Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Devendra Fadnavis CM of Maharashtra: लोकसभेतील पराभव ते मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेपर्यंत..; फडणवीसांनी विजयश्री खेचून आणली

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले आहेत, विशेषत: भाजपच्या राजकारणात लोकसभेतील पराभवानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत राहिली.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Dec 04, 2024 | 01:19 PM
Devendra Fadnavis CM of Maharashtra: लोकसभेतील पराभव ते मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेपर्यंत..; फडणवीसांनी विजयश्री खेचून आणली
Follow Us
Close
Follow Us:

पुणे:  मागील दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर अखेर आज महायुती सरकारच्या  मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आणि त्यांच्या चाहत्यामंध्ये एकच जल्लोष झाला. देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या घोषणेची त्यांचे चाहते वाट पाहू लागले. पण त्यानंतरही महाराष्ट्राच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. दिल्लीतील गृहमंत्री अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे नाराज होऊन त्यांच्या गावी निघून गेले. मुख्यमंत्रिपदाच्या बदल्या गृहमंत्रीपदाची मागणी एकनाथ शिंदे यांनी भाजपकडे केली होती.त्यामुळे शपथविधीला उशीर होत होता. पण अखेर दोन आठवड्यांच्या प्रतिक्षेनंतर आज महायुतीच्या विधीमंडळाच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंपदी निवड करण्यात आली. पण लोकसभेतील पराभवापासून विधानसभेच्या विजयापर्यंतचा फडणवीसांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते.

लोकसभेतील पराभवापासून मुख्यंमंत्रिपदाच्या घोषणेपर्यंत…फडणवीसांचे मोलाचे योगदान

राज्यात विधनसभा निवडणुकीत भाजपने अभूतपूर्व य़श मिळवत यशाचा झेंडा फडकावला.132 जागा जिंकून भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपने हे अभूतपूर्व यश देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात प्राप्त केले आहे. राज्यात महायुतीने मोठा विजय मिळवला आहे. पण हा विजय देवेंद्र फडणवीसांसाठी सोपा नव्हता.  फडणवीस यांचे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चांगले संबंध नाहीत तर ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लाडके आहेत. भाजपमधील राष्ट्रीय स्तरावरील बड्या नेत्यांमध्येही त्यांची गणना होते. पण लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यासह राज्यातील बहुतांश जागा भाजपने गमावल्या आणि विजयाचा आकडा दुहेरी आकडाही गाठू शकला नाही.

Devendra 2.0: ‘अखेर ते आलेच’; महाराष्ट्रात पुन्हा एकदा ‘देवेंद्र पर्व’; उद्या घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील भाजपचा हा पराभव अनेक अर्थाने फडणवीसांसाठी मोठा राजकीय पराभव होता. या निवडणुकीत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाही महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी या पराभवाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री पद सोडून पक्षासाठी काम करण्याची ऑफर दिली होती.

मात्र, त्यावेळी उपमुख्यमंत्री असतानाही पराभवाचे खापर आपल्याच माथी मारले जात असल्याचा राग त्यांच्या मनात होता. पण लोकसभा निवडणुकीनंतरही भाजपने फडणवीसांना सरकारमधून बाहेर पडू दिले नाही आणि फडणवीस सरकारमध्येच राहिले. पण त्याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी आपला गियर बदलला.  लोकसभा निवडणुकीतील पराभव मागे टाकण्यासाठी फडणवीसांना प्रत्येक खेळी खेळायची होती.

गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक मोठे बदल झाले आहेत, विशेषत: भाजपच्या राजकारणात लोकसभेतील पराभवानंतरही देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका होत राहिली. अनेकदा फडणवीस यांना दिल्लीला पाठवायचे, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष बनवायचे,  केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट करायचे, अशी चर्चाही सुरू झाल्या. पण त्याचकाळात फडणवीसांनी आपले डाव टाकण्यास सुरूवात केली होती. लोकसभेतील पराभवानंतर दुखावलेल्या फडणवीसांनी  राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संपर्क साधत पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली.  त्यांनी आरएसएसलाही विधानसभा निवडणुकीत भाजपसाठी काम करण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीच्या काळात संघ सक्रिय नव्हता.  फडणवीस यांच्या सभांनंतर संघाची टीम सक्रिय झाली. निवडणुकीतील प्रत्येक छोट्या मोठ्या बैठकांपासून मोठमोठ्या सभांपर्यंत फडणवीस आणि भाजपने मायक्रो नियोजन केले होते. निवडणुकीच्या दिवसापर्यंत भाजप मैदानात काम करत होती.

तालिबानचा आणखी एक तानाशाही निर्णय; महिलांना नर्सिंगचे शिक्षण घेण्यापासून बंदी

राज्यातील देवेंद्र फडणवीस यांच्याकडे भाजपचे नेतृत्त्व म्हणून पाहिले जायचे. पण मधल्य काळात हे नेतृत्त्व बदलाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. पण भाजपचे केंद्रीय नेतृत्व आणि संघाच्या हस्तक्षेपामुळे भाजपची लगाम देवेंद्र फडणवीस यांच्या हाती राहिली. विधानसभा निवडणुकीच्या काळातही एकनाथ शिंदे यांचा भाजपच्या केंद्रीय नेतृत्त्वाशी वाढता संपर्क आणि अजित पवार यांची नाराजी या सर्वात भाजपमधूनच फडणविसांच्या विरोधात सक्रीय असलेला गट या सगळ्याचा सामना करत देवेंद्र फडणवीस स्वतःला केंद्रस्थानी ठेवण्यात यशस्वी झाले. निवडणुकीच्या जागावाटपात  महायुतीमध्ये वाटाघाटी करून जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्यात भाजपला यश आले. अखेर फडणवीसांच्या मेहनत फळाला आली आणि विधानसभा निवडणुकीत भाजप अभूतपूर्व बहुमताने विजयी झाली.

पण यानंतरही फडणवीसांचा संघर्ष सुरूच होता. मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांची तळमळ आणि नाराजी कायम होतीच.   निकालानंतरही दोन आठवड्यांपर्यंत भाजपकडून मुख्यमंत्रिपदाचे नाव जाहीर कऱण्यात आले नाही. त्यामुळेही राज्याच्या मुख्यमंत्रिपदाचा पेच वाढला होता. मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत विनोद तावडे यांच्यापासून मुरलीधर मोहोळांपर्यंत अनेकांची नावे आली. पण या सर्वांना मागे टाकत आज फडणवींसांच्या मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली.

संभलमध्ये राजकारण तापले! विरोधी पक्षनेते राहुल गांधी अन् प्रियांका गांधींचा दौरा,

Web Title: From defeat in lok sabha to announcement of chief ministership fadnavis contribution nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2024 | 01:17 PM

Topics:  

  • BJP
  • cm of maharashtra
  • devendra fadanvis
  • RSS

संबंधित बातम्या

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी
1

Nagpur News: नरेंद्र मोदींना निवृत्त करून गडकरींना पंतप्रधान करा…; मोहन भागवतांकडे मोठी मागणी

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?
2

कोण आहेत सीपी राधाकृष्‍णन, ज्यांना NDA ने उपराष्ट्रपती उमेदवार बनवले?

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब
3

Breaking: जेपी नड्डा यांची मोठी घोषणा, NDA चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावावर शिक्कामोर्तब

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा
4

राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे, पुरावे द्या नाहीतर माफी मागा; निवडणूक आयोगाचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.