त्यांच्या या बलिदानानंतर महाराष्ट्र शासनाने अंधश्रद्धा विरोधी अध्यादेश जारी केला.

१ नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1683 : छत्रपती संभाजी राजे यांच्या फौजेने फोंडा येथे अद्वितीय पराक्रम करून पोर्तुगीजांचा अनोखा पराभव केला.
  • 1755 : भूकंप आणि सुनामीने पोर्तुगालमधील लिस्बन शहर पूर्णपणे उद्ध्वस्त केले.
  • 1870 : युनायटेड स्टेट्सच्या हवामान विभागाने पहिला अधिकृत हवामान अंदाज जारी केला.
  • 1845 : मुंबईत आधुनिक पाश्चात्य पद्धतीचे वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या आद्य ग्रँट मेडिकल कॉलेज या पहिल्या वैद्यकीय महाविद्यालयाचा प्रारंभ झाला.
  • 1848 : महिलांसाठी पहिले वैद्यकीय महाविद्यालय बोस्टन, मॅसॅच्युसेट्स, यूएसए येथे उघडण्यात आले. नंतर ते बोस्टन विद्यापीठात विलीन करण्यात आले.
  • 1925 : गोविंदराव देशमुखांच्या अध्यक्षतेखाली मध्यप्रांत वऱ्हाडातील स्वराज्य पक्षाच्या तिन्ही प्रांतिक समित्यांची एक अनौपचारिक संयुक्त बैठक झाली.
  • 1928 : हिंदुस्थान सरकारने आपल्याला हवे तसे बदल विधेयकात करून त्याचे कायद्यात रुपांतर केले आणि नवी महसूल संहिता वऱ्हाडात लागू करण्यात आली.
  • 1945 : ऑस्ट्रेलिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 1956 : भारतात भाषिक प्रांतिक रचना अस्तित्वात आली.
  • 1956 : द्विभाषिक मुंबई राज्याची निर्मिती
  • 1956 : आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी कुर्नूल ही त्याची राजधानी होती.
  • 1956 : दक्षिण भारतातील कन्नड भाषिक प्रदेश एकत्र करून कर्नाटक राज्याची निर्मिती झाली.
  • 1956 : केरळ राज्य स्थापना दिन.
  • 1956 : कन्याकुमारी जिल्हा केरळ मधुन तामिळनाडूमध्ये हस्तांतरित करण्यात आला.
  • 1957 : मॅकिनॅक ब्रिज, त्यावेळच्या अँकरेजमधील जगातील सर्वात लांब झुलता पूल, मिशिगनच्या वरच्या आणि खालच्या द्वीपकल्पांना जोडणारा वाहतुकीसाठी खुला झाला.
  • 1966 : पंजाब राज्याची विभागणी पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये झाली.
  • 1968 : मोशन पिक्चर असोसिएशन ऑफ अमेरिकाची चित्रपट रेटिंग प्रणाली अधिकृतपणे सादर केली गेली, जी, एम, आर आणि एक्स या रेटिंगसह उगम पावली.
  • 1973 : म्हैसूर राज्याचे नाव बदलून कर्नाटक करण्यात आले.
  • 1973 : लखदीप, मिनिकॉय आणि अग्निदिव बेटांचे नाव बदलून लक्षद्वीप करण्यात आले.
  • 1981 : अँटिग्वा आणि बारबुडा यांना युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य मिळाले.
  • 1982 : अमेरिकेत मोटारगाड्यांचे उत्पादन करणारी होंडा ही पहिली आशियाई कंपनी बनली.
  • 1993 : मास्ट्रिच करार प्रभावी झाला, औपचारिकपणे युरोपियन युनियनची स्थापना झाली.
  • 1994 : मराठी चित्रपटसृष्टीतील विशेष कामगिरीचा गौरव म्हणून चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व लेखक दिनकर द. पाटील यांची चित्रभूषण पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
  • 1999 : कवी नारायण सुर्वे यांना मध्य प्रदेश सरकारने प्रतिष्ठित कबीर पुरस्काराने सन्मानित केले.
  • 2000 : सर्बिया संयुक्त राष्ट्रात सामील झाला.
  • 2000 : छत्तीसगड हे अधिकृतपणे भारताचे 26 वे राज्य बनले, जे पूर्व मध्य प्रदेशातील सोळा जिल्ह्यांमधून तयार झाले.
  • 2001 : तुर्कस्तान, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा यांनी अफगाणिस्तानवर आक्रमण करण्यासाठी सैन्य पाठवण्याचे मान्य केले
  • 2005 : योगेशकुमार सभरवाल यांनी भारताचे 36वे सरन्यायाधीश म्हणुन कार्यभार सांभाळला.
How to Use AI: NEET, JEE आणि UPSC तयारी आता होणार आणखी सोपी; AI ठरणार विद्यार्थ्यांचा स्मार्ट स्टडी पार्टनर!

१ नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1888 : ‘पुरुषोत्तम श्रीपत काळे’ – चित्रकार, नेपथ्यकार, रंगभूमिविषयक ग्रंथांचे लेखक यांचा जन्म.
  • 1893 : ‘इंदुभूषण बॅनर्जी’ – शीख धर्माचा समग्र इतिहास लिहिणारे आधुनिक बंगाली इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू : 13 नोव्हेंबर 1956)
  • 1918 : ‘शरद गणेश तळवळकर’ – विनोदी अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 2001)
  • 1926 : ‘यशवंत देव’ – संगीत दिग्दर्शक कवी रेडिओ वरील सुगम संगीत विभाग प्रमुख, शब्द प्रधान गायकी चे लेखक यांचा पेण येथे जन्म.
  • 1932 : ‘अरुण बाळकृष्ण कोलटकर’ -कवी यांचा कोल्हापूर येथे जन्म.
  • 1936 : ‘आदर्श सेन आनंद’ -भारताचे 29 वे सरन्यायाधीश
  • 1940 : ‘रमेश चंद्र लाहोटी’ – भारताचे 35वे सरन्यायाधीश यांचा जन्म.
  • 1945 : ‘नरेंद्र दाभोलकर’ – महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 20 ऑगस्ट 2013)
  • 1960 : ‘टीम कूक’ – अॅपल इन्कचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा जन्म.
  • 1963 : ‘नीता अंबानी’ – भारतीय उद्योजीका यांचा जन्म.
  • 1973 : ‘ऐश्वर्या राय’ – अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1974 : ‘वी. वी. एस. लक्ष्मण’ – क्रिकेटपटू यांचा जन्म.
COEP Tech 2026: ‘तंत्रज्ञानाचा वापर मानवजातीच्या विनाशासाठी नव्हे, तर….’ अतिरिक्त सचिव आनंदराव पाटील यांचे आवाहन!

१ नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1873 : ‘दीनबंधू मित्र’ – बंगाली नाटककार यांचे निधन.
  • 1950 : ‘बितीभूषण बंदोपाध्याय’ -जागतिक ख्यातीचे बंगाली साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 12 सप्टेंबर 1894)
  • 1988 : ‘गोविंदस्वामी आफळे’ -ज्येष्ठ राष्ट्रीय कीर्तनकार यांचे पुणे येथे निधन.
  • 1991 : ‘अरुण पौडवाल’ – संगीतकार व संगीत संयोजक यांचे निधन.
  • 1993 : ‘नैनोदेवी’ – ठुमरी, दादरा व गझल गायिका यांचे निधन.
  • 1994 : ‘कॉम्रेड दत्ता देशमुख’ – शेती आणि पाणी विषयाचे तज्ञ, कामगार नेते यांचे निधन.
  • 1996 : ‘ज्युनिअस जयवर्धने’ – श्रीलंकेचे दुसरे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1906)
  • 2005 : ‘योगिनी जोगळेकर’ – लेखिका यांचे निधन. (जन्म : 6 ऑगस्ट 1925)
  • 2007 : ‘एस. अली रझा’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांचे निधन.

Web Title: 1 november dinvishesh history marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • day history
  • dinvishesh

संबंधित बातम्या

Prime Meridian Day : कसा झाला जन्म GMT आणि Time Zones चा? जाणून घ्या पृथ्वीची वेळ ठरवणाऱ्या ‘त्या’ काल्पनिक रेषेबद्दल
1

Prime Meridian Day : कसा झाला जन्म GMT आणि Time Zones चा? जाणून घ्या पृथ्वीची वेळ ठरवणाऱ्या ‘त्या’ काल्पनिक रेषेबद्दल

World Vegan Day  : वेगन अन् शाकाहारीमध्ये नक्की काय फरक आहे? जाणून घ्या वेगन जीवनशैलीचे ‘हे’ 5 मोठे फायदे
2

World Vegan Day : वेगन अन् शाकाहारीमध्ये नक्की काय फरक आहे? जाणून घ्या वेगन जीवनशैलीचे ‘हे’ 5 मोठे फायदे

World Savings Day :  पैशांची बचत कशी करावी? जागतिक बचत दिनानिमित्त जाणून घ्या 50-30-20 चा सुवर्ण नियम
3

World Savings Day : पैशांची बचत कशी करावी? जागतिक बचत दिनानिमित्त जाणून घ्या 50-30-20 चा सुवर्ण नियम

World Cities Day  : काँक्रीटच्या जंगलात निसर्गाचा समतोल कसा राखणार? जागतिक शहर दिनाच्या निमित्ताने विशेष माहिती
4

World Cities Day : काँक्रीटच्या जंगलात निसर्गाचा समतोल कसा राखणार? जागतिक शहर दिनाच्या निमित्ताने विशेष माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.