मूकपटातून जीवंत अभिनय साधणारे चार्ली चॅपलिन यांचा वाढदिवस आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवणारे विनोदसम्राट चार्ली चॅपलिन यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले. त्यांचे नाटक शब्द नसले तरी मनाला भावते. मूकपटांच्या काळात त्यांनी केवळ हास्य निर्माण केले नाही, तर समाजातील विषमता, गरिबी आणि मानवी वेदना अत्यंत प्रभावीपणे मांडल्या. ‘ट्रॅम्प’ या त्यांच्या व्यक्तिरेखेतून त्यांनी सामान्य माणसाचे दुःख आणि संघर्ष जिवंत केले.
बालपणात प्रचंड हालअपेष्टा सहन करत मोठे झालेल्या चॅपलिन यांनी आपल्या कलेतून जीवनातील कटू सत्य मांडले. City Lights, Modern Times आणि The Kid सारख्या चित्रपटांतून त्यांनी हास्य आणि अश्रू यांचे अनोखे मिश्रण साकारले. त्यांच्या अभिनयात शब्द नव्हते, पण भावना बोलक्या होत्या. प्रत्येक हालचालीतून त्यांनी माणुसकीचा संदेश दिला. त्यामुळेच चॅपलिन हे केवळ कलाकार नव्हते, तर मानवतेचे दूत ठरले. आजही त्यांचे चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी आणि ओठांवर हसू येते हेच त्यांच्या कलेचे खरे यश आहे. (Dinvishesh)
16 एप्रिल रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
16 एप्रिल रोजी जन्म दिनविशेष
16 एप्रिल रोजी मृत्यू दिनविशेष






