Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेती आणि संस्कृती फुलवणारा ‘होलोसीन’ काळ संपतोय? पृथ्वी आता विनाशाच्या उंबरठ्यावर

शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील १६ महत्त्वाच्या 'टिपिंग एलिमेंट्स'ची ओळख पटवली आहे. ग्रीनलैंड हिमपत्र, अॅमेझॉन जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह हे त्यातील प्रमुख घटक आहेत.

  • By anuradha sagar
Updated On: Mar 31, 2026 | 05:15 PM
Global Warming 2026, Hothouse Earth Trajectory, Climate Tipping Elements,

Global Warming 2026, Hothouse Earth Trajectory, Climate Tipping Elements,

Follow Us
Follow Us:
  • मानवी संस्कृती, शेती आणि नागरीकरण ज्या स्थिर ‘होलोसीन’ कालखंडात फुलले, ती हवामान व्यवस्था आता ढासळत आहे.
  • पृथ्वी आता ‘हॉटहाऊस अर्थ ट्रॅजेक्टरी’ (अत्यंत उष्ण स्थिती) कडे वाटचाल करत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे.
  • शास्त्रज्ञांनी ग्रीनलँडमधील बर्फाचे थर, ॲमेझॉनचे जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह यांसारख्या १६ ‘टिपिंग एलिमेंट्स’ची ओळख पटवली आहे.
 

Climate Tipping Elements :  मानवी संस्कृती, शेती आणि नागरीकरण ज्या स्थिर ‘होलोसीन’ कालखंडात फुलले, ती हवामान व्यवस्था आता ढासळत आहे. पृथ्वी आता ‘हॉटहाऊस अर्थ ट्रॅजेक्टरी’ (अत्यंत उष्ण स्थिती) कडे वाटचाल करत असल्याचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांनी ग्रीनलँडमधील बर्फाचे थर, ॲमेझॉनचे जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह यांसारख्या १६ ‘टिपिंग एलिमेंट्स’ची ओळख पटवली आहे.

पृथ्वीवरील वाढते तापमान आता केवळ मानवी क्रियांपुरते मर्यादित राहिले नसून, स्वतःच अधिक तापमानवाढ घडवून आणणाऱ्या प्रक्रियांना चालना देत असल्याचा गंभीर इशारा आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांनी दिला आहे. एकदा ही साखळी सुरू झाली, तर ती मानवी नियंत्रणाबाहेर जाऊ शकते, असे नव्या संशोधनात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘वन अर्थ’ या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मानवजातीने हजारो वर्षे अनुभवलेली स्थिर हवामान व्यवस्था आता ढासळत आहे.

Iran-Israel War : युद्धजन्य परिस्थितीत सागरी सुरक्षा खिळखिळी; व्यापारी नौदलाची जहाजे निशाण्यावर

‘होलोसीन’ या काळात शेती, नागरीकरण आणि मानवी संस्कृती फुलली; मात्र आता पृथ्वी या स्थिरतेतून बाहेर पडत असल्याचे संशोधकांचे मत आहे. हवामातज्ञ विल्यम जे. रिपल आणि पृथ्वी प्रणाली तज्ञ जोहान रॉकस्ट्रॉम यांच्या नेतृत्वाखालील संशोधनात ‘हाँथाऊस अर्थ ट्रॅजेक्टरी’चा धोका अधोरेखित करण्यात आला आहे.

‘टिपिंग एलिमेंट्स’ची साखळी बनतेय अधिक धोकादायक

शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील १६ महत्त्वाच्या ‘टिपिंग एलिमेंट्स’ची ओळख पटवली आहे. ग्रीनलैंड हिमपत्र, अॅमेझॉन जंगल आणि अटलांटिक महासागरातील प्रवाह हे त्यातील प्रमुख घटक आहेत. या घटकांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचा परस्परांशी असलेला संबंध, एका घटकात झालेला बदल दुसऱ्याला अस्थिर करू शकतो.

२०१५ च्या पॅरिस करारातील १.५ अंश सेल्सिअस मर्यादा २०२४ मध्ये सलग महिने ओलांडली गेली असून, ही दीर्घकालीन तापमानवाढीची स्पष्ट चिन्हे मानली जात आहेत. तापमानवाढीचा वेगही मोठ्या प्रमाणात वाढला आहे, ज्यामुळे २ अंश मर्यादा लवकरच पार होण्याची शक्यता आहे. एरोसोल्सचा (हवेत विखुरलेले सूक्ष्मकण) ‘कूलिंग इफेक्ट’ कमी झाल्याने तापमान आणखी वाढू शकते.

डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच; निच्चांक गाठल्याने गुंतवणूकदारांची झाली नाचक्की

संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजानुसार,१२२१०० पर्यंत तापमान सुमारे २.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढण्याची शक्यता असून, कार्बन उत्सर्जनही विक्रमी पातळीवर पोहोचले आहे.शास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वी सध्या ज्या दिशेने वाटचाल करत आहे ती अजूनही बदलता येऊ शकते. मात्र, तातडीने आणि ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात ‘हॉथाऊस स्टेट’ सारख्या अत्यंत उष्ण आणि धोकादायक परिस्थितीला सामोरे जावे लागू शकते.

 

तापमानवाढीची ‘स्वयं-गती’ प्रक्रिया

संशोधनात तापमानवाढीच्या ‘अॅर्मप्लफायिंग फीडबैंक लूप्स वर विशेष भर देण्यात आला आहे. उदाहरणार्थ, आविर्टकमधील बर्फ वितळल्यावर सूर्यप्रकाश परावर्तित करणारी पांढरी पृष्ठभाग कमी होते आणि त्याऐवजी समुद्र अधिक उष्णता शोषतों. परिणामी आणखी बर्फ वितळती आणि ही प्रक्रिया वेगाने सुरू राहते. याशिवाय, पर्माफ्रॉस्ट (ध्रुवीय प्रदेशातील कायमस्वरूपी गोठलेली जमीन) वितळून कार्बन उत्सर्जित होणे, जंगलांचे नष्ट होणे आणि ढगांच्या रचनेत बदल होणे या घटकांमुळे तापमानवाढीला अधिक गती मिळते, या सर्व प्रक्रिया एकत्रितपणे पृथ्वीच्या तापमानाला स्वतः वाढवणाऱ्या प्रणालीमध्ये रूपांतरित करू शकतात.

 

Web Title: Earths climate feedback loops new study reveals threat to thousands of years of stability

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 05:15 PM

Topics:  

  • Climate Change
  • global warming effect
  • Indian Weather

संबंधित बातम्या

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
1

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज
2

El Nino :धोक्याची घंटा ;‘गॉडझिला एल निनो’चा कहर! जगभरात ४.५१ लाख मृत्यूंचा अंदाज

School Holiday 28 September: उद्याची School Holiday कन्फर्म? पावसामुळे ‘या’ राज्यांतील शाळांबाबत मोठं अपडेट
3

School Holiday 28 September: उद्याची School Holiday कन्फर्म? पावसामुळे ‘या’ राज्यांतील शाळांबाबत मोठं अपडेट

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
4

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.