Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navaratri 2026: पदव्युत्तर शिक्षण घेतलं, पण निवडली शेतीची वाट! साक्षी मुरवदे यांचा ‘फार्म स्कूल’चा अनोखा प्रयोग

Navaratri 2026: आजवर सुमारे ९०० ते १००० जणांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी सुमारे १५० जणांनी प्रत्यक्ष शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. महिला आणि युवकांनी कृषी क्षेत्राकडे केवळ रोजगाराचे साधन म्हणून नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी म्हणून पाहावे, यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Oct 17, 2026 | 02:35 AM
शेतीच्या शाश्वत उद्याची ‘साक्षी’दार!

शेतीच्या शाश्वत उद्याची ‘साक्षी’दार!

Follow Us
Follow Us:
  • शेतीच्या शाश्वत उद्याची ‘साक्षी’दार
  • मातीच्या ओढीतून घडली उद्योजकतेची नवी वाट
  • आजवर सुमारे ९०० ते १००० जणांना देण्यात आले प्रशिक्षण 
सुनयना सोनवणे / Navaratri 2026: उच्च शिक्षणानंतर सुरक्षित करिअरची वाट निवडण्याऐवजी तिने शेतीशी जोडलेली आपली नाळ जपली. मूळच्या नगर जिल्ह्यातील कुरुंद गावच्या असलेल्या साक्षी मुरवदे यांनी पुणे विद्यापीठातून संख्याशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मात्र, दोन-अडीच एकर शेती आणि दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून संसाराचा गाडा चालवणाऱ्या आई-वडिलांचे कष्ट त्यांनी जवळून पाहिले. शेतीत केवळ उत्पादन घेऊन भागत नाही, तर त्यातून शाश्वत उत्पन्न (Navarashtra Navdurga) मिळणेही तितकेच महत्त्वाचे आहे, याची जाणीव त्यांना झाली. याच विचारातून कृषी व्यवसायांना नवी दिशा देणाऱ्या ‘फार्म स्कूल’ची सुरुवात झाली.

कृषी व्यवसाय शिकवताना केवळ पुस्तकी ज्ञानावर भर न देता प्रत्यक्ष व्यवसायाच्या ठिकाणी प्रशिक्षण देणे, ही फार्म स्कूलची वैशिष्ट्यपूर्ण पद्धत. मशरूम शेती, मधमाशीपालन, मोतीपालन, गांडूळ खत, केशर शेती अशा विविध व्यवसायांचे प्रशिक्षण दिल्यानंतरही साक्षींची जबाबदारी संपत नाही. व्यवसाय सुरू करताना येणाऱ्या अडचणींसाठी एक ते दोन वर्षे मार्गदर्शन आणि उत्पादनाला योग्य दर मिळावा यासाठी बाजारपेठ जोडणीची मदतही केली जाते. कारण त्यांच्या मते, उत्पादन घेणे ही सुरुवात; त्या उत्पादनातून टिकाऊ उत्पन्न मिळवणे, हे खरे यश!

नशिबाने हिरावली ऐकण्याची क्षमता, पण जिद्दीने दिली नवी ओळख! भरतनाट्यम नृत्यांगनेचा प्रेरणादायी प्रवास

आजवर सुमारे ९०० ते १००० जणांना प्रशिक्षण देण्यात आले असून, त्यापैकी सुमारे १५० जणांनी प्रत्यक्ष शेतीपूरक व्यवसाय सुरू केले आहेत. महिला आणि युवकांनी कृषी क्षेत्राकडे केवळ रोजगाराचे साधन म्हणून नव्हे, तर स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी म्हणून पाहावे, यासाठीही त्या प्रयत्नशील आहेत.

ग्रामीण भागापुरता मर्यादित न राहता शहरातील गॅलरी आणि गच्चीवर भाजीपाला पिकवण्याच्या शहरी शेतीकडेही त्यांची वाटचाल सुरू आहे. घरच्या घरी भाजीपाला पिकवण्यापासून कृषी उद्योजकतेपर्यंत शेतीशी नाते जोडण्याच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कृषी क्षेत्रातील या कार्यासाठी साक्षी यांना २०२५-२६ या वर्षाची ‘शरद पवार इन्स्पायर फेलोशिप (कृषी)’ मिळाली आहे.

संख्याशास्त्राने त्यांना आकड्यांची भाषा शिकवली; पण मातीने त्या आकड्यांमागचे कष्ट, स्वप्ने आणि माणसं समजून घ्यायला शिकवलं. स्वतःच्या प्रगतीसोबत इतरांच्याही हातांना आर्थिक बळ मिळावे, या ध्यासातून साक्षींचा प्रवास सुरू आहे. त्यांच्या दृष्टीने शेतीकडे वळणे म्हणजे मागे जाणे नव्हे, तर शेतीला शाश्वत भविष्याकडे नेण्याची नवी वाट निर्माण करणे आहे.

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Web Title: Ahilya nagar girl sakshi murwade chane career and make farming farm scholl navrashtr navdurga 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Navarashtra Navdurga
  • navarashtra special
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा
1

Ketaki Kulkarni: ‘कठीण काळात स्वतःवरचा विश्वासच माझी शक्ती ठरला’; ‘कमळी’ फेम केतकी कुलकर्णीचा प्रेरणादायी खुलासा

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास
2

Navratri Special : “आयुष्यात सतत काहीतरी करत राहायचंय”; मिताली जगताप यांनी सांगितला संघर्षाचा प्रवास

World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख
3

World Spine Day : तासन् तास संगणकासमोर बसणाऱ्यांनी कसा जपावा मणका? त्यासाठी वाचा ‘हा’ विशेष लेख

World Food Day : 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन; भूकमुक्तीचा संकल्प आणि अन्नाची नासाडी रोखण्याची नवी चळवळ
4

World Food Day : 16 ऑक्टोबरला जागतिक अन्न दिन; भूकमुक्तीचा संकल्प आणि अन्नाची नासाडी रोखण्याची नवी चळवळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.