Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : संजय गांधी यांचा विमान अपघातात दु्र्दैवी अंत; जाणून घ्या २३ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज भारतीय इतिहासातील सर्वात वेदनादायी दिवस आहे. आजच्या दिवशी इतिहासात भारताच्या राजकारणाची संपूर्ण समीकरणे बदलनू गेली होती. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपुत्र संजय गांधी यांचा विमान अपघातात मृत्यू झाला होता. तसेच १९८५ मध्ये एअर इंडियाच्या विमानाने ३२९ जणांचा बळी घेतला होता.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 23, 2026 | 08:49 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : आज २३ जून भारतीय इतिहासातील अत्यंत वेदनादायी दिवस आहे. आजच्या दिवशी तब्बल ४६ वर्षापूर्वी देशाच्या राजकराणाची समीकरणे बदलून गेली होती. २३ जून १९८० रोजी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे धाकटे सुपुत्र संजय गांधी यांचे विमान अपघातात दुर्दैवी अंत झाला होता. संजय गांधी यांच्याकडे कॉंग्रेस पक्षाचे उदयोन्मुख नेते आणि इंदिरा गांधी यांचे वारसदार म्हणून पाहिले जाते होते. परंतु त्यांच्या निधानाने संपूर्ण राजकारणाची दिशा बदलून गेली.

याच दिवशी २३ जून १९८५ रोजी एक भीषण विमान दुर्घटना घडली होती. ज्यामध्ये एकूण ३२९ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. एअर इंडियाचे विमान आयर्लंडच्या किनाऱ्याजवळ कोसळले होते. विमान लंडनच्या हिथ्रो विमानतळापासून केवळ ४५ मिनिटांच्या अंतरावर असताना हा दुर्दैवी अपघात घडला. हा अपघात जगातील सर्वात भयंकर अपघातांपैकी एक मानला जातो.

23 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1757 : प्लासी येथे रॉबर्ट क्लाइव्हच्या 3000 सैन्याने सिराज उददौलाच्या 50000 सैन्याचा पराभव केला.
  • 1868 : क्रिस्टोफर लॅथम शोल्स यांना टाइपरायटरच्या शोधासाठी पेटंट देण्यात आले.
  • 1894 : आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची पॅरिसमध्ये स्थापना झाली.
  • 1969 : आय.बी.एम. ने जानेवारी 1997 मध्ये सॉफ्टवेअर आणि इतर सेवांच्या किंमती वाढतील अशी घोषणा करण्यात आली, त्यामुळे आधुनिक सॉफ्टवेअर उद्योग सुरू झाला.
  • 1979 : इंग्लंडला 92 धावांनी हरवून वेस्ट इंडीजने दुसरा क्रिकेट विश्वकरंडक जिंकला.
  • 1985 : एअर इंडियाच्या कनिष्क बोईंग 747 विमानाचा दहशतवादी बॉम्बमुळे स्फोट झाला, 329 ठार.
  • 1996 : ‘शेख हसीना वाजेद’ बांगलादेशच्या पंतप्रधान बनल्या.
  • 1998 : दुसर्‍या महायुद्धात जपानच्या शरणागतीची साक्षीदार असलेली यू. एस. एस. मिसुरी ही युद्धनौका निवृत्तीनंतर पर्ल हार्बर बंदरात दाखल झाली.
  • 2016 : युनायटेड किंग्डम ने 52% ते 48% मतदान होऊन युरोपियन युनियनला सोडले.
Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास

23 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1763 : ‘जोसेफिन’ – फ्रान्सची सम्राज्ञी यांचा जन्म.
  • 1877 : ‘नॉर्मन प्रिचर्ड’ – भारतीय-इंग्लिश अभिनेते यांचा जन्म. (मृत्यू: 31 ऑक्टोबर 1929)
  • 1901 : ‘राजेन्द्र नाथ लाहिरी’ – क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू: 17 डिसेंबर 1927)
  • 1906 : ‘वीर विक्रम शाह त्रिभुवन’ – नेपाळचे राजे यांचा जन्म. (मृत्यू: 13 मार्च 1955)
  • 1912 : ‘अ‍ॅलन ट्युरिंग’ – इंग्लिश गणितज्ञ आणि संगणकतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 7 जून 1954)
  • 1916 : ‘सर लिओनार्ड हटन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचा जन्म. (मृत्यू: 6 सप्टेंबर 1990)
  • 1934 : ‘वीरभद्र सिंह’ – भारतीय राजकारणी व हिमाचल प्रदेशाचे माजी मुख्यमंत्री यांचा जन्म.
  • 1935 : ‘राम कोलारकर’ – मराठी लेखक यांचा जन्म.
  • 1936 : ‘कॉस्टास सिमिटिस’ – ग्रीक पंतप्रधान यांचा जन्म.
  • 1942 : ‘जब्बार पटेल’ – दिग्दर्शक यांचा जन्म.
  • 1948 : ‘नबरुण भट्टाचार्य’ – भारतीय पत्रकार आणि लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 31 जुलै 2014)
  • 1952 : ‘राज बब्बर’ – भारतीय चित्रपट अभिनेते, राजकीय नेते यांचा जन्म.
  • 1972 : ‘झिनेदिन झिदान’ – फ्रेंच फुटबॉलपटू यांचा जन्म.
  • 1980 : ‘रामनरेश सरवण’ – वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
23 जून रोजी मृत्यू दिनविशेष
  • 79 : 79ई.पुर्व : ‘व्हेस्पासियन’ – रोमन सम्राट यांचे निधन. (जन्म : 17 नोव्हेंबर 0009)
  • 1761 : ‘बाळाजी बाजीराव पेशवे’ – यांचे निधन. (जन्म : 8 डिसेंबर 1721)
  • 1836 : ‘जेम्स मिल’ – स्कॉटिश तत्त्ववेत्ते, इतिहासकार व अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन. (जन्म : 6 एप्रिल 1773)
  • 1891 : ’ विल्यम एडवर्ड वेबर’ – जर्मन भौतिकशास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1914 : ‘भक्तिविनोद ठाकूर’ – भारतीय गुरु आणि तत्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 2 सप्टेंबर 1838)
  • 1939 : ‘गिजुभाई बधेका’ – आधुनिक बालशिक्षण क्षेत्रातील कार्यकर्ते यांचे निधन. (जन्म : 15 नोव्हेंबर 1885)
  • 1953 : ‘श्यामप्रसाद मुखर्जी’ – भारतीय जनसंघाचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 6 जुलै 1901)
  • 1975 : ‘प्राणनाथ थापर’ – भारतीय भूसेना प्रमुख जनरल यांचे निधन.
  • 1980 : ‘व्ही. व्ही. गिरी’ – भारताचे माजी राष्ट्रपती, भारतरत्न यांचे निधन. (जन्म : 10 ऑगस्ट 1894)
  • 1980 : ‘संजय गांधी’ – इंदिरा गांधी यांचा मुलगा यांचे विमान अपघातात निधन. (जन्म : 14 डिसेंबर 1946)
  • 1982 : ‘हरिभाऊ देशपांडे’ – नामवंत कलाकार यांचे निधन.
  • 1990 : ‘हरिन्द्रनाथ चट्टोपाध्याय’ – चरित्र अभिनेते यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1898)
  • 1994 : ‘वसंतशांताराम देसाई’ – नाटककार, साहित्यिक यांचे निधन.
  • 1995 : ‘डॉ. जोनस साॅक’ पोलिओची लस शोधणारे शास्त्रज्ञ यांचे निधन.
  • 1996 : ‘रे लिंडवॉल’ – ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म : 3 ऑक्टोबर 1921)
  • 2005 : ‘डॉ. हे. वि. इनामदार’ – साहित्यिक यांचे निधन.
  • 2015 : ‘निर्मला जोशी’ – भारतीय नन, वकील, आणि समाजसेवक यांचे निधन. (जन्म : 23 जुलै 1934)
  • 2020 : ‘निलंबर देव शर्मा’ – पद्मश्री, डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीतील पहिले प्रकाशन केलेले लेखक यांचे निधन.
Dinvishesh : जेष्ठ हिंदी साहित्यिक विष्णू प्रभाकर यांची जयंती; जाणून घ्या २१ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh 23 june sanjay gandhi plane crash and air india disaster

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 23, 2026 | 08:48 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…
1

World Tourism Day 2026: आज जागतिक पर्यटन दिन; जाणून घ्या २७ सप्टेंबरचा इतिहास…

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..
2

Total Elimination of Nuclear Weapons 2026: आज आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र निर्मूलन दिन; जाणून घ्या २६ सप्टेंबरचा इतिहास..

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
3

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
4

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.