Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Gudi Padwa |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Save Himalayas: हिमालयात दुप्पट वेगाने वितळतोय बर्फ; 2 अब्ज लोकांची तहान भागवणाऱ्या ‘आशियाच्या जलकुंभा’ला लागली गळती, वाचा कारण

Global Warming : हवामान शास्त्रज्ञांनी इशारा दिला आहे की, बर्फ वितळण्याच्या या वेगामुळे पाण्याची तीव्र टंचाई आणि हवामानाशी संबंधित धोक्यांमध्ये वाढ होण्याचा तात्काळ धोका निर्माण झाला आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 22, 2026 | 08:52 AM
himalayan glaciers melting double speed 2 billion people water crisis india impact

himalayan glaciers melting double speed 2 billion people water crisis india impact

Follow Us
Close
Follow Us:
  • २ अब्ज लोकांवर संकट
  • आशियाचे जलस्रोत धोक्यात
  • ICIMOD चा गंभीर इशारा

Himalayan Glaciers Melting Rate 2026 : निसर्गाचा अनमोल ठेवा आणि भारताचा संरक्षक कवच असलेला हिमालय आज एका भीषण संकटातून जात आहे. ज्या हिमनद्यांना आपण ‘आशियाचे जलस्रोत’ (Water Towers of Asia) म्हणतो, त्या आता वेगाने इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहेत. इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटीग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट (ICIMOD) ने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, हिंदुकुश हिमालयीन प्रदेशातील बर्फ वितळण्याचा वेग २००० सालापासून चक्क दुप्पट झाला आहे. हे केवळ पर्यावरणाचे नुकसान नाही, तर मानवी सभ्यतेसाठी विनाशाची नांदी ठरू शकते.

२ अब्ज लोकांच्या अस्तित्वाचा प्रश्न

हिमालयातील या हिमनद्या केवळ बर्फाचे डोंगर नाहीत, तर त्या भारत, पाकिस्तान, चीन आणि बांगलादेशसह ८ देशांमधील २ अब्ज लोकांची जीवनवाहिनी आहेत. गंगा, सिंधू, ब्रह्मपुत्रा, यांगत्झी आणि मेकाँग यांसारख्या आशियातील १० सर्वात मोठ्या नद्या हिमालयातून उगम पावतात. जर हिमनद्या याच वेगाने वितळल्या, तर सुरुवातीला नद्यांना महापूर येतील आणि त्यानंतर या नद्या कायमच्या कोरड्या पडतील. विचार करा, जर गंगा आणि सिंधू नद्या आटल्या, तर कोट्यवधी लोकांच्या पिण्याच्या पाण्याचे, शेतीचे आणि विजेचे काय होईल?

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : World War 3: 24 मार्चला होणार महायुद्ध? 48 तासांचा काऊंटडाऊन सुरु; ट्रम्पची अट न मानल्यास इराणमध्ये पसरणार अंधाराचे साम्राज्य

लहान हिमनद्यांवर मृत्यूची टांगती तलवार

संशोधकांनी एका अत्यंत धक्कादायक बाबीकडे लक्ष वेधले आहे. ज्या हिमनद्यांचा आकार ०.५ चौरस किलोमीटरपेक्षा लहान आहे, त्या मोठ्या हिमनद्यांच्या तुलनेत अधिक वेगाने आकुंचन पावत आहेत. या लहान हिमनद्या स्थानिक पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. त्यांच्या विलोपनामुळे डोंगराळ भागातील गावांमध्ये आतापासूनच पाण्याची तीव्र टंचाई जाणवू लागली आहे. ‘ग्लोबल वॉर्मिंग’ आणि हवामान बदलामुळे हिमालयाचे तापमान जागतिक सरासरीपेक्षा अधिक वेगाने वाढत आहे, परिणामी ‘तिसरा ध्रुव’ म्हणून ओळखला जाणारा हा प्रदेश आता धोक्यात आला आहे.

Himalayan glaciers losing ice at double the rate since 2000 ICIMOD reports glaciers across the Hindu Kush Himalaya have lost nearly 27 metres of ice thickness since 1975.https://t.co/5gQPbOakHx — The Kathmandu Post (@kathmandupost) March 21, 2026

credit – social media and Twitter

हिंदुकुश प्रदेश: आशियाचा कणा

अफगाणिस्तानपासून म्यानमारपर्यंत ३,५०० किलोमीटरमध्ये पसरलेला हिंदुकुश प्रदेश जगातील सर्वात उंच पर्वतश्रेणींनी बनलेला आहे. यामध्ये ५४,००० हून अधिक हिमनद्या आहेत. या नद्यांवर केवळ पिण्याचे पाणीच नाही, तर अन्न सुरक्षा आणि जलविद्युत प्रकल्पही अवलंबून आहेत. जर नद्यांचा प्रवाह विस्कळीत झाला, तर संपूर्ण आशिया खंडात अन्नाचा तुटवडा निर्माण होऊन आर्थिक महामंदी येऊ शकते. भारत आणि चीनसारख्या वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांसाठी हे सर्वात मोठे आव्हान ठरणार आहे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Crude Oil: ‘तुमची सवलत तुमच्याकडेच ठेवा’ ट्रम्पच्या ‘ऑईल गेमवर’ इराणची गुगली; 30 दिवसांच्या ऑफरला म्हटलं ‘खोटी आशा’

विनाशाच्या उंबरठ्यावर कोणकोणते देश?

ICIMOD च्या अहवालानुसार, या संकटाचा सर्वाधिक फटका भारत, चीन, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांना बसणार आहे. या देशांमधील लोकसंख्या हिमालयातील नैसर्गिक चक्रावर अवलंबून आहे. शास्त्रज्ञांनी ‘जागतिक हिमनदी दिना’चे औचित्य साधून जगाला इशारा दिला आहे की, जर आपण कार्बन उत्सर्जन तातडीने कमी केले नाही, तर या हिमनद्या वाचवणे अशक्य होईल.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हिमालयातील हिमनद्या वितळल्या तर भारतावर काय परिणाम होईल?

    Ans: भारतातील गंगा, सिंधू आणि ब्रह्मपुत्रा नद्यांचा प्रवाह विस्कळीत होईल, ज्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई, शेतीचे नुकसान आणि वीज निर्मितीवर गंभीर परिणाम होईल.

  • Que: बर्फ वितळण्याचा वेग किती वाढला आहे?

    Ans: २००० सालापासून हिंदुकुश हिमालयीन प्रदेशातील बर्फ वितळण्याचा वेग पूर्वीच्या तुलनेत दुप्पट झाला आहे.

  • Que: ICIMOD ही संस्था नक्की काय आहे?

    Ans: ICIMOD ही काठमांडू (नेपाळ) येथील एक आंतर-सरकारी संस्था असून भारत आणि चीनसह ८ देश तिचे सदस्य आहेत, जे हिमालयातील हवामानावर संशोधन करतात.z

Web Title: Himalayan glaciers melting double speed 2 billion people water crisis india impact

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • global warming effect
  • himalaya
  • Melting glaciers

संबंधित बातम्या

Gokyo Lakes: हिमालयाचं गुपित! नेपाळमधील ‘हे’ सरोवर पृथीवरील स्वर्ग; एव्हरेस्टच्या सावलीत वसलेला जगातील सर्वात उंच ‘फिरोजी’ खजिना
1

Gokyo Lakes: हिमालयाचं गुपित! नेपाळमधील ‘हे’ सरोवर पृथीवरील स्वर्ग; एव्हरेस्टच्या सावलीत वसलेला जगातील सर्वात उंच ‘फिरोजी’ खजिना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.