हिंदू मुस्लीम सौहार्दाचे अनोखे प्रतीक! 'या' गावांमध्ये चक्क मशिदींमध्ये विराजमान होतात गणपती बाप्पा (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
यंदा गणेश चतुर्थीचा सण 27 ऑगस्ट 2025 रोजी साजरा केला जाणार आहे. यासाठी आता केवळ दोन दिवसच राहिले आहेत. हा सण केवळ भक्ती आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. दरम्यान या सणानिमित्त देशभरात जल्लोष आपल्याला पाहायला मिळतो. याच वेळी हिंदू आणि मुस्लिम धर्मीयांमध्येही ऐक्याची भावना पाहायला मिळते. तसे पाहाता महाराष्ट्रात गेल्या अनेक काळापासून हिंदू-मुस्लिम वाद आहे. पण सणावाराला दोन्ही धर्माचे लोक मतभेद विसरुन एकत्र येतात. दोन्ही धर्माचे लोक आनंदाने एकमेकांचे सण साजरे करतात.
याच हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचे दृश्य महाराष्ट्राच्या दोन गावांमध्ये पाहायला मिळते. येथे मशिदींमध्ये गणपती बप्पांना विराजमान केले जाते.
ऐकून आश्चर्य वाटले असले. पण हे खरे आहे. आज आपण ही अनोखे परंपरा काय आहे, कधी सुरु झाली आणि कुठे हे जाणून घेणार आहोत.
तर महाराष्ट्राच्या कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे अनोखे दृश्य पाहायला मिळते. गेल्या ४० वर्षापासून येथे एक अनोखी परंपरा सुरु आहे. येथील गावांमध्ये मशिंदीमध्ये गणपत्ती बप्पांच्या मूर्ती बसवल्या जातात. हिंदू आणि मुस्लिम नागरिक एकत्र येऊन बप्पाचे थाटामाटात स्वागत करतात, त्यांची पुजा करतात. गेल्या अनेक दशकांपासून ही परंपरा कोल्हापूर आणि सांगलीमध्ये पाहायला मिळते.
तर याची कथाही तिथकीच मनोरंजक आहे. सांगलीच्या वाळवा तहसीलमध्ये गोटखिंडी नावाचे एक गाव आहे. या गावातील मशिदींमध्ये गणपती बप्पाची मूर्ती बसवली जाते. १९६१ मध्ये गोटखिंडीमध्ये गावामध्ये चौकाचौकात गणपती बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
यासाठी अगदी कमी वेळात आणि कमी काळात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी गणपती बप्पाची मूर्ती बाहेरच ठेवण्यात आली होती. पण रात्री अचानक मुसळधार पाऊस सुरु झाला. गणपती बप्पाची मूर्ती पावसात भिजत होती. याच वेळी तिथेच निजाम पठाण नावाच्या मुस्लिम व्यक्तीने बप्पाच्या मुर्ती भिजताना पाहिली.
यानंतर निजामने मुर्तीला मशिदीत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून मूर्ती संपूर्ण गणेशोत्सवादरम्यान मशिदीतच राहिली. लोकांनी या काळात येऊन त्याची पुजाही केली, प्रसादही वाटला. यावेळी मुस्लिम लोकांनीही यामध्ये सहभाग घेतला होता.
परंतु यानंतर १९८६ पर्यंत या अनोख्या आणि दुर्मिळ दृश्य पाहायला मिळाले नाही. १९८६ मध्ये गावातील काही तरुणांनी पुन्हा
या ऐतिहासिक वारश्याची पुनरावृत्ती करण्याचा निर्णय घेतला.
तरुणांनी गणेश मंडळाची स्थापना केली. इलाही पठाण नावाच्या या मुलाला समितीचे अध्यक्ष बनवण्यात आले. तेव्हापासून गोटखिंडमध्ये मशिदीमध्ये बप्पाला विराजमान केले जाऊ लागले. ही ओनेखी परंपरा पाहून आसपासच्या गावातील हिंदू आणि मुस्लिमांनी देखील मशिदीत गणेशमूर्ती ठेवण्यास सुरुवात केली. १९८६ पासून सुरु झालेली ही परंपरा आजही सुरु आहे.
पाताळलोकात केली जाते भगवान गणेशाची पूजा? जाणून घ्या काय आहे याची मनोरंजक कथा