
Image
Dinvishesh 12 October: आज जागतिक स्थलांतरित पक्षी दिवस आहे. हा दरवर्षी दोन वेळा साजरा केला जातो – एकदा मे महिन्यात आणि एकदा ऑक्टोबर महिन्यात. हा दिवस स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संरक्षणाची महत्त्वाची जाणीव करून देतो. स्थलांतर करणारे पक्षी आपल्या जगात महत्त्वाची भूमिका बजावतात, कारण ते वातावरणातील बदल, हवामान आणि परिसंस्था यांचा संकेत देतात.
या दिवसाच्या माध्यमातून जागतिक स्तरावर पक्ष्यांच्या स्थलांतराच्या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी, त्यांची निवासस्थानं, अन्नाची कमतरता, आणि मानवी हस्तक्षेपामुळे निर्माण होणारे धोके यावर लक्ष केंद्रित केले जाते.