Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : रणरागिणी राणी लक्ष्मीबाईंना इंग्रजांशी लढता लढता वीरगती; जाणून घ्या १८ जूनचा इतिहास

Dinvishesh : आज १८ जून, आजच्या दिवशी भारतीय स्वातंत्र आणि स्वाभिमानासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या राणी लक्ष्मीबाई यांचा आज बलिदान दिन. त्यांचे नाव जरी घेतले तरी डोळ्यासमोर दिसते ती पाठीशी आपल्या बाळाला घेतलेली आणि हातात तलवार घेऊन लढणारी धाडसी स्त्री. ज्यांनी इंग्रजांना आव्हाने देत सळो की पळो करुन सोडले होते.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 18, 2026 | 09:25 AM
Dinvishesh

Dinvishesh

Follow Us
Follow Us:

Dinvishesh : १८ जून, भारतीय स्वातंत्रलढ्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण दिवस. याच दिवशी झाशीच्या राणी मणिकर्णिका तांबे उर्फ राणी लक्ष्मीबाई यांना इग्रजांविरुद्धच्या लढाईत वीरमरण आले. ग्वाल्हेर येथे ब्रिटिश सैन्याशी झालेल्या संघर्षात त्यांनी अतुलनीय शौर्य दाखवले. ब्रिटिश अधिकारी स्मिथच्या नेतृत्त्वात सैन्याने ग्वाल्हेरवर आक्रमकण केले होते. यावेळी राणी लक्ष्मीबाईंनी घाबरुन न जाता रणांगणात उतरुन शत्रूचा धैर्याने सामाना केला. तलवारीच्या जोरावर त्यांनी इग्रंज सैनिकांना सळो की पळो करुन सोडले होते. शेवचट्या श्वासापर्यंत त्या लढत राहिल्या. पुरुषवेशामुळे इंग्रज त्यांना ओळखू शकले नाहीत. आपला देह शत्रूच्या हाती लागू नये अशी त्यांची अंतिम इच्छा होती. त्यांचे अद्वितीय शौर्य आजही अनेक भारतीय महिलांना प्रेरणा देते.

18 जून रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

1776 : महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात ’हळदी घाटा’ ची प्रसिद्ध लढाई झाली.
1815 : वॉटरलूच्या लढाईत नेपोलियनचा दारूण पराभव.
1830 : फ्रान्सने अल्जेरिया ताब्यात घेतला.
1908 : फिलीपिन्स विद्यापीठाची स्थापना झाली.
1930 : चीनचा सम्राट डोवागर लोंग्यू याने देशातील सर्व परदेशी व्यक्तींना ठार करण्याचा हुकूम दिला.
1946 : डॉ. राममनोहर लोहिया यांनी गोव्याच्या मडगाव शहरातून गोवा मुक्तीचे रणशिंग फुंकले.
1956 : रँग्लर र. पु. परांजपे पुणे विद्यापीठाचे दुसरे कुलगुरू झाले.
1981 : प्राण्यांमध्ये पाय आणि तोंडाच्या आजाराविरूद्ध पहिली अनुवांशिक लस विकसित करण्यात आली.
1983 : अंतराळवीर सॅली राइड अंतराळात जाणारी पहिली अमेरिकन महिला बनली.
1987 : एम. एस. स्वामीनाथन यांना पहिला जागतिक अन्न पुरस्कार मिळाला.
2009 : अमेरिकन अंतराळ संस्था नासाने पाण्याचा शोध घेण्यासाठी चंद्रावर एक विशेष उपग्रह पाठवला.
2017 : किदम्बी श्रीकांत भारतीय बॅडमिंटनपटूला इंडोनेशिया सुपर सीरिजचे जेतेपद – इंडोनेशिया सुपर सीरिज प्रिमिअरच्या पुरुष एकेरीत जेतेपद पटकावले, असे करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे.

Dinvishesh : स्वराज्याचे प्रेरणास्थान राजमाता जिजाऊ यांची पुण्यतिथी; जाणून घ्या १७ जूनचा इतिहास

18 जून रोजी जन्म दिनविशेष (Dinvishesh)

1887 : ‘डॉ.अनुग्रह नारायण सिन्हा’ – थोर भारतीय स्वातंत्र्य सेनानी, राजकारणी, शिक्षक, राजनीतिज्ञ, तसचं, बिहार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व वित्तमंत्री यांचा जन्मदिन.
1899 : ‘शंकर त्रिंबक’ तथा ‘दादा धर्माधिकारी’ – स्वातंत्र्यसेनानी व समाजसुधारक यांचा जन्म. (मृत्यू: 1 डिसेंबर 1985)
1911 : ‘कमला सोहोनी’ – पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू: 8 सप्टेंबर 1997)
1931 : ‘के. एस. सुदर्शन’ – प्रखर राष्ट्रवादी व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 5 वे सरसंघचालक यांचा जन्म. (मृत्यू: 15 सप्टेंबर 2012)
1931 : ‘फर्नांडो हेन्रिक कार्डोसो’ – ब्राझील देशाचे समाजशास्त्रज्ञ, प्राध्यापक आणि राजकारणी तसचं, ब्राझील देशाचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म.
1942 : ‘थाबो म्बेकी’ – दक्षिण अफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष यांचा जन्म.
1942 : ‘पॉल मॅकार्टनी’ – संगीतकार, संगीतसंयोजक, वादक, गीतलेखक, बीटल्स चा सदस्य यांचा जन्म.
1987 : ‘मोईन अली’ – इंग्लंड देशाचे महान क्रिकेटपटू यांचा जन्मदिन.

18 जून रोजी मृत्यू दिनविशेष

1858 : झाशीची राणी मणिकर्णिका तांबे ऊर्फ ‘राणी लक्ष्मीबाई’ – इंग्रजांचा पाठलाग टाळण्याच्या प्रयत्‍नात झालेल्या चकमकीत मृत्यूमुखी पडल्या. (जन्म: 19 नोव्हेंबर 1828)
1901 : ‘रामचंद्र भिकाजी गुंजीकर’ – मोचनगड या मराठीतील पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे लेखक आणि विविध ज्ञानविस्तार मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म: 10 एप्रिल 1843)
1902 : ‘सॅम्युअल बटलर’ – इंग्लिश लेखक यांचे निधन. (जन्म: 4 डिसेंबर 1835)
1936 : ‘मॅक्झिम गॉर्की’ रशियन लेखक यांचे निधन. (जन्म: 28 मार्च 1868)
1958 : ‘डग्लस जार्डिन’ – इंग्लिश क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 23 ऑक्टोबर 1900)
1962 : जे. आर. तथा ‘नानासाहेब घारपुरे’ – पुण्याच्या विधी महाविद्यालयाचे संस्थापक आणि प्राचार्य यांचे निधन.
1974 : ‘सेठ गोविंद दास’ – स्वातंत्र्यसैनिक, लोकसभेचे हंगामी सभापती, साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 16 ऑक्टोबर 1896)
1999 : ‘श्रीपाद रामकृष्ण काळे’ – साहित्यिक, कथा आणि कादंबरीकार यांचे निधन.
2003: ‘जानकीदास’ – हिन्दी चित्रपटातील चरित्र अभिनेते यांचे निधन.
2005 : ‘मुश्ताक अली’ – भारतीय क्रिकेटपटू यांचे निधन. (जन्म: 17 डिसेंबर 1914)
2009 : ‘उस्ताद अली अकबर खाँ’ तथा खाँसाहेब – मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक, पद्‌मविभूषण यांचे निधन. (जन्म: 14 एप्रिल 1922)
2020 : ‘लच्छमानसिंग लेहल’ – परम विशिष्ठ सेवा वीर चक्र, मेजर-जनरल, यांचे निधन. (जन्म: 9 जुलै 1923)
2021 : मिल्खा सिंग – पद्मश्री, द फ्लाइंग शीख, धावपटू, यांचे निधन. (जन्म: 8 ऑक्टोबर 1935)

Dinvishesh : आधुनिक अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांचा जन्मदिवस; जाणून घ्या १६ जूनचा इतिहास

Web Title: Dinvishesh queen of jhansi lakshmibai death anniversary 19 june hisotry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 08:49 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..
1

World Bollywood Day: आज जागतिक बॉलिवूड दिन; जाणून घ्या २४ सप्टेंबरचा इतिहास..

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…
2

International Day of Sign Languages: आज आंतरराष्ट्रीय सांकेतिक भाषा दिन; जाणून घ्या २३ सप्टेंबरचा इतिहास…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.