Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh 4 August: आज आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..

Dinvishesh 4 August: 4 ऑगस्ट रोजी इतिहासामध्ये कोणत्या महत्त्वाच्या घटना घडल्या? आज कोण कोणत्या नामांकित व्यक्तींचा जन्म आणि मृत्यू दिनविशेष आहे? जाणून घ्या सविस्तर...

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 05, 2026 | 09:57 AM
बिबट्या दिवस

बिबट्या दिवस

Follow Us
Follow Us:

Dinvishesh 4 August:  आजचा दिवस जगभरात ‘आंतरराष्ट्रीय बिबट्या दिवस’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश जंगलातील या सुंदर आणि चपळ वन्यजीवाचे संवर्धन करण्याबद्दल समाजात जनजागृती निर्माण करणे हा आहे. बिबट्या हा अत्यंत जुळवून घेणारा प्राणी असून, तो जंगलापासून ते मानवी वस्तीच्या जवळच्या भागातही राहू शकतो. मात्र, जंगलांची होणारी कपात, शिकार आणि मानव-प्राणी संघर्ष यामुळे बिबट्यांच्या अस्तित्वावर मोठा धोका निर्माण झाला आहे. या खास दिवशी बिबट्यांचे नैसर्गिक अधिवास सुरक्षित ठेवणे, त्यांच्या संरक्षणासाठी कडक कायदे लागू करणे आणि त्यांच्याबद्दल लोकांमध्ये असणारे गैरसमज दूर करून सहअस्तित्वाची भावना वाढीस लावणे यांसारख्या गोष्टींवर भर दिला जातो. पर्यावरण आणि अन्नसाखळीचा समतोल राखण्यासाठी बिबट्याचे रक्षण करणे अत्यंत गरजेचे आहे.

४ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1854 : हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली.
  • 1924 : सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1956 : अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.
  • 1983 : थॉमस संकरा हे अपर व्होल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1984 : अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले.
  • 1993 : पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडा वर चार सहकाऱ्यांसह समुद्रसपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंग ला खिंड पार केली. त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
  • 1998 : फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2001 : मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली.
  • 2007 : नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले.

४ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1730 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1761)
  • 1821 : ‘लुई व्हिटोन’ – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1892)
  • 1834 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1923)
  • 1845 : ‘सर फिरोजशहा मेहता’ – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 1915)
  • 1863 : ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर’ – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म.
  • 1894 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑक्टोबर 1978)
  • 1929 : ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडूमधील मृदंगम कलाकार यांचा जन्म.
  • 1929 : ‘किशोर कुमार’ – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1987)
  • 1931 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2002)
  • 1950 : ‘एन. रंगास्वामी’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1961 : ‘बराक ओबामा’ – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1978 : ‘संदीप नाईक’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.
2 August Dinvishesh: पुलेला गोपीचंद यांना राजीव गांधी पुरस्कार प्राप्त; जाणून घ्या २ ऑगस्टचा इतिहास…

४ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
  • 1060 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
  • 1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
  • 1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
  • 1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
  • 1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
  • 2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)
3 August History: आज क्रांतीसिंह नाना पाटील यांचा जन्मदिवस; जाणून घ्या ३ ऑगस्टचा इतिहास..

Web Title: 4 august history birth anniversary international leopard day

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2026 | 08:51 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • History

संबंधित बातम्या

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..
1

World Ozone Day: आज आंतरराष्ट्रीय ओझोन संरक्षण दिन; जाणून घ्या १६ सप्टेंबरचा इतिहास..

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..
2

15 September Dinvishesh: आज आंतरराष्ट्री्य लोकशाही दिवस; जाणून घ्या १५ सप्टेंबरचा इतिहास..

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..
3

Hindi Diwas : आज हिंदी दिवस; जाणून घ्या १४ सप्टेंबरचा इतिहास..

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा
4

Ganeshotsav 2026: १ ली आणि २ री खत्तरगल्ली गणपती का आहेत प्रसिद्ध? जाणून घ्या इतिहास आणि परंपरा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.