Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आजच्या दिवशी स्वीकारला होता पदभार; जाणून घ्या 21 जुलैचा इतिहास

आजच्या दिवशी 2022 साली आजच्या दिवशीच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या होत्या. द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 21, 2025 | 06:31 PM
Draupadi Murmu took office as the 15th President of the country on July 21, 2022.

Draupadi Murmu took office as the 15th President of the country on July 21, 2022.

Follow Us
Close
Follow Us:

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून पदभार स्वीकारला. 2022 साली आजच्या दिवशीच द्रौपदी मुर्मू या राष्ट्रपती झाल्या होत्या. देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजाचे प्रतिनिधित्व करतात. मुर्मू यांनी विरोधकांचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचा दारुण पराभव केला होता. द्रौपदी मुर्मू यांना 64 टक्के मतं तर यशवंत सिन्हा यांना 36 टक्के मतं मिळाली होती. विशेष म्हणजे याच दिवशी म्हणजे 21 जुलै रोजी देशाला प्रतिभा पाटील यांच्या रुपाने पहिल्या महिला राष्ट्रपती मिळाल्या होत्या. 21 जुलै 2007 प्रतिभा पाटील राष्ट्रपती झाल्या तर 21 जुलै 2022 रोजी द्रौपदी मुर्मू या देशाच्या राष्ट्रपती झाल्या.

21 जुलै रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना 

  • 356 इ.स. पूर्व : जगातील सात आश्चर्यांपैकी एक एफिसस आर्टेमिसचे मंदिर नष्ट झाले.
  • 1831 : बेल्जियमचा राजा लिओपोल्ड पहिला याने शपथ घेतली.
  • 1944 : 20 जुलै 1944 रोजी ॲडॉल्फ हिटलरच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या क्लॉस वॉन स्टॉफेनबर्गला फाशी देण्यात आली.
  • 1960 : सिरिमाओ बंदरनायके श्रीलंकेचे 6 वे पंतप्रधान बनले. त्या जगातील पहिल्या महिला पंतप्रधान आहेत.
  • 1961 : मर्क्युरी-रेडस्टोन 4 मोहिमेवर गुस ग्रिसम हे अंतराळातील दुसरे अमेरिकन बनले.
  • 1976 : आयर्लंडमधील ब्रिटिश राजदूताची हत्या झाली.
  • 1983 : पृथ्वीवरील सर्वात कमी तापमानाची नोंद वोस्तोक, अंटार्क्टिका येथे उणे 89.2 सेल्सिअस होती.
  • 2002 : जगभरात दूरसंचार सेवा पुरवणारी अमेरिकन कंपनी वर्ल्डकॉमने दिवाळखोरी जाहीर केली.
  • 2008 : राम बरन यादव यांना नेपाळचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडून आले.
  • 2022 : द्रौपदी मुर्मू यांची भारताच्या 15 व्या राष्ट्रपती म्हणून निवड.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

21 जुलै रोजी जन्म दिनविशेष

  • 1853 : ‘शंकर बाळकृष्ण दीक्षित’ – ज्योतिषगणिताचे अभ्यासक, ग्रंथलेखक यांचा जन्म. (मृत्यू: 27 एप्रिल 1898)
  • 1899 : ‘अर्नेस्ट हेमिंग्वे’ – नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकन लेखक यांचा जन्म. (मृत्यू: 2 जुलै 1961)
  • 1910 : ‘वि. स. पागे’ – स्वातंत्र्यसैनिक, रोजगार हमी योजनेचे जनक यांचा जन्म. (मृत्यू: 16 मार्च 1990)
  • 1911 : ‘उमाशंकर जोशी’ – भारतीय लेखक, कवी आणि विद्वान यांचा जन्म. (मृत्यू: 19 डिसेंबर 1988)
  • 1930 : ‘आनंद बक्षी’ – भारतीय कवी आणि गीतकार यांचा जन्म. (मृत्यू: 30 मार्च 2002)
  • 1930 : ‘डॉ. रा. चिं. ढेरे’ – भारतीय संस्कृतीचे अभ्यासक संशोधक यांचा जन्म.
  • 1934 : ‘चंदू बोर्डे’ – क्रिकेट कप्तान आणि निवड समितीचे अध्यक्ष यांचा जन्म.
  • 1942 : ‘मल्लिकार्जुन खरगे’ – भारतीय राजकारणी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे 98 वे अध्यक्ष यांचा जन्मदिन.
  • 1945 : ‘बॅरी रिचर्ड्स’ – दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू यांचा जन्म.
  • 1947 : ‘चेतन चौहान’ – सलामीचे फलंदाज आणि राज्यसभा सदस्य यांचा जन्म.
  • 1960 : ‘अमरसिंग चमकीला’ – पंजाबी गायक यांचा जन्म. (मृत्यू: 8 मार्च 1988)

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

21 जुलै रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1972 : ‘जिग्मेदोरजी वांगचूक’ – भूतानचे राजे यांचे निधन. (जन्म: 2 मे 1929)
  • 1994 : ‘डॉ. र. वि. हेरवाडकर’ – मराठी बखर वाङ्‌मयाचे अभ्यासक यांचे निधन.
  • 1995 : ‘सज्जाद हुसेन’ – संगीतकार मेंडोलिन वादक यांचे निधन.
  • 1997 : ‘राजा राजवाडे’ – साहित्यिक यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1936)
  • 1998 : ‘ऍलन शेपर्ड’ – अमेरिकन अंतराळवीर यांचे निधन.
  • 2001 : ‘शिवाजी गणेशन’ – दाक्षिणात्य अभिनेते यांचे निधन. (जन्म: 1 ऑक्टोबर 1928)
  • 2002 : ‘गोपाळराव बळवंतराव कांबळे’ – मराठी चित्रकार यांचे निधन.
  • 2009 : ‘गंगूबाई हनगळ’ – किराणा घराण्याच्या शास्त्रीय गायिका यांचे निधन. (जन्म: 5 मार्च 1913)
  • 2013 : ‘लूरेम्बॅम ब्रजेशोतोरी देवी’ – भारतीय मार्शल आर्टिस्ट यांचे निधन. (जन्म: 1 जानेवारी 1981)

Web Title: Draupadi murmu took office as the 15th president of the country on july 21 2022 dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2025 | 06:31 PM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास
1

आक्रमक क्रिकेटपटू गौतम गंभीरचा वाढदिवस; जाणून घ्या 14 ऑक्टोबरचा इतिहास

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास
2

स्वामी विवेकानंदांच्या शिष्या समाजसेविका भगिनी निवेदिता यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 13 ऑक्टोबरचा इतिहास

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास
3

dinvishesh : सादगी अन् सौंदर्याची खाण अभिनेत्री रेखाचा वाढदिवस; जाणून घ्या 10 ऑक्टोबरचा इतिहास

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास
4

उद्योगविश्वातील शुक्रतारा रतन टाटा यांची पुण्यतिथी; जाणून घ्या 09 ऑक्टोबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.