• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • अन्य Navbharat LIVE
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Earths Day May Be Under 24 Hours Today Due To Faster Rotation Warn Scientists

पृथ्वी झाली गतिमान! आजचा दिवस ठरू शकतो अत्यंत विस्मयकारक; शास्त्रज्ञांनी दिला धक्कादायक इशारा

Earth's rotation speeding up : आज, ९ जुलै रोजी, आपली पृथ्वी एका अत्यंत दुर्मीळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घटनेची साक्ष देणार आहे. वाचा काय आहे नेमक प्रकरण.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jul 09, 2025 | 12:40 PM
Earth’s day may be under 24 hours today due to faster rotation warn scientists

पृथ्वीचा आजचा दिवस २४ तासांपेक्षा लहान असू शकतो, शास्त्रज्ञांनी दिला धक्कादायक इशारा ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Earth’s rotation speeding up : आज, ९ जुलै रोजी, आपली पृथ्वी एका अत्यंत दुर्मीळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोनातून महत्त्वाच्या घटनेची साक्ष देणार आहे. शास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार आजचा दिवस संपूर्ण २४ तासांचा नसेल, तर तो काही मिलिसेकंदांनी कमी असेल. ही घटना पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगातील वाढीमुळे घडणार आहे, ज्यामुळे पृथ्वीचे परिभ्रमण नेहमीपेक्षा थोडे जलद होईल.

वॉशिंग्टन येथील वैज्ञानिक आणि विविध जागतिक संस्था पृथ्वीच्या गतीवर सतत लक्ष ठेवून असतात. त्यांच्या मते, पृथ्वीच्या फिरण्याचा वेग गेल्या काही वर्षांपासून हळूहळू वाढत आहे. विशेषतः २०२० आणि २०२२ मध्ये अणुघड्याळांच्या मदतीने केलेल्या निरीक्षणात असे आढळले की पृथ्वी काही दिवस २४ तासांपेक्षा लवकर पूर्ण फेरी घेत आहे.

का वाढतोय पृथ्वीचा वेग?

लिव्हरपूल विद्यापीठातील भूभौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड होम यांच्या मते, पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगात होणाऱ्या बदलामागे अनेक घटक जबाबदार आहेत. यामध्ये पृथ्वीच्या आतील हालचाली, चंद्राची स्थिती, पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र कमकुवत होणे, हिमनद्या वितळणे आणि समुद्र प्रवाहांचा समावेश आहे. हे सर्व घटक पृथ्वीच्या परिभ्रमणात सूक्ष्म पातळीवर परिणाम करतात.

यावर्षी ५ जुलैलाही वैज्ञानिकांनी असा दिवस नोंदवला होता, जो २४ तासांपेक्षा थोडा कमी होता. आता ९ जुलै, २२ जुलै आणि ५ ऑगस्ट हे दिवसही अशाच प्रकारचे असण्याची शक्यता शास्त्रज्ञांनी वर्तवली आहे. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या विषुववृत्तापासून सर्वात दूर असेल, ज्यामुळेही पृथ्वीच्या फिरण्यावर परिणाम होतो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ‘पकडा आणि सरळ गोळी मारा..’ शेख हसीनांचा लीक ऑडिओ इंटरनेटवर जोरदार VIRAL

सामान्य जीवनावर काय परिणाम होईल?

या घटनेचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावर होणार नाही, कारण दिवसातील बदल फक्त १.५१ मिलिसेकंद इतकाच आहे – जो सामान्य माणसाला जाणवणे अशक्य आहे. मात्र, जीपीएस प्रणाली, उपग्रहांचे संचालन आणि अणुघड्याळांवर या सूक्ष्म फरकाचा परिणाम होऊ शकतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की वेळेचे अचूक मोजमाप अत्याधुनिक विज्ञान, संप्रेषण आणि जागतिक पातळीवर घडणाऱ्या आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक आहे. त्यामुळे अशा छोट्या बदलांकडे दुर्लक्ष करता येत नाही.

पृथ्वीवर भविष्यकाळात काय बदल होणार?

शास्त्रज्ञांचा विश्वास आहे की जर पृथ्वीच्या फिरण्याचा वेग असाच वाढत राहिला, तर काही अब्ज वर्षांनंतर पृथ्वी चंद्राच्या कक्षेशी सुसंगत फिरण्यास लागेल. याचा अर्थ, चंद्राची फक्त एकच बाजू नेहमी पृथ्वीवरून दिसेल आणि पृथ्वीही चंद्रासारखी “टायडल लॉकिंग” स्थितीत येईल. पण ही घटना घडायला ५० अब्ज वर्षांचा कालावधी लागेल, जोपर्यंत पृथ्वीवर अनेक भौगोलिक, पर्यावरणीय आणि जीवशास्त्रीय बदल झालेले असतील.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारताविरुद्ध मोठे षड्यंत्र! पाकिस्तानचे ‘या’ देशाला भेटणे धोकादायक; CDS अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले कारण

एक अनोखा क्षण

आजचा दिवस पृथ्वीच्या इतिहासातील एक अनोखा क्षण असणार आहे. हे बदल आपल्या दृष्टीस न दिसले तरी ते शास्त्रज्ञांसाठी आणि तंत्रज्ञानाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत. पृथ्वीच्या फिरण्यातील हे सूक्ष्म बदल भविष्यात अधिक संशोधनाला मार्गदर्शक ठरू शकतात.

Web Title: Earths day may be under 24 hours today due to faster rotation warn scientists

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2025 | 12:40 PM

Topics:  

  • planet
  • science news
  • special story
  • super moon

संबंधित बातम्या

International Charity Day : या खास दिवशी वाचा मदर तेरेसा यांचे 10 प्रेरणादायी सुविचार सोबतच इतिहास आणि महत्त्व
1

International Charity Day : या खास दिवशी वाचा मदर तेरेसा यांचे 10 प्रेरणादायी सुविचार सोबतच इतिहास आणि महत्त्व

Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या
2

Teachers Day 2025: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यामुळे 5 सप्टेंबर हा दिवस शिक्षकांसाठी कसा ठरला खास? जाणून घ्या

Earths Gold : पृथ्वीच्या गाभ्यात सुमारे 30 अब्ज टन सोने असल्याचा अंदाज; शास्त्रज्ञांचा थक्क करणारा शोध
3

Earths Gold : पृथ्वीच्या गाभ्यात सुमारे 30 अब्ज टन सोने असल्याचा अंदाज; शास्त्रज्ञांचा थक्क करणारा शोध

National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?
4

National Wildlife Day 2025 : निसर्गाशी सहअस्तित्वाचे वचन! वाचा लुप्त होत जाणाऱ्या प्रजातींचे संरक्षण का आहे गरजेचे?

ताज्या बातम्या

पुढे वाचा
India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

India At UN : ‘जगावर घोंगावतंय आणखी एक संकट…’ भारताने UN मध्ये का केले ‘असे’ चकित करणारे विधान?

लालबागच्या राजा, सेलेब्रिटींचा बाप्पा! अमिताभ बच्चन यांनी दिली ११ लाख रुपयांची देणगी; लोक म्हणाले ‘पंजाबसाठी केले असते…’

लालबागच्या राजा, सेलेब्रिटींचा बाप्पा! अमिताभ बच्चन यांनी दिली ११ लाख रुपयांची देणगी; लोक म्हणाले ‘पंजाबसाठी केले असते…’

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता शेती खर्च होईल कमी, GST 2.0 मध्ये शेतकऱ्यांसाठी काय? जाणून घ्या

शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! आता शेती खर्च होईल कमी, GST 2.0 मध्ये शेतकऱ्यांसाठी काय? जाणून घ्या

Bihar Politics: स्टेट लेव्हलच्या ‘या’ नेत्याने ऐन मोक्याला सोडली नीतीशकुमारची साथ, निवडणुकीपूर्वी लालूशी केली हातमिळवणी

Bihar Politics: स्टेट लेव्हलच्या ‘या’ नेत्याने ऐन मोक्याला सोडली नीतीशकुमारची साथ, निवडणुकीपूर्वी लालूशी केली हातमिळवणी

विवेक अग्निहोत्रीचा ‘The Bengal Files’ पाहून हादरली लोकं, म्हणाले ‘चित्रपट नाही तर समाजाचा आरसा आहे…’

विवेक अग्निहोत्रीचा ‘The Bengal Files’ पाहून हादरली लोकं, म्हणाले ‘चित्रपट नाही तर समाजाचा आरसा आहे…’

ICC Women’s Cricket World Cup 2025 : विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर! 5 खेळाडू करणार पदार्पण, 3 खेळाडू करणार पुनरागमन

ICC Women’s Cricket World Cup 2025 : विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाने केला संघ जाहीर! 5 खेळाडू करणार पदार्पण, 3 खेळाडू करणार पुनरागमन

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ahilyanagar : शिवगर्जनाच्या मंडळाने जागवला देशाभिमान; देखाव्यांना नागरिकांची मोठी पसंती

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Ambernath : अंबरनाथच्या मेट्रो स्थानकांना कानसई गाव आणि श्री क्षेत्र शिवमंदिर नाव द्या! स्थानिकांची मागणी

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Nashik: नाशिकचा अभिमान! १०७ वर्षांची परंपरा जपणारे रविवार कारंजा गणेशोत्सव मंडळ

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Sangali News : सांगली महापालिका निवडणूक काँग्रेस ताकदीने लढणार – विश्वजीत कदम

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nashik Kumbhmela कुंभमेळा तयारीची जिल्हाधिकारी, आयुक्तांनी केली पाहणी, साधुसंतांच्या अडचणींवर चर्चा

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Nalasopara | रहिवासी इमारत एका बाजून कलंडली, सुदैवाने जिवितहानी नाही

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Sindhudurg : कुडाळच्या परब कुटुंबाचा गणराय ५२ दिवसांसाठी विराजमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.