• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • Pune Uma Maheshwar Temple Shukrawar Peth Marathi Information Shravani Somwar Special

श्रावणी सोमवार विशेष : मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा; पुण्यातील उमा महेश्वर मंदिर

Uma Maheshwar Mandir Pune : पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये उमा महेश्वर हे शिवमंदिर आहे. अतिशय प्राचीन असलेल्या या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला असून त्याला नव्याने वैभव प्राप्त झाले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Aug 04, 2025 | 01:15 AM
pune Shukrawar Peth Uma Maheshwar Temple marathi information

पुण्यातील शुक्रवार पेठेमध्ये उमा महेश्वर हे स्थापत्य शैलीचा उत्तम नमुना असलेले मंदिर आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

Shravan 2025 : प्रिती माने : पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे. सृष्टीमध्ये नवचैतन्य निर्माण करणाऱ्या या श्रावणमासामध्ये भगवान शिवाची आराधना केली जाते. पुण्यासारख्या सांस्कृतिक वैभव लाभलेल्या शहरामध्ये महादेवाची अनेक प्राचीन आणि स्थापत्यशैलीचा उत्तम नमुना असलेली मंदिरे अस्तित्वात आहेत. तर काही मंदिरांचा जिर्णोद्धार करुन त्यांना नव्याने आकार दिला जातो आहे. असेचे एक प्राचीन पण नव्या थाटनीचे मंदिर म्हणजे उमा महेश्वर.

शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये शुक्रवार पेठेत हे  उमा महेश्वर मंदिर आहे. लोकवस्तीच्या गर्दीमध्ये हरवलेले हे मंदिर पुन्हा एकदा नावारुपास आले आहे. याचे कारण म्हणजे मंदिराचे नव्याने केलेले बांधकाम. उमा महेश्वर मंदिराचा मूळ गाभारा कायम ठेवत मंदिराच्या परिसराचे दगडी बांधकाम करण्यात आले आहे. मराठा शैलीमध्ये या मंदिराचे स्थापत्य साकारण्यात आले असून ते अतिशय मनमोहक दिसून येत आहे. मराठा पद्धतीच्या कमानी, झरोके आणि देवळ्या तसेच मराठा पद्धतीची कमानीवरील केळंफुल हे सुबक शैलीमध्ये कोरण्यात आले आहेत. ललाटबिंबावर गणराय असून नक्षीकाम असलेले द्वारशाखा आहेत.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

मंदिराच्या चहूबाजूने आवारामध्ये दगडी ओटा बांधण्यात आला असून कौलारु छत याची शोभा वाढवत आहे. त्याचबरोबर गाभाऱ्याच्या अगदी समोर भैरवाची अत्यंत देखणी मूर्ती आहे. त्यासमोर असलेले दगडी कारंजे हे मंदिराच्या सौंदर्यात भर घालतात. त्याचबरोबर आवारातील भिंतीवर अनेक देवदेवतांची ओवरी भिंतीचित्रे रेखाटण्यात आली आहेत. शहरातील गोंगाटाच्या भागामध्ये असूनही मंदिराच्या आवारामध्ये असणारी निरव शांतता मनाला प्रफुल्लित करते.

pune Shukrawar Peth Uma Maheshwar Temple marathi information

उमा महेश्वर मंदिराचे मराठा स्थापत्य शैलीतील बांधकाम अतिशय मनमोहक आहे (फोटो –
टीम नवराष्ट्र)

महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

बांधकाम हे नव्याने साकारण्यात आले असले तरी हे मंदिर प्राचीन आहे. सुमारे 180 वर्षापुर्वी बांधलेले श्री उमामहेश्वर मंदिर काळाच्या ओघात दुर्लक्षित झाले होते. आता मात्र मराठा शैलीमध्ये याचा जिर्णोद्धार करण्यात आला असून मंदिराला नव्याने वैभव प्राप्त झाले आहे. गाभाऱ्यातील शिवलिंग हे मूळ स्वरुपामध्ये असून देवकोष्टांमध्ये सुर्यनारायण,  विष्णुलक्ष्मी, गणपती आणि दुर्गामाता यांच्या सुबक अशा काळ्या पाषाणातील मूर्ती आहेत. त्याचबरोबर मध्यभागी गाभाऱ्यामध्ये असणारी श्री उमामहेश्वराची मूर्ती लक्ष वेधून घेते. मंदिरामधील शांतता आणि स्थापत्यशैली ही उमामहेश्वर शिवमंदिराचे वैशिष्ट्य ठरते आहे. प्रदोष आणि सोमवारी मंदिरामध्ये भक्तांचा ओढा वाढतो. शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये असणारे उमा महेश्वर मंदिर हे मराठा स्थापत्य शैलीचा ठेवा म्हणून समोर आले आहे.

Web Title: Pune uma maheshwar temple shukrawar peth marathi information shravani somwar special

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 04, 2025 | 01:15 AM

Topics:  

  • Lord Shiva
  • pune news
  • Shravan 2025

संबंधित बातम्या

पीएमपी चालकांचा निष्काळजीपणा, उद्धट वर्तनाचा प्रवाशांना त्रास; अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर
1

पीएमपी चालकांचा निष्काळजीपणा, उद्धट वर्तनाचा प्रवाशांना त्रास; अध्यक्ष अ‍ॅक्शन मोडवर

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम
2

नवरात्रोत्सवानिमित्त आरोग्य धात्रींचा पुण्यात विशेष सन्मान; भाजप वैद्यकीय आघाडीचा अनोखा उपक्रम

Navarashtra Special: पर्यावरणाशी एकनिष्ठ ‘नवदुर्गा’; घेतला वन्यजीव संरक्षणाचा ध्यास, कोण आहेत नेहा पंचमीया?
3

Navarashtra Special: पर्यावरणाशी एकनिष्ठ ‘नवदुर्गा’; घेतला वन्यजीव संरक्षणाचा ध्यास, कोण आहेत नेहा पंचमीया?

Crime News: कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ८९ लाखांची फसवणूक; CA ला अटक
4

Crime News: कर्ज मंजूर करुन देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाची ८९ लाखांची फसवणूक; CA ला अटक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये ओवेसींच्या सभेला पोलिसांची परवानगी, तयारी जोमात

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

Karjat News : मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान; तात्काळ पंचनामे करण्याचे शासनाचे आदेश

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

Uttarpradesh: ३९ कोटींच्या विम्यासाठी मुलाने रचला कट; आई-वडिलांना ठार करून दाखवला अपघात, पत्नीच्या मृत्यूनंतरही केले लाखोंचे दावे

Rajyog: हंस आणि रुचक राजयोगामुळे October महिन्यात ‘या’ राशींना होणार सर्वाधिक लाभ, धनलाभाचा योग

Rajyog: हंस आणि रुचक राजयोगामुळे October महिन्यात ‘या’ राशींना होणार सर्वाधिक लाभ, धनलाभाचा योग

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

Cabinet Meeting: फडणवीस सरकारचा धडाका! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 5 महत्त्वाचे मोठे निर्णय

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर

आदित्य बिरला ग्रुपचा ‘अल्का कलेक्शन’ लाँच! ‘दिल अभी भरा नही’च्या नव्या रुपातून सादर

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा

Upvas Recipe : नवरात्री स्पेशल; भगरीपासून सकाळच्या नाश्त्याला बनवा चविष्ट आणि कुरकुरीत डोसा

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव;  ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये तणाव; ‘दुर्गा दौड’ वादात, धार्मिक भावना दुखावल्याने गोंधळ

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Navi Mumbai : शरद पवार गटाला मोठा धक्का, चंद्रकांत पाटील यांचा शिवसेनेत प्रवेश

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Nanded : अशोक चव्हाण यांनी 3150 रुपयांपेक्षा जास्त भाव द्यावा – चिखलीकर

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Paithan News : भागवत कराडांनी केली नुकसानग्रस्त भागाची पाहणी, व्यापाऱ्यांशी साधला संवाद

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Latur : शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजाराची मदत सरकारने द्यावी; अमित देशमुख यांची मागणी

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Dhule : २५ वर्षांपासून रस्ते नाहीत, गटारी नाहीत, धुळ्यातील गुलमोहर सोसायटीचे नागरिक हतबल

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Wardha : तलावाच्या मध्यभागी तरंगते दुर्गा, आरतीसाठी कशी येते काठावर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.