
Dubai Work From Park Al Barsha Pond Park Workspace
आजच्या डिजिटल आणि हायब्रिड वर्किंग कल्चरच्या युगात दुबईने पुन्हा एकदा जगाला थक्क करणारा नवा उपक्रम राबवला आहे. चार भिंतींच्या बंदिस्त ऑफिसमध्ये किंवा कॅफेमधील गोंगाटात काम करून कंटाळलेल्या लोकांसाठी दुबई नगरपालिकेने ‘वर्क फ्रॉम पार्क’ (Work From Park) ही संकल्पना प्रत्यक्ष साकारली आहे. अल बरशा पॉन्ड पार्क (Al Barsha Pond Park) येथे दुबईच्या (Dubai) पहिल्या अधिकृत ‘वर्क फ्रॉम पार्क’ केंद्राचे भव्य उद्घाटन करण्यात आले आहे. आता नोकरदार, फ्रीलान्सर्स आणि स्टार्टअप उद्योजक थेट हिरव्यागार झाडांच्या सावलीत, तलावाच्या सुंदर पार्श्वभूमीवर बसून आपले ऑफिसचे काम करू शकणार आहेत.
दुबई नगरपालिकेने हा प्रकल्प ‘लेट्सवर्क’ (LetsWork) या फ्लेक्सिबल वर्कस्पेस प्लॅटफॉर्म आणि ‘ग्रुप अमाना’ (Group AMANA) या शाश्वत बांधकाम कंपनीसोबतच्या भागीदारीतून उभारला आहे. येथे केवळ बसण्यासाठी बाक (Bench) नसून कामासाठी अत्यंत आधुनिक आणि आरामदायक वातावरण तयार करण्यात आले आहे.
या प्रकल्पाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे उद्यानातील मोकळ्या हवेत, झाडांच्या सावलीत आणि इमारतीच्या छतावर (Rooftop) बसून काम करण्यासाठी बनवण्यात आलेले आऊटडोअर डेस्क पूर्णपणे मोफत उपलब्ध आहेत. येथे येणाऱ्या कोणत्याही नागरिकाला किंवा पर्यटकाला पूर्व-बुकिंगशिवाय (No Advance Booking) या मोकळ्या जागेचा आणि हाय-स्पीड इंटरनेटचा वापर करता येतो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Indian Navy : 3,000 किलोमीटर दूर समुद्री चाच्यांनी अपहरण केलेल्या 20 इराणी नागरिकांची भारतीय नौदलाने केली सुटका; पहा VIDEO
उन्हाचा त्रास टाळण्यासाठी किंवा शांततेत काम करण्यासाठी येथे वातानुकूलित (Climate-Controlled) इंडोर वर्कस्पेस तयार करण्यात आली आहे. यामध्ये ३ मुख्य विभाग आहेत:
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : ‘We Will Kill Trump…’ट्रम्प यांच्या पराभवावर इराणच्या राजधानित झळकले वादग्रस्त होर्डिंग्ज; पाहा VIDEO
या वर्कस्पेसेसचे बुकिंग करणे अत्यंत सोपे आहे. वापरकर्ते LetsWork App, अधिकृत वेबसाईट किंवा थेट WhatsApp (04 581 3652) वरून काही मिनिटांत आपली सीट किंवा मीटिंग रूम बुक करू शकतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वर्कस्पेसच्या निर्मितीसाठी उद्यानातील झाडांना किंवा नैसर्गिक सौंदर्याला कोणतीही हानी पोहोचवण्यात आलेली नाही. ‘डूबॉक्स’ (DuBox) या ऑफ-साइट मॉड्यूलर बांधकाम तंत्रज्ञानाचा वापर करून हे स्ट्रक्चर बाहेर तयार करून पार्कमध्ये असेंबल करण्यात आले आहे.
या उपक्रमामुळे पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पालकांना उद्यानात मुले खेळत असताना किंवा झोपाळ्यावर आनंद घेत असताना शेजारीच बसून लॅपटॉपवर काम करता येणार आहे. याव्यतिरिक्त उद्यानातील धावण्याचे ट्रॅक (Jogging Tracks), सायकलींचे ट्रॅक, खेळाची मैदाने आणि रेस्टॉरंट्स पूर्ववत सुरू राहतील. हा उपक्रम ‘दुबई २०४० अर्बन मास्टर प्लॅन’ (Dubai 2040 Urban Master Plan) आणि ‘दुबई इकॉनॉमिक अजेंडा D33’ या दूरदृष्टीचा एक महत्त्वाचा भाग आहे. अल बरशा पॉन्ड पार्कमधील या पहिल्या प्रयोगाच्या यशानंतर दुबईतील इतर प्रमुख सार्वजनिक उद्यानांमध्येही अशी ‘वर्क फ्रॉम पार्क’ केंद्रे उभारली जाणार आहेत.
Ans: दुबईतील पहिले 'वर्क फ्रॉम पार्क' केंद्र अल बरशा पॉन्ड पार्क (Al Barsha Pond Park) येथे सुरू करण्यात आले आहे.
Ans: नाही, उद्यानातील छतावरील (Rooftop) आणि मोकळ्या जागेतील आऊटडोअर डेस्क सर्वांसाठी पूर्णपणे मोफत आहेत.
Ans: इंडोर AC वर्कस्पेसचा दैनंदिन पास ५० दिरहॅम (AED 50) पासून सुरू होतो, ज्याचे बुकिंग LetsWork App किंवा WhatsApp वरून करता येते.