Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 24 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : महात्मा फुले यांनी वंचित समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली; जाणून घ्या ०३ जुलैचा इतिहास

Dinvishesh : आजचा दिवस भारताच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. आजच्या दिवशी महात्मा ज्योतिराव फुले यांनी वंचित समाजातील मुलांसाठी पहिली शाळा सुरु केली होती. त्यांच्या या कार्यामुळे सामाजिक समतेच्या चळवळीला नवी दिशा मिळाली होती.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 03, 2026 | 08:40 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : ०३ जुलै १८५२ रोजी महात्मा ज्योतिराव फुले यांनी समाजातील वंचित आणि दलित मुलांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले करत पहिल्या शाळेची स्थापना केली. त्याकाळी जातिभेदामुळे शिक्षणापासून वंचित असलेल्या मुलांना शिक्षणाची संधी मिळावी असा त्यांचा उद्देश होता. सावित्रीबाई फुले यांनी या कार्यात ज्योतिरावांना मोलाची साथ दिली. यापूर्वी त्यांनी सावित्रबाई फुले यांच्यासोबत मिळून १८४८ मध्ये मुलींच्या शिक्षणासाठी भारतातील पहिल्या शाळेची स्थापना केली होती. शिक्षण हा सामाजिक परिवर्तनाचा पाया आहे हा विचार कृतीत उतरवत फुले दांपत्याने समता, न्याय आणि सर्वांसाठी शिक्षणाचा दरवाजा खुला केला.

०३ जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1608 : सॅम्युअल बी. चॅम्पलेनने कॅनडातील क्विबेक शहराची स्थापना केली.
  • 1850 : ईस्ट इंडिया कंपनीच्या अध्यक्षांनी भारतातून आणलेला कोहिनूर हिरा इंग्लंडच्या राणीला सुपूर्द केला.
  • 1852 : महात्मा फुले यांनी दलित मुलांसाठी पहिली शाळा उघडली.
  • 1855 : भारतात कायदे शिक्षणाचा प्रारंभ झाला.
  • 1884 : शेअर मार्केट मध्ये डाऊ जोन्स इंडेक्स लाँच झाला.
  • 1886 : जर्मनीच्या कार्ल बेंझने यांनी जगातील पहिली मोटारगाडी बनवली.
  • 1890 : ओहायो हे अमेरिकेचे 43 वे राज्य बनले.
  • 1928 : लंडनमध्ये पहिला रंगीत दूरदर्शन कार्यक्रम प्रसारित झाला.
  • 1938 : मॅलार्ड स्टीम इंजिन 202 किमी प्रतितास वेगाने धावले. वाफेच्या इंजिनाचा विक्रम अजूनही आहे.
  • 1962 : फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी अल्जेरियाच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.
  • 1998 : कवी प्रदीप यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर.
  • 2000 : विमानवाहू युद्धनौका विक्रांतचे मुंबईच्या समुद्रातील सागरी संग्रहालयात रूपांतर करण्यास मान्यता.
  • 2001 : सुधीर फडके यांना राज्य सरकारचा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर झाला.
  • 2006 : एक्स. पी. 14 हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला.
Dinvishesh : भारत-पाकिस्तानमध्ये शिमला करारावर स्वाक्षरी; जाणून घ्या ०२ जुलैचा इतिहास

०३ जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

  • 1683 : ‘एडवर्ड यंग’ – इंग्लिश कवी यांचे जन्म.
  • 1838 : ‘मामा परमानंद’ – पत्रकार, प्रार्थना समाजाचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू: 13 सप्टेंबर 1893)
  • 1886 : ‘रामचंद्र दत्तात्रय रानडे’ – आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ व संत, फर्ग्युसन व विलींग्डन महाविद्यालयातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक यांचा जन्म. (मृत्यू: 6 जून 1957)
  • 1909 : ‘बॅरिस्टर व्ही. एम. तारकुंडे’ – कायदेपंडित, स्वातंत्र्यसैनिक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश व सर्वोच्‍च न्यायालयात सामाजिक समस्यांसाठी लढा देणारे झुंजार कायदेतज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 22 मार्च 2004)
  • 1912 : ‘श्रीपाद गोविंद नेवरेकर’ – मराठी रंगभूमीवरील लोकप्रिय गायक व नट यांचा जन्म. (मृत्यू : 16 जून 1977)
  • 1914 : ‘दत्तात्रय गणेश गोडसे’ – इतिहासकार, नाटककार, कलादिग्दर्शक, वेशभूषाकार आणि नेपथ्यकार यांचा जन्म. (मृत्यू : 5 जानेवारी 1992)
  • 1918 : ‘व्ही. रंगारा राव’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 18 जुलै 1974)
  • 1924 : ‘सेल्लप्पन रामनाथन’ – तामीळवंशीय राजकारणी, सिंगापूरच्या प्रजासत्ताकाचे 6वे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
  • 1924 : ‘अर्जुन नायडू’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1926 : ‘सुनीता देशपांडे’ – लेखिका स्वातंत्र्य सैनिक यांचा जन्म. (मृत्यू : 7 नोव्हेंबर 2009)
  • 1951 : ‘सररिचर्ड हॅडली’ – न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1952 : ‘अमित कुमार’ – भारतीय गायक यांचा जन्म.
  • 1952 : ‘रोहिनटन मिस्त्री’ – भारतीय कॅनेडियन लेखक यांचा जन्म.
  • 1962 : ‘टॉम क्रूझ’ – प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता यांचा जन्म.
  • 1971 : ‘ज्युलियन असांज’ – विकीलीक्स चे संस्थापक यांचा जन्म.
  • 1976 : ‘हेन्‍री ओलोंगा’ – झिम्बाब्वेचे क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1980 : ‘हरभजन सिंग’ – भारतीय क्रिकेटपटू यांचा जन्म.
  • 1984 : ‘भारती सिंग’ – भारतीय विनोदी कलाकार यांचा जन्म.
०३ जुलै रोजी मृत्यू दिनविशेष
  • 1350 : ‘संत नामदेव’ – यांनी समाधी घेतली. (जन्म : 29 ऑक्टोबर 1270)
  • 1933 : ‘हिपोलितो य्रिगोयेन’ – अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष यांचे निधन. (जम : 12 जुलै 1852)
  • 1935 : ‘आंद्रे सीट्रोएन’ – सिट्रोएन कंपनीचे संस्थापक यांचे निधन. (जन्म : 5 फेब्रुवारी 1878)
  • 1969 : ‘ब्रायन जोन्स’ – द रोलिंग स्टोन्सचे संस्थापक, गिटार, हार्मोनिका आणि पियानो वादक यांचे निधन. (जन्म : 28 फेब्रुवारी 1942)
  • 1996 : ‘राजकुमार’ – हिंदी चित्रपट अभिनेता यांचे निधन. (जन्म : 8 ऑक्टोबर 1926)
Dinvishesh : महाराष्ट्र कृषी दिन; हरित क्रांतीचे जनक वंसतराव नाईक यांची जयंती; जाणून घ्या ०१ जुलैचा इतिहास

Web Title: Dinvishesh 3 july mahatma phule first school history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 08:40 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..
1

August 24 history: आज बहिणाबाई चौधरी यांचा जन्मदिवस; जाणून घ्या २४ ऑगस्टचा इतिहास..

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..
2

August 23 History: आज राष्ट्रीय अंतराळ दिन; जाणून घ्या २३ ऑगस्टचा इतिहास..

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..
3

Natal Indian Congress: आज नॅटल इंडियन कॉंग्रेसचा स्थापना दिवस; जाणून घ्या २२ ऑगस्टचा इतिहास..

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..
4

Dr Narendra Dabholkar death anniversary: आज डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचा स्मृतीदिन; जाणून घ्या २० ऑगस्टचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.