Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Health Day 2026 :महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये

महाराष्ट्रात आरोग्य विभाग मुख्यतः प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील सेवा पुरवतो. यात उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि प्रथम संदर्भ युनिट्स यांचा समावेश होतो.

  • By सुरुची कदम
Updated On: Apr 07, 2026 | 11:47 AM
महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये

महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य यंत्रणा अपुरी! राज्यात केवळ २ कुष्ठरोग रुग्णालये; ४ मनोरुग्णालये

Follow Us
Follow Us:

मुंबई : ७ एप्रिलला साजऱ्या होणाऱ्या जागतिक आरोग्य दिनानिमित्त राज्यातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचे वास्तव समोर आले असून, प्राथमिक आणि दुय्यम आरोग्य सुविधांमध्ये मोठी तूट असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. राज्यात कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलडाणा आणि मुंबई येथे प्रत्येकी एक क्षयरोग रुग्णालय असून, कुष्टरोग रुग्णालय केवळ कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यात आहेत. ठाणे, पुणे, नाशिक, कोल्हापूर, छ. संभाजीनगर, अमरावती, नागपूर येथे आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्रे आहेत. मनोरुग्णालयेही केवळ चार आहेत. पुणे, ठाणे, रत्नागिरी आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये मनोरुग्णालये आहेत.(फोटो सौजन्य – istock)

World Health Day 2026 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?

महाराष्ट्रात आरोग्य विभाग मुख्यतः प्राथमिक आणि दुय्यम स्तरावरील सेवा पुरवतो. यात उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, कम्युनिटी हेल्थ सेंटर आणि प्रथम संदर्भ युनिट्स यांचा समावेश होतो. तर तृतीय स्तरावरील सेवा प्रामुख्याने वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय मार्फत चालवल्या जातात. मुंबईसारख्या महानगरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सार्वजनिक आरोग्य सेवा हाताळतात. महाराष्ट्र राज्य कृती आराखडात ग्रामीण आरोग्य आकडेवारी २०२१-२२ नुसार राज्यात जिल्हा मुख्यालयांवर २३ जिल्हा रुग्णालये आणि ८ सामान्य रुग्णालये असून, या सर्वांची एकत्रित खाट क्षमता ९,५९३ इतकी आहे. मात्र, लोकसंख्येच्या निकषांनुसार आवश्यक असलेल्या आरोग्य सुविधांच्या तुलनेत मोठी तूट दिसून येते. तज्ज्ञांच्या मते, वाढती लोकसंख्या, शहरीकरण आणि बदलते आजारांचे स्वरूप लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधांमध्ये तातडीने वाढ करणे आवश्यक आहे.

आरोग्यसंपन्न गाव कसे राहील आणि लोक निरोगी कसे राहतील हे जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दवाखान्याची गरजच भासू नये, अशा आरोग्यदायी सवयी अंगीकारून समाज निरोगी ठेवणे आवश्यक आहे. काही पातळीवर कमतरता असली तरीही योजनांच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यावर आमचा भर आहे. नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळाल्यास आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि परिणामकारक होऊ शकते, अशी माहिती – डॉ. कैलास बाविस्कर, उपसंचालक यांनी दिली आहे.

जागतिक आरोग्याच्या शाश्वतीसाठी WHO ची झाली स्थापना; जाणून घ्या 07 एप्रिलचा इतिहास

ग्रामीण भागात प्रत्येक ३,००० ते ५,००० लोकसंख्येमागे एक उपकेंद्र, २०,००० ते ३०,००० लोकसंख्येमागे एक प्रा. आरोग्य केंद्र आणि ८०,००० ते १.२ लाख लोकसंख्येमागे एक काम्युनिटी हेल्थ सेंटर असणे अपेक्षित आहे. शहरी भागात एक केंद्र असणे आवश्यक आहे. झोपडपट्टी क्षेत्रात ५०,००० लोकसंख्येमागे एक केंद्र असणे आवश्यक आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

💡

Frequently Asked Questions

  • Que: जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो?

    Ans: जागतिक आरोग्य दिन दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो.

  • Que: जागतिक आरोग्य दिन का साजरा केला जातो?

    Ans: लोकांमध्ये आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे, आरोग्य सेवांचे महत्त्व पटवून देणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

  • Que: या दिवशी कोणत्या उपक्रमांचे आयोजन केले जाते?

    Ans: आरोग्य शिबिरे, मोफत तपासणी, जनजागृती मोहिमा, व्याख्याने आणि फिटनेस उपक्रम आयोजित केले जातात.

Web Title: Inadequate public health system in maharashtra only 2 leprosy hospitals in the state 4 psychiatric hospitals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Good for Health
  • Health News
  • World Heart Day news

संबंधित बातम्या

Dark Chocolate: डार्क चॉकलेट खाणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर; पण कसे? जाणून घ्या
1

Dark Chocolate: डार्क चॉकलेट खाणे ठरू शकते आरोग्यासाठी फायदेशीर; पण कसे? जाणून घ्या

PMC Health News: खासगी रुग्णालयांतील बेडची माहिती आता एका क्लिकवर; पीएमसीचा रिअल-टाइम डॅशबोर्ड येणार
2

PMC Health News: खासगी रुग्णालयांतील बेडची माहिती आता एका क्लिकवर; पीएमसीचा रिअल-टाइम डॅशबोर्ड येणार

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा
3

भरती, भरती, भरती! Health Department मध्ये ५००० नव्या पदांना मंत्रिमंडळाची मान्यता; मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.