Birth anniversary of novelist Ranjit Desai; Know the history of April 8 dinvishesh
मराठी साहित्यामध्ये अनेक दिग्गज लेखक आणि कादंबरीकार असून त्यांनी मराठी साहित्य अमृताहून गोड केले आहे. संत वाङमय, कादंबरी, कविता संग्रह यामध्ये अनेक लेखकांनी अजरामर असे लिखाण केले आहे. मराठी साहित्य लेखकांमध्ये रणजित देसाई’ यांनी देखील एक धुव्रपद मिळवले आहे. रणजित देसाई यांच्या कांदबऱ्या आज देखील तरुणाईकडूंन वाचल्या जातात. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील श्रीमान योगी आणि थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावरील स्वामी, या कादंबऱ्यांना मराठी साहित्यविश्वात मानाचे स्थान आहे. त्यांना स्वामीकार या नावाने ही ओळखले जाते १९६४ साली त्यांना ‘स्वामी’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्काराने गौरवण्यात आले. त्याचचबरोबर रणजीत देसाई यांना १९७३ साली पद्मश्री पुरस्कार तर १९९० साली महाराष्ट्र गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. लेखक रणजीत देसाई यांची आज जयंती आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा