Dinvishesh : महाराष्ट्र कृषी दिन; हरित क्रांतीचे जनक वंसतराव नाईक यांची जयंती; जाणून घ्या ०१ जुलैचा इतिहास (फोटो सौजन्य: नवराष्ट्र टीम)
Dinvishesh : ०१ जुलै हा दिवस महाराष्ट्रात कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रातील हरित क्रांती, श्वेतक्रांती, पंचायत राज आणि रोज हमी सारख्या योजनांमध्ये वसंतराव नाईक यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. शेतकऱ्यांच्या विकासासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण आणि दूरदृष्टीचे निर्णय घेतले. त्यांच्या या कार्याच्या स्मरणार्थ १ ते ७ जुलै दरम्यान राज्यभरात कृषी सप्ताह आयोजित केला जातो. आधुनिक शेतील, तंत्रज्ञानाचा वापर, जलसंधारण आणि शाश्वत कृषी पद्धतींचा प्रसार करुन शेतकऱ्यांना सक्षम करण्याचा याचा उद्देश असतो.
०१ जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
०१ जुलै रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)






