
Goa was freed from 451 years of slavery in just 36 hours Know how the Portuguese were expelled
Goa Liberation Day 2025 : भारताच्या नकाशावर गोवा (Goa) हे छोटेसे राज्य असले तरी त्याचा मुक्तीचा (Goa Liberation Day) इतिहास अत्यंत संघर्षमय आहे. १५ ऑगस्ट १९४७ रोजी जेव्हा संपूर्ण भारत स्वातंत्र्याचा जल्लोष करत होता, तेव्हा गोवा मात्र पोर्तुगीजांच्या पोलादी साखळदंडात जखडलेला होता. पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल ४५१ वर्षे राज्य केले, जे ब्रिटिशांच्या १५० वर्षांच्या राजवटीपेक्षाही अधिक प्रदीर्घ होते. मात्र, १८ आणि १९ डिसेंबर १९६१ च्या त्या ३६ तासांनी इतिहास बदलला.
१५१० मध्ये अल्फोन्सो डी अल्बुकर्क याने गोव्यावर ताबा मिळवला आणि तिथून पोर्तुगीज राजवटीला सुरुवात झाली. पोर्तुगीजांनी केवळ व्यापारच केला नाही, तर स्थानिक गोवेकरांवर धर्मांतराची सक्ती केली, मंदिरे उद्ध्वस्त केली आणि स्थानिक संस्कृती दडपण्याचा प्रयत्न केला. या अन्यायाविरुद्ध वेळोवेळी बंड झाले. राणे कुटुंबाने तर पोर्तुगीजांविरुद्ध तब्बल १४ वेळा शस्त्रे उचलली. दिपाजी राणे, कुस्तोबा राणे आणि दादा राणे यांसारख्या वीरांनी गनिमी काव्याने पोर्तुगीजांना सळो की पळो करून सोडले होते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Vijay Mallya : कर्ज बुडवलं पण स्वॅग तसाच! मल्ल्याच्या वाढदिवसाला लंडनमध्ये जमला ‘या’ सर्वच फरार उद्योगपतींचा मेळावा
विसाव्या शतकात ही चळवळ अधिक संघटित झाली. १८ जून १९४६ रोजी डॉ. राम मनोहर लोहिया यांनी मडगावमध्ये दिलेल्या एका भाषणाने गोव्यात क्रांतीची मशाल पेटवली. म्हणूनच त्यांना ‘गोवा मुक्तीचे जनक’ मानले जाते. पुरुषोत्तम काकोडकर, लक्ष्मीकांत भेंबरे आणि अनेक क्रांतिकारकांनी पोर्तुगीजांच्या तुरुंगात अतोनात छळ सोसला, काहींना तर थेट पोर्तुगालमधील तुरुंगात पाठवण्यात आले. १९५५ मध्ये झालेल्या सत्याग्रहात पोर्तुगीजांनी केलेल्या गोळीबारात अनेक भारतीय शहीद झाले, ज्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळली.
Goa, Daman & Diu Liberation Day marks the watershed moment when these territories were freed from Portuguese rule. It celebrates the courage of freedom fighters and the collective resolve of Indians who ensured the integration of these regions into the Indian Union. pic.twitter.com/fXiGZ8fkGw — Congress (@INCIndia) December 19, 2025
credit : social media and Twitter
अखेर जेव्हा राजनैतिक चर्चेचे सर्व मार्ग खुंटले, तेव्हा तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी लष्करी कारवाईचा निर्णय घेतला. १८ डिसेंबर १९६१ रोजी भारतीय भूदल, नौदल आणि हवाई दलाने एकत्रितपणे गोव्यावर चढाई केली. याला नाव दिले गेले ‘ऑपरेशन विजय’. भारतीय सैन्याच्या प्रचंड ताकदीसमोर पोर्तुगीज सैन्य टिकू शकले नाही. अवघ्या ३६ तासांत, १९ डिसेंबर रोजी पोर्तुगीज गव्हर्नर वासालो ई सिल्वा यांनी बिनशर्त शरणागती पत्करली. ४५१ वर्षांचा अन्याय एका झटक्यात संपला आणि गोव्याच्या मातीत तिरंगा अभिमानाने फडकला.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : HIMARS : चीनच्या नाकावर टिच्चून! अमेरिकेने तैवानला बनवले ‘पॉवरहाऊस’; अखेर रणनीतिक महाकराराला अधिकृत मान्यता
मुक्तीनंतर गोवा, दमण आणि दीव हा केंद्रशासित प्रदेश बनला. पुढे १९८७ मध्ये गोव्याला पूर्ण राज्याचा दर्जा मिळाला. गोव्याच्या या स्वातंत्र्यलढ्याने जगाला दाखवून दिले की भारत आपल्या सार्वभौमत्वासाठी कोणत्याही परकीय शक्तीला आपल्या भूमीवर थारा देणार नाही. आजचा गोवा जरी पर्यटनासाठी प्रसिद्ध असला, तरी त्याच्या प्रत्येक वास्तूमागे आणि समुद्राच्या लाटेमागे त्या अज्ञात क्रांतिकारकांचे रक्त आणि शौर्य दडलेले आहे.
Ans: १९ डिसेंबर १९६१ रोजी गोवा पोर्तुगीजांच्या ताब्यातून मुक्त झाला, म्हणून दरवर्षी १९ डिसेंबर रोजी गोवा मुक्ती दिन साजरा होतो.
Ans: भारतीय सैन्याने गोव्याला मुक्त करण्यासाठी 'ऑपरेशन विजय' ही लष्करी कारवाई राबवली.
Ans: पोर्तुगीजांनी गोव्यावर तब्बल ४५१ वर्षे (१५१० ते १९६१) राज्य केले.