राजधानी दिल्लीत सकाळच्या वेळेस थंड वारे वाहत आहेत. तर दुपारच्या वेळेस कडक उन्हाळा जाणवत आहे. तर रात्री थंडी जाणवत आहे. पुढील काही दिवस राजधानी दिल्लीत हवामान याचप्रमाणे राहण्याची शक्यता आहे.
उत्तर भारतातील काही भागांमधून मान्सूनने माघार घेतल्यानंतर, पश्चिमेकडील वारे पूर्वेकडे सरकत आहेत, ज्यामुळे उत्तरेकडील डोंगराळ आणि मैदानी भागात पावसाळा संपत आहे.
देशभरात मान्सूनचा वेग मंदावण्यास सुरुवात झाली आहे. अनेक राज्यांमध्ये उष्णता आणि आर्द्रता दिसून येत आहे. अलीकडेच हवामान खात्याने काही राज्यांमध्ये पावसाचा इशारा जारी केला आहे.
पंजाबमध्ये धरणांची पाणी पातळी कमी झाली. परंतु, पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली. पंजाबमधील नद्यांची पाणी पातळी कमी झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे, परंतु 12 सप्टेंबरपर्यंत पावसाच्या इशाऱ्यामुळे चिंता वाढली आहे.