
Din Vishesh
आज ६ डिसेंबर रोजी महामानव आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी आहे. यानिमित्त आज देशभरात या महान समाजसुधारकाला आदरांजली वाहण्यात येथे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित आणि वंचित समाजाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी आपले जीवन समर्पित केले. त्यांनी नेहमीच न्याय, समानता आणि निष्पक्षता या मूल्यांवर आधारित विचार केले. त्यांची शिकवण आजही भारताला प्रेरणा देते. विशेष करुन त्यांनी दलित समुदायातील व्यक्तींना शिक्षणाचा, समानतेने जगण्याचा हक्क मिळवून दिला. यामुळे त्यांच्या कार्याचा सन्मान करण्याठी त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ६ डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. आजच्या दिवशी संपूर्ण भारतात, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी त्यांच्या स्मृती आणि समाजातील योगदानाचा गौरव करतात.
06 डिसेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
1768 : एनसायक्लोपीडिया ब्रिटानिकाचा पहिला अंक प्रकाशित झाला.
1877 : द वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राचे प्रकाशन सुरू झाले.
1897 : परवानाधारक टॅक्सीकॅब सुरू करणारे लंडन हे जगातील पहिले शहर ठरले.
1912 : नेफर्टिटी बस्टचा शोध लागला.
1917 : फिनलँड रशियापासुन स्वतंत्र झाला.
1921 : ब्रिटिश आणि आयरिश प्रतिनिधींनी लंडनमध्ये अँग्लो-आयरिश करारावर स्वाक्षरी केली.
1922 : अँग्लो-आयरिश करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर एक वर्षानंतर, आयरिश मुक्त राज्य अस्तित्वात आले.
1946 : भारतीय होमगार्ड संघटनेची स्थापना झाली
1971 : भारताने बांगलादेशला मान्यता दिल्यानंतर पाकिस्तानने भारताशी राजनैतिक संबंध तोडले
1978 : स्पेनने सार्वमताद्वारे 1978 च्या स्पॅनिश राज्यघटनेला मान्यता दिली.
1981 : डॉ. एस. झेड. कासिम यांच्या नेतृत्त्वाखाली पोलर सर्कल या जहाजातून भारताची तुकडी आपल्या पहिल्या अंटार्क्टिक मोहिमेवर गोव्यातील मार्मागोवा बंदरातून रवाना झाली.
1999 : जर्मन टेनिसपटू स्टेफी ग्राफ हिला प्रतिष्ठित ऑलिम्पिक ऑर्डर देण्यात आला.
2000 : थोर समाजसेवक बाबा आमटे यांना राष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते केंद्र सरकारचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
2006 : नासाने मार्स ग्लोबल सर्वेअरने मंगळावर द्रव पाण्याची उपस्थिती दर्शविणारी छायाचित्रे उघड केली.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्याचे ऐतिहासिक टप्पे, मुलांसाठी प्रेरणादायी इतिहास
06 डिसेंबर रोजी जन्म दिनविशेष