Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प ‘या’ तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक शनिवारी सादर होणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदाच लोकनियुक्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Feb 26, 2026 | 12:05 PM
पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प 'या' तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 44 वा अर्थसंकल्प 'या' तारखेला; प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा

Follow Us
Follow Us:
  • पिंपरी-चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प शनिवारी
  • प्रशासकीय राजवटीनंतर लोकप्रतिनिधी मांडणार लेखाजोखा
  • विषय समित्यांच्या निवडणुका २ मार्चला
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे २०२६-२७ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक शनिवारी (दि. २८) सादर होणार आहे. विशेष म्हणजे, गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीनंतर पहिल्यांदाच लोकनियुक्त प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर हे नवनिर्वाचित स्थायी समिती सभापतींकडे दुपारी १२ वाजता हे अंदाजपत्रक सुपूर्द करतील.

 

करवाढ नाही, मात्र ‘तिजोरीत खडखडाट’

प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, यंदाच्या ४४ व्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ किंवा दरवाढ प्रस्तावित नाही. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती काहीशी चिंताजनक आहे. शहरात झालेल्या विविध उड्डाणपुलांची कामे, पाणीपुरवठा योजना आणि मोठ्या प्रकल्पांमुळे महापालिकेवर सुमारे ४ हजार ४९३ कोटी रुपयांचे दायित्व असून, ५६० कोटींचे कर्जही आहे. ठेवींमध्ये झालेली घट पाहता, मर्यादित उत्पन्नात विकासकामांचा समतोल राखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर असेल.

‘सुपर सॅटरडे’: सकाळी सभापती निवड, दुपारी बजेट

शनिवारी महापालिकेत राजकीय घडामोडींचा वेग वाढलेला असेल. सकाळी ११ वाजता स्थायी समितीच्या नवीन सभापतींची निवड प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर तासाभरातच होणाऱ्या विशेष सभेत आयुक्तांमार्फत अर्थसंकल्प मांडला जाईल. नियमानुसार १ मार्चपूर्वी अर्थसंकल्प सादर करणे बंधनकारक असल्याने ही धावपळ होत आहे.

विषय समित्यांच्या निवडणुका २ मार्चला

स्थायी समितीसोबतच विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा आणि शिक्षण अशा पाच विषय समित्यांच्या सभापतींची निवडणूक २ मार्च रोजी होणार आहे. या समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे वर्चस्व असून, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) विरोधी भूमिकेत आहे. ६ नगरसेवक असूनही शिवसेनेला या समित्यांमध्ये स्थान मिळालेले नाही.

हे सुद्धा वाचा : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर वाहने अडवून प्रवाशांची लूटमार; फायनान्स कंपनीचे नाव सांगून…

मागील पाच वर्षांतील अर्थसंकल्प (कोटी रुपयांत):

२०२१-२२ : ७,१३९

२०२२-२३ : ६,४९७

२०२३-२४ : ७,१२७

२०२४-२५ : ८,६७६

हे सुद्धा वाचा : वाहनचालकानो सावधान! थकित दंडाची रक्कम 30 दिवसात भरा, नाहीतर…; पुणे पोलिसांचा इशारा

पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मोठा निर्णय

पिंपरी- चिंचवड शहराच्या विकासात मोलाचे योगदान देणारे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मृती जतन करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. महापालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात ‘अजितसृष्टी’ उभारण्याच्या प्रस्तावाला सर्वसाधारण सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. महापौर रवि लांडगे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे. भाजप नेते तथा आमदार महेश लांडगे यांनी अजित पवार यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी हे स्मारक उभारण्याची सूचना केली होती, ज्याला सर्वच पक्षांनी उत्स्फूर्त पाठिंबा दिला. चिंचवड येथील डी-मार्ट समोर ३३.८६ एकर जागेवर महापालिकेची नवीन इमारत साकारत असून, त्यातील ८.६५ एकर जागेवर हे भव्य स्मारक उभारले जाणार आहे.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporations 44th budget to be announced soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 26, 2026 | 12:05 PM

Topics:  

  • BJP
  • PCMC News
  • PCMC Politics
  • Pimpri Chinchwad

संबंधित बातम्या

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी
1

Chiplun च्या भाजप तालुकाध्यक्षांचा तडकाफडकी राजीनामा; जिल्ह्यातील नेतृत्त्वावर व्यक्त केली नाराजी

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत
2

Maharashtra Drought 2026: भाजपाचा मोठा निर्णय! दुष्काळग्रस्तांसाठी नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन अन् दिपेश म्हात्रेंची लाखाची मदत

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
3

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका
4

Sanjay Raut : ‘मोदी पंतप्रधान राहणार नाहीत?’ संजय राऊतांचा मोठा दावा, मोदी-शाह आणि फडणवीसांवर जोरदार टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.