Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dinvishesh : अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय नेतृत्व बराक ओबामा यांचा जन्मदिन; जाणून घ्या 04 ऑगस्टचा इतिहास

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. अमेरिकेचे पहिले आफ्रिकन अमेरिकन राष्ट्राध्यक्ष झालेले बराक ओबामा यांची लोकप्रियता संपूर्ण विश्वामध्ये आजही आहे

  • By प्रीति माने
Updated On: Aug 04, 2025 | 10:38 AM
 first African American President of the us Barack Obama birthday August 4 History Marathi Dinvishesh 

 first African American President of the us Barack Obama birthday August 4 History Marathi Dinvishesh 

Follow Us
Close
Follow Us:

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष हे पद संपूर्ण जगभरामध्ये नेहमीच चर्चेत असते. यावर पहिल्यांदाच एका कृष्णवर्णीय व्यक्तीने नेतृत्व केले ते म्हणजे बराक ओबामा. अमेरिकेचे ४४ वे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा  यांचा आज जन्मदिन आहे. त्यांचा जन्म ४ ऑगस्ट १९६१ रोजी झाला. ते डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य होते आणि पहिले आफ्रिकन अमेरिकन अध्यक्ष म्हणून त्यांची ओळखले जातात. त्यांची कार्यकीर्द ही संपूर्ण जगात चर्चेत राहिली. ते २००९ ते २०१७ अमेरिकचे राष्ट्राध्यक्ष राहिले आहेत. 

04 ऑगस्ट रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1854 : हिनोमारा ध्वज जपानी जहाजांनी अधिकृतपणे वापरण्यास सुरुवात केली.
  • 1914 : पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर आक्रमण केले. प्रत्युत्तर म्हणून, युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध घोषित केले. अमेरिकेने तटस्थता जाहीर केली.
  • 1924 : सोव्हिएत युनियन आणि मेक्सिको यांच्यात राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले.
  • 1947 : जपानच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली.
  • 1956 : अप्सरा ही भारताची सहावी अणुभट्टी भाभा अणुऊर्जा केंद्र तुर्भे येथे कार्यान्वित झाली.
  • 1983 : थॉमस संकरा हे अपर व्होल्टाच्या राष्ट्राध्यक्षपदी.
  • 1984 : अप्पर व्होल्टाचे नाव बुर्किना फासो करण्यात आले.
  • 1993 : पुण्यातील राजेंद्र खंडेलवाल या अपंग पण दृढ साहसी व्यक्तीने कायनेटिक होंडा वर चार सहकाऱ्यांसह समुद्रसपाटीपासून 18,383 फूट उंचीवरील खारदुंग ला खिंड पार केली. त्यांच्या कामगिरीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली.
  • 1998 : फिलीपिन्सचे माजी राष्ट्रपती कोरेझोन अक्विनो यांना आंतरराष्ट्रीय सामंजस्यासाठी रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.
  • 2001 : मृत्यूनंतर त्वचा दान करणारी भारतातील पहिली स्किन बँक मुंबईतील लोकमान्य टिळक हॉस्पिटलमध्ये स्थापन करण्यात आली.
  • 2007 : नासाचे फिनिक्स अंतराळयान प्रक्षेपित झाले.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

04 ऑगस्ट रोजी जन्म दिनविशेष

  • 1730 : ‘सदाशिवराव भाऊ’ – पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती यांचा जन्म. (मृत्यू : 14 जानेवारी 1761)
  • 1821 : ‘लुई व्हिटोन’ – लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते यांचा जन्म. (मृत्यू : 27 फेब्रुवारी 1892)
  • 1834 : ‘जॉन वेन’ – ब्रिटिश गणितज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 4 एप्रिल 1923)
  • 1845 : ‘सर फिरोजशहा मेहता’ – कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक यांचा जन्म. (मृत्यू : 5 नोव्हेंबर 1915)
  • 1863 : ‘महामहोपाध्याय वासुदेवशास्त्री अभ्यंकर’ – पातंजलीच्या संकृत महाभाष्याचा मराठीत अनुवाद करणारे विद्वान यांचा जन्म.
  • 1894 : ‘नारायण सीताराम फडके’ – साहित्यिक व वक्ते यांचा जन्म. (मृत्यू : 22 ऑक्टोबर 1978)
  • 1929 : ‘वेल्लोर जी. रामभद्रन’ – तामिळनाडूमधील मृदंगम कलाकार यांचा जन्म.
  • 1929 : ‘किशोर कुमार’ – पार्श्वगायक, संगीतकार, गीतकार, निर्माता, दिग्दर्शक, आभिनेता व पटकथालेखक यांचा जन्म. (मृत्यू : 13 ऑक्टोबर 1987)
  • 1931 : ‘नरेन ताम्हाणे’ – यष्टीरक्षक आणि फलंदाज यांचा जन्म. (मृत्यू : 19 मार्च 2002)
  • 1950 : ‘एन. रंगास्वामी’ – भारतीय वकील आणि राजकारणी यांचा जन्म.
  • 1961 : ‘बराक ओबामा’ – अमेरिकेचे 44 वे आणि पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष, नोबेल पारितोषिक विजेते यांचा जन्म.
  • 1965 : ‘विशाल भारद्वाज’ – भारतीय चित्रपट दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि संगीतकार यांचा जन्म.
  • 1978 : ‘संदीप नाईक’ – भारतीय राजकारणी यांचा जन्म.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

04 ऑगस्ट रोजी मृत्यू दिनविशेष

221 : ‘लेडी जेन’ – चीनी सम्राज्ञी यांचे निधन. (जन्म : 26 जानेवारी 183)
1060 : ‘हेन्‍री (पहिला)’ – फ्रान्सचा राजा यांचे निधन. (जन्म : 4 मे 1008)
1875 : ‘हान्स अँडरसन’ – डॅनिश परिकथालेखक यांचे निधन. (जन्म : 2 एप्रिल 1805)
1937 : ‘डॉ. काशीप्रसाद जायस्वाल’ – प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ यांचे निधन. (जन्म : 27 नोव्हेंबर 1881)
1977 : ‘एडगर अॅड्रियन’ – नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट यांचे निधन. (जन्म : 30 नोव्हेंबर 1889)
1997 : ‘जीन काल्मेंट’ – 122 वर्षे आणि 164 दिवस जगलेली फ्रेन्च महिला यांचे निधन. (मृत्यू : 21 फेब्रुवारी 1875)
2003 : ‘फ्रेडरिक चॅपमॅन रॉबिन्स’ – नोबेल पुरस्कार विजेते अमेरिकन बालरोगतज्ञ यांचे निधन. (जन्म : 25 ऑगस्ट 1916)

 

first African American President of the us Barack Obama birthday August 4 History Marathi dinvishesh

Web Title: First african american president of the us barack obama birthday august 4 history marathi dinvishesh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 10:38 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास
1

अहिंसेची शिकवण देणाऱ्या महात्मा गांधी यांची जयंती; जाणून घ्या 02 ऑक्टोबरचा इतिहास

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास
2

Dinvishesh : आपले बालपण रंगवणारे कार्टून नेटवर्क झाले सुरु; जाणून घ्या 01 ऑक्टोबर रोजीचा इतिहास

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास
3

एक भूकंप अन् लातूर झालं उद्धवस्त; किल्लारी भूकंपाची भयावह कहाणी; जाणून घ्या 30 सप्टेंबरचा इतिहास

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास
4

डिझेल इंधनाचा शोध लावणाऱ्या रुडॉल्फ डिझेल यांचा झाला गूढ मृत्यू; जाणून घ्या 29 सप्टेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.