
Donald Trump Iran War Update US Israel Aid Cut 4 Billion
अमेरिकेच्या राजकारणातून आणि आंतरराष्ट्रीय मुत्सद्देगिरीतून एक अत्यंत खळबळजनक घडामोडी समोर येत आहे. अमेरिकेत पार पडलेल्या मध्यावधी निवडणुकांचे निकाल समोर आल्यानंतर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आपल्या परराष्ट्र धोरणात मोठा आणि अचानक यु-टर्न घेतला आहे. निवडणुकांमधील निराशाजनक कामगिरीनंतर ट्रम्प यांनी इराणवर लष्करी कारवाई न करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. यासोबतच त्यांनी अमेरिकेचा अत्यंत जवळचा मित्र देश असलेल्या इस्रायलला दिली जाणारी वार्षिक ४ अब्ज डॉलर्सची आर्थिक मदत रोखण्याची ऐतिहासिक घोषणा करून संपूर्ण जगभरात खळबळ उडवून दिली आहे.
मध्यावधी निवडणुकीच्या मतदानापूर्वी अमेरिकन प्रशासनाने इराणविरोधात अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. मतदानाच्या अवघ्या काही तास आधी इराणच्या मोक्याच्या केशम (Qeshm) बेटावर अमेरिकन दलांनी क्षेपणास्त्रे डागून लष्करी तणाव निर्माण केला होता. मात्र, निवडणुकीचे निकाल हाती आल्यानंतर ट्रम्प यांच्या भूमिकेत प्रचंड बदल पाहायला मिळाला.
‘फायनान्शिअल टाइम्स’ आणि आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी बोलताना डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्ट केले की, अमेरिकेची सध्या इराणवर नवा लष्करी हल्ला करण्याची कोणतीही योजना नाही. दोन्ही देश टेबल टॉकमधून शांततेचा मार्ग शोधतील असा विश्वास व्यक्त करत ट्रम्प म्हणाले, “आम्ही दोन्ही देश लवकरच एका बैठकीची तारीख निश्चित करू आणि चर्चेद्वारे प्रश्न सोडवू.“
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms: अमेरिकेत राजकीय सत्तापालट! मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प पक्षाचा दारुण पराभव; इराण युद्ध ट्रम्प यांच्या अंगलट
निवडणुकीच्या ऐन तोंडावर इराणच्या केशम बेटावर करण्यात आलेल्या लष्करी हल्ल्यामुळे रिपब्लिकन पक्षाला मोठा राजकीय फायदा होईल, असा ट्रम्प यांचा अंदाज होता. मात्र, अमेरिकन मतदारांनी या युद्धाच्या राजकारणाला साफ नाकारले आहे. मतदारांमधील वाढता असंतोष आणि युद्धाच्या भीतीमुळे रिपब्लिकन पक्षाला मोठा पराभव पत्करावा लागला, ज्यामुळे प्रशासनाला आपल्या रणनीतीचा पुनर्विचार करणे भाग पडले आहे.
या संपूर्ण घडामोडींमधील सर्वात मोठा निर्णय म्हणजे इस्रायलच्या आर्थिक मदतीला दिलेली स्थगिती. ट्रम्प यांनी घोषणा केली की, अमेरिका इस्रायलला दरवर्षी पुरवत असलेली ४ अब्ज डॉलर्सची (अंदाजे ३३ हजार कोटींहून अधिक रुपये) थेट आर्थिक मदत वर्ष अखेरपासून बंद करेल.
BREAKING: President Trump says US will stop $4 billion aid to Israel https://t.co/bqsiKfAIjF — Insider Paper (@TheInsiderPaper) November 3, 2026
credit – social media and Twitter
ट्रम्प यांनी स्पष्ट केले की या निर्णयाबाबत त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्याशी आधीच चर्चा केली आहे. ट्रम्प यांच्या मते, “इस्रायल ही आता एक अत्यंत सक्षम अर्थव्यवस्था आहे आणि त्यांना या थेट मदतीची गरज उरलेली नाही.” तथापि, त्यांनी हेदेखील स्पष्ट केले की थेट आर्थिक मदत रोखली असली तरी इस्रायलला अमेरिकेकडून शस्त्रास्त्रांची खरेदी करण्याची मुभा कायम राहील.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : US Midterms : अमेरिकन निवडणुकीत भारतीयांची विजयी हॅट्ट्रिक; पिया दांडिया, सुहास सुब्रमण्यम आणि अरुणा मिलर यांचा जलवा
अमेरिकेच्या संसदेत (काँग्रेस) झालेल्या या मध्यावधी निवडणुकांचे निकाल ट्रम्प प्रशासनासाठी अत्यंत धक्कादायक ठरले आहेत. विरोधी पक्ष असलेल्या डेमोक्रॅट्सने प्रतिनिधी सभागृहात (House of Representatives) स्पष्ट बहुमत मिळवले असून, सिनेटमधीलही रिपब्लिकन पक्षाची पकड सैल झाली आहे. अमेरिकेच्या गेल्या ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच मध्यावधी निवडणुकीत संसदेच्या दोन्ही सभागृहांमधील शक्तीचे संतुलन पूर्णपणे बदलले आहे.
मंगळवारी रात्री पत्रकारांशी संवाद साधताना अध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या पक्षाच्या पराभवाचे खापर थेट इराण युद्धाच्या मुद्द्यावर फोडले. “आमच्या पक्षाला झालेल्या पराभवासाठी इराण युद्धाचा वाद मोठ्या प्रमाणात जबाबदार होता,” अशी जाहीर कबुली ट्रम्प यांनी दिली. युद्धामुळे अमेरिकन जनतेमध्ये निर्माण झालेली भीती आणि महागाईचा भडका यांमुळे मतदारांनी डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने कौल दिल्याचे विश्लेषकांचे मत आहे.
Ans: अध्यक्ष ट्रम्प यांनी इस्रायलला अमेरिकेकडून दरवर्षी दिली जाणारी ४ अब्ज डॉलर्सची (USD 4 Billion) थेट आर्थिक लष्करी मदत वर्षअखेरीपासून बंद करण्याची घोषणा केली आहे.
Ans: ट्रम्प यांनी स्पष्ट केले आहे की, सध्या इराणवर लष्करी हल्ला करण्याची अमेरिकेची कोणतीही योजना नाही आणि दोन्ही देश राजनैतिक चर्चेद्वारे प्रश्न शांततेने सोडवतील.
Ans: मध्यावधी निवडणुकीत ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाला मोठा फटका बसला असून विरोधी डेमोक्रॅटिक पक्षाने प्रतिनिधी सभागृहात आणि सिनेटमध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.