Dinvishesh : खलनायकी भूमिकेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे अमरीश पुरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २२ जूनचा इतिहास (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Dinvishesh : आज भारतीय चित्रपटसृष्टीतील खलनायकी भूमिकांना नवी ओळख देणारे जेष्ठ अभिनेते अमरीश पुरी यांचा जन्मदिवस आहे. त्यांनी आपल्या दमदार आवाजाने, प्रभावी अभिनय आणि करारी व्यक्तिमत्त्वामुळे हिंदीचित्रपटसृष्टीसह अनेक भारतीय भाषांतील चित्रपटांमध्ये काम केले आहे. मोगॅम्बो ही त्यांची भूमिका आजही प्रेक्षकांच्या पसंतीस पडते. त्यांचे बॉलीवूडमधील योगदान आजही प्रेक्षकांकडून साजरे केले जाते. अमरीश पुरी बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट खलनायक म्हणून ओळखले जातात. त्यांची उंची, खओल आवाज आणि प्रखर डोळे यांमुळे त्यांची उपस्थिती लगेच जाणवायची. त्यांनी नायक म्हणूनही अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.
22 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
22 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)
1805 : ‘जोसेफ मॅझिनी’ – इटालियन स्वातंत्र्यवीर यांचा जन्म. (मृत्यू: 10 मार्च 1872)
1887 : ‘ज्यूलियन हक्सले’ – ब्रिटिश जीवशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 14 फेब्रुवारी 1975)
1896 : ‘बाबुराव पेंढारकर’ – नटश्रेष्ठ यांचा जन्म.
1899 : ‘रिचर्ड गिर्ली ड्र्यू’ – मास्किंग टेप चे शोधक यांचा जन्म. (मृत्यू: 14 डिसेंबर 1980)
1908 : ‘डॉ. विष्णू भिकाजी कोलते’ – महानुभाव पंथाचे अभ्यासक, विचारवंत व तत्त्वज्ञ, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू यांचा जन्म. (मृत्यू: 9 एप्रिल 1998)
1927 : ‘एन्थोनी लो’ – भारतीय-इंग्लिश इतिहासकार यांचा जन्म. (मृत्यू: 12 फेब्रुवारी 2015)
1932 : ‘अमरीश पुरी’ – आंतरराष्ट्रीय किर्ती प्राप्त केलेले चित्रपट व रंगमंच कलाकार यांचा जन्म. (मृत्यू 12 जानेवारी 2005)
1974 : ‘विजय चंद्रशेखर’ – तमिळ चित्रपट अभिनेते यांचा जन्म.
22 जून रोजी मृत्यू दिनविशेष
1955 : ‘सदाशिव शिंदे’ – लेगस्पिनर व गुगली गोलंदाज यांचे निधन. (जन्म: 18 ऑगस्ट 1923)
1993 : ‘विष्णूपंत जोग’ – चित्रपट अभिनेते यांचे निधन.
1994 : ‘अक्किनेरी लक्ष्मीवर प्रसाद राव’ – चित्रपट निर्माते व दिग्दर्शक यांचे निधन. (जन्म: 17 जानेवारी 1908)
2014 : ‘रामा नारायणन’ – भारतीय दिग्दर्शक आणि निर्माता यांचे निधन. (जन्म : 3 एप्रिल 1949)






