Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August 13 History : आज आचार्य अत्रे यांची जयंती; जाणून घ्या १३ ऑगस्टचा इतिहास..

August 13 History : १३ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वाच्या घटना, तसेच आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्यासह प्रसिद्ध व्यक्तींचे जन्म आणि मृत्यू दिनविशेष सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 13, 2026 | 09:21 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

August 13 History : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ (आचार्य अत्रे) हे मराठी साहित्य, पत्रकारिता, नाटक, चित्रपट आणि राजकारण या क्षेत्रांतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा जन्म आज म्हणजेच १३ ऑगस्ट १८९८ रोजी पुरंदर तालुक्यातील सासवड येथे झाला. त्यांनी आपल्या प्रभावी लेखणीने आणि अमोघ वक्तृत्वाने मराठी जनतेच्या मनावर राज केला. ‘श्यामची आई’ या त्यांच्या चित्रपटाला भारताचा पहिला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार (सुवर्ण कमळ) मिळाला होता. त्यांनी ‘मराठा’ वृत्तपत्राच्या माध्यमातून मराठी पत्रकारितेला एक नवी दिशा दिली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मोलाचे योगदान दिले. १३ जून १९६९ रोजी त्यांचे निधन झाले, परंतु त्यांचे साहित्यिक आणि सामाजिक कार्य आजही अजरामर आहे.

१३ ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1642 : ख्रिश्चन ह्युजेन्स या शास्त्रज्ञाने मंगळाच्या दक्षिण ध्रुवावर बर्फाचे ढिगारे शोधून काढले.
  • 1898 : कार्ल गुस्ताव विट यांनी पृथ्वीजवळचा पहिला लघुग्रह 433 इरॉस शोधला.
  • 1918 : बायरिसचे मोटेर्न वेर्के एजी (बी.एम.डब्ल्यू.) ही सार्वजनिक कंपनी म्हणून स्थापन झाली.
  • 1943 : रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय संचालक म्हणून सी.डी. देशमुखांची नियुक्ती.
  • 1961 : पूर्व जर्मनीने आपल्या नागरिकांचे पश्चिम जर्मनीत स्थलांतर रोखण्यासाठी आपल्या सीमा बंद केल्या. बर्लिनच्या भिंतीचे बांधकाम सुरू झाले.
  • 1991 : कन्नड साहित्यिक प्रा. विनायक कृष्ण गोकाक यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर.
  • 2004 : अथेन्स, ग्रीस येथे 28 व्या ऑलिम्पिक खेळांना सुरुवात झाली.
 Paper Leak: लातूरचे रुग्णालय अन् नीट पेपर फुटीचे कनेक्शन! सीबीआयकडून मोठा गौप्यस्फोट; विद्यार्थ्याच्या उत्तराने खळबळ!

१३ ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1848 : ‘रमेशचंद्र दत्त’ – इतिहासकार, अर्थशास्त्रज्ञ, लेखक, अनुवादक, नागरी सेवक, राजकारणी यांचा जन्म.
  • 1888 : ‘जॉन लोगे बेअर्ड’ – स्कॉटिश अभियंता आणि दूरचित्रवाणी चे संशोधक यांचा जन्म. (मृत्यू : 14 जून 1946)
  • 1890 : ‘त्र्यंबक बापूजी ठोंबरे’ – बालकवी यांचा जन्म. (मृत्यू : 5 मे 1918)
  • 1898 : ‘प्रल्हाद केशव अत्रे’ – लेखक, कवी, शिक्षणतज्ञ, संपादक, राजकीय नेते, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, पटकथालेखक आणि वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 13 जून 1969)
  • 1899 : ‘सर अल्फ्रेड हिचकॉक’ – चित्रपट दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 29 एप्रिल 1980)
  • 1906 : ‘विनायक चिंतामण बेडेकर’ – लेखक व दिग्दर्शक यांचा जन्म. (मृत्यू : 30 ऑक्टोबर 1998)
  • 1907 : ‘बेसिल स्पेन्स’ – स्कॉटिश आर्किटेक्ट यांचा जन्म.
  • 1926 : ‘फिडेल अलेहांद्रो कॅस्ट्रो रूझ’ – क्युबाचे क्रांतिकारक आणि पंतप्रधान यांचा जन्म. (मृत्यू : 25 नोव्हेंबर 2016)
  • 1936 : ‘वैजयंतीमाला’ – चित्रपट अभिनेत्री यांचा जन्म.
  • 1945 : ‘रॉबिन जॅकमन’ – भारतीय-इंग्लिश क्रिकेटर यांचा जन्म.
  • 1956 : ‘रोहिंटन फली नरिमन’ – भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यांचा जन्म.
  • 1963 : ‘श्रीदेवी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म. (मृत्यू : 24 फेब्रुवारी 2018)
  • 1983 : ‘संदीपन चंदा’ – भारताचा 9 वा ग्रँडमास्टर यांचा जन्म.
UPSC CDS 2 परीक्षा २०२६ चे वेळापत्रक जाहीर; १३ सप्टेंबर रोजी होणार परीक्षा, जाणून घ्या महत्त्वाचे नियम आणि तपशील!

१३ ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1795 : ‘अहिल्याबाई होळकर’ – देशातील अनेक महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रातील देवळांचा जीर्णोद्धार करणाऱ्या मालवा राजघराण्याच्या महाराणी यांचे निधन. (जन्म : 31 मे 1725)
  • 1826 : ‘रेने लायेनेस्क’ – स्टेथोस्कोप चे शोधक यांचे निधन. (जन्म : 17 फेब्रुवारी 1781)
  • 1910 : ‘फ्लॉरेन्स नायटिंगेल’ – आधुनिक नर्सिंग शास्त्राचा पाया घालणार्‍या ब्रिटिश परिचारिका यांचा जन्म. (जन्म : 12 मे 1820)
  • 1917 : ‘एडवर्ड बकनर’ – आंबवण्याच्या प्रक्रियेसंबंधी केलेल्या संशोधनाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे जर्मन रसायनशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 20 मे 1860)
  • 1936 : मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचे निधन. (जन्म : 24 सप्टेंबर 1861)
  • 1946 : ‘एच. जी. वेल्स’ – विज्ञानकथांसाठी प्रसिद्ध असलेले इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1866)
  • 1971 : ‘डब्ल्यू. ओ. बेंटले’ – बेंटले मोटर्स लिमिटेड चे संस्थापक यांचे निधन.
  • 1980 : ‘पुरुषोत्तम भास्कर भावे’ – अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक यांचे निधन. (जन्म : 12 एप्रिल 1910)
  • 1985 : ‘जे. विलार्ड मेरिऑट’ – मेरिऑट कॉर्पोरेशनचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 17 सप्टेंबर 1900)
  • 1988 :’ गजानन जागीरदार’ – चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व अभिनेते, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया’चे पहिले संचालक यांचे निधन.
  • 2000 : ‘नाझिया हसन’ – पाकिस्तानी पॉप गायिका यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1965)
  • 2015 : ‘ओम प्रकाश मंजाल’ – हिरो सायकल चे सहसंस्थापक यांचे निधन. (जन्म : 26 ऑगस्ट 1928)
  • 2016 : ‘प्रमुख स्वामी महाराज’ – भारतीय हिंदू नेते यांचे निधन. (जन्म : 7 डिसेंबर 1921)

Web Title: August 13 history birth anniversary death marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • dinvishesh
  • History

संबंधित बातम्या

World Mental Health Day: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या १० ऑक्टोबरचा इतिहास..
1

World Mental Health Day: आज जागतिक मानसिक आरोग्य दिन; जाणून घ्या १० ऑक्टोबरचा इतिहास..

Jayaprakash Narayan punyatithi: आज जयप्रकाश नारायण यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ८ ऑक्टोबरचा इतिहास..
2

Jayaprakash Narayan punyatithi: आज जयप्रकाश नारायण यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ८ ऑक्टोबरचा इतिहास..

Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास
3

Dinvishesh 6 October: आज महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या ६ ऑक्टोबरचा इतिहास

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..
4

World Teachers Day 2026: आज जागतिक शिक्षक दिन: जाणून घ्या ५ ऑक्टोबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.