Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Health Day 2026 : आधुनिक तंत्रज्ञान आणि विज्ञानाच्या बळावर आरोग्यसेवेची नवी दिशा; AI ठरतोय गेमचेंजर?

World Health Day : आज जागतिक आरोग्य दिवस असून जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेनिमित्त हा दिवस साजरा केला जातो. याचा उद्देश जगभरातील असुरक्षित लोकांना मदत कताना आरोग्य आणि सुरक्षितेला प्रोत्साहन देणे आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Apr 07, 2026 | 08:54 AM
World Health Day

World Health Day

Follow Us
Follow Us:

आज जागतिक आरोग्य दिन आहे. हा दिवस जागतिक आरोग्य संघटनेच्या स्थापनेनिमित्त १९५० पासून दरवर्षी ७ एप्रिल रोजी साजरा केला जातो. ‘आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानाच्या पाठीशी उभे रहा’ ही यावर्षीची थीम असून शाश्वत जीवनशैली आणि प्रतिबंधात्मक आरोग्याबाबत जागरूकता वाढवणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

‘आजार झाल्यावर उपचार’ ही पारंपरिक संकल्पना आता मागे पडत असून ‘आजार होण्यापूर्वीच प्रतिबंध’ ही नवी दिशा आरोग्य क्षेत्राने स्वीकारली आहे. विज्ञान, अत्याधुनिक संशोधन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यांच्या बळावर आरोग्यसेवा झपाट्याने बदलत असून, यंदाच्या जागतिक आरोग्य दिनाच्या ‘आरोग्यासाठी एकत्र, विज्ञानाच्या पाठीशी उभे रहा’ या थीममधून हाच बदल अधोरेखित होत आहे.

हे देखील वाचा : पुण्यात उभं राहतंय ‘पक्ष्यांचं गाव’! ‘या’ गावाने निर्माण केला पर्यावरण संवर्धनाचा आदर्श

गेल्या काही वर्षांत तंत्रज्ञानामुळे आरोग्य क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. एमआरआय, सीटी स्कॅन आणि जीनोमिक तपासण्या यांसारख्या प्रगत साधनांमुळे आजारांचे लवकर आणि अचूक निदान शक्य झाले आहे. कर्करोगासारख्या गंभीर आजारांमध्ये ‘पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट’मुळे प्रत्येक रुग्णासाठी स्वतंत्र उपचारपद्धती ठरवली जात आहे, ज्यामुळे उपचारांचा यशदर वाढला आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हे या परिवर्तनाचे केंद्रबिंदू ठरत आहे. एआयच्या साहाय्याने रुग्णांचा वैद्यकीय डेटा विश्लेषित करून आजारांचा धोका आधीच ओळखता येतो.

वैद्यकीय प्रतिमांचे विश्लेषण, उपचार योजना तयार करणे आणि रोगांचे पूर्वानुमान यामध्ये एआय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. टेलिमेडिसिन आणि डिजिटल हेल्थ तंत्रज्ञानामुळे दुर्गम भागातील रुग्णांनाही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला सहज उपलब्ध होत आहे. विज्ञानाधारित दृष्टिकोनामुळे लसीकरण, बायोटेक्नॉलॉजी आणि जनुकीय संशोधनाला चालना मिळाली असून, मधुमेह, हृदयरोग आणि कर्करोग यांसारख्या आजारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी संशोधन वेगाने पुढे सरकत आहे. ‘वन हेल्थ’ संकल्पनेनुसार मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्या आरोग्याचा समन्वय साधण्यावरही भर दिला जात आहे.

डॉ. कविता राऊत म्हणतात ‘विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आरोग्यसेवा अधिक रुग्णकेंद्रित आणि अचूक झाली आहे. एआय आणि डेटा अ‍ॅनालिटिक्सच्या साहाय्याने भविष्यात आजार होण्यापूर्वीच त्याचा धोका ओळखून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होईल. हेच खऱ्या अर्थाने निरोगी समाजाचे भविष्य आहे.’ तसेच हृदयरोगतज्ञ डॉ. अभिजित काळेंच्या मते, ‘आधुनिक तंत्रज्ञानामुळे हृदयविकाराचे निदान अधिक अचूक झाले आहे. अँजिओग्राफी, स्टेंटिंग आणि रोबोटिक सर्जरीमुळे रुग्णांचे जीव वाचवणे अधिक सोपे झाले आहे.’

हे देखील वाचा : जागतिक वारसस्थळांची जबाबदारी कोणाची? युद्धामध्ये भक्ष्यस्थानी वारसास्थळे अन् इतिहासाचे साक्षीदार

Web Title: World health day 2026 how ai and science rewriting the rules of healthcare

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 08:54 AM

Topics:  

  • Health News
  • World news

संबंधित बातम्या

Mahadev App: बनावट इंडोनेशियन पासपोर्ट अन् इंटरपोलची रेड नोटीस; ‘असा’ अडकला महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्रकर
1

Mahadev App: बनावट इंडोनेशियन पासपोर्ट अन् इंटरपोलची रेड नोटीस; ‘असा’ अडकला महादेव ॲपचा मालक सौरभ चंद्रकर

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण
2

Britain Colonial Loot: ‘वर्षानुवर्षे भारतासह जगाला लुटले..’ आता ब्रिटनची ‘या’ देशांकडून नुकसानभरपाईची मागणी, वाचा कारण

AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?
3

AITechnology: ‘AI तंत्रज्ञान लीक झालं तर…’ चीनचा अलीबाबा, बाइटडान्सला मोठा इशारा, काय आहे बीजिंगचा मास्टरप्लॅन?

PM Modi Indonesia Visit : भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार; PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार
4

PM Modi Indonesia Visit : भारत-इंडोनेशिया सामुद्रधुनी उभारणार; PM मोदींच्या दौऱ्यात दोन्ही देशांत महत्त्वपूर्ण करार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.