Birthday of Mother Teresa who dedicated her life in caring for the poor, sick, and destitute
आज महान समाजसेविका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मदर तेरेसा यांचा जन्मदिवस. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुष्ठरोगी पीडितांच्या, गोरगरीबांच्या लोकांच्या सेवेमध्ये घालवले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना भारतरत्न पुरस्कारही प्रदान करण्यात आला आहे. आज आपण या महान समाजसेविकेच्या आयुष्याची कहानी या लेखातून जाणून घेणार आहोत.
मदर तेरेसा या कॅथलिक होत्या. २६ ऑगस्ट १९१० मध्ये उत्तर मॅलेडोनियाच्या स्कोप्जे शहरात त्यांचा जन्म झाला. त्यांना केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात त्यांच्या निस्वार्थी सेवाभावासाठी ओळखले जाते. मदर तेरेसा यांचे खरे नाव एग्नेश गोंझा बोयाजियू होते.
हिंदू मुस्लीम सौहार्दाचे अनोखे प्रतीक! ‘या’ गावांमध्ये चक्क मशिदींमध्ये विराजमान होतात गणपती बाप्पा
तेरेसा यांचे बालपण खूप आनंदात गेले. त्या अभ्यासातही खूप हुशार होत्या. त्यांनी पुढे जाऊन संत होतील असा विचारही केला नव्हता. त्यांचे वडील व्यापारी होते. यामुळे स्थानिक समाजात त्यांच्या कुटुंबाला मोठा मान होता. पण त्यांच्या वडिलांच्या मृत्यूने त्यांचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले. यावेळी एग्नेस फक्त आठ वर्षांच्या होत्या. याचा त्यांच्या मनावर खूप परिणाम झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबाचे जीवन अत्यंत कष्टात गेले. आर्थिक आणि मानसिक दृष्ट्या त्यांचे कुटुंबा कमकुवत झाले होते.
त्यांचे मन पूर्णपणे धर्मकार्याकडे वळले होते. वयाच्या १८ व्या वर्षी त्यांनी आपले घर सोडले आणि सिस्टर्स ऑफ लोरेटो या ननांच्या संस्थेतमध्ये त्यांनी धार्मिक कार्य सुरु केले. यावेळी त्यांनी भारतात येण्याचा निर्णय घेतला. १९२९ मध्ये त्या भारतात आल्या.त्यांनी कोलकाता येथील शाळेमध्ये त्या शिक्षिका म्हणून कार्यरत झाल्या. कोलकातामध्ये विद्यार्थ्यांना शिक्षण देत असत्यांना त्यांना त्यांच्या झोपडपट्ट्यांमध्ये भूक, आजार आणि असहाय्यनेते तडपणारे लोकांची अवस्था पाहावली नाही.
यामुळे त्यांनी १९४६ मध्ये निराधारांची, गरजू लोकांची सेवा करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी १९४८ मध्ये कॉन्व्हेंट सोडले आणि साध्या पांढऱ्या निळ्या रंगाच्या साडीमध्ये आपली जीवन सुरु केले. त्यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटी ची स्थापना केली. याअंतर्गत त्यांनी अनाथ, बेघर, आजारी, असहाय्य लोकांच्या सेवेचे कार्य सुरु केले. हळूहळू ही संस्था भारतात आणि नंतर जगभरात पसरली. या संस्थेच्या माध्यमातून मदर तेरेसा यांनी जगभरातील हजारो लोकांची सेवा केली.
त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य गरजूंच्या सेवेसाठी अर्पण केले. त्यांच्या या कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांच्या समाजसेवेच्या कार्यात अनेक अडथळे आहे, पण त्यांनी त्यावर मात करत आपले कार्य सुरु ठेवले. दरम्यान ५ सप्टेंबर १९९७ मध्ये त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांचे जाण्यावने अनेक लोकांवर दु:खाचे सावट पसरले होते. त्यांच्या मृत्यूनंतर २०१६ मध्ये व्हेटिकन सिटीने त्यांना संत म्हणून घोषित केले.
अनेक घरं अन् संसार केले उद्ध्वस्त; ऑनलाईन गेमिंग विरोधात केंद्र सरकार झाले ‘सक्त’