Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vande Mataram : राष्ट्रीय गीत ‘वंदे मातरम्’ला झाली 150 वर्षे पूर्ण; जाणून घ्या 07 नोव्हेंबरचा इतिहास

वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत त्यांच्या 'आनंदमठ' या कादंबरीत समाविष्ट आहे. यानिमित्त संपूर्ण देशामध्ये उत्सव साजरा केला जात आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Nov 07, 2025 | 11:02 AM
India national song Vande Mataram 150 years by Bankim Chandra Chatterjee 07 November History

India national song Vande Mataram 150 years by Bankim Chandra Chatterjee 07 November History

Follow Us
Close
Follow Us:

Vande Mataram: भारताचे राष्ट्रीय गीत असलेले ‘वंदे मातरम्’ या गीताला आज 150 वर्षे पूर्ण होत आहेत. वंदे मातरम् हे बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी १८७० मध्ये लिहिलेले एक गीत आहे. हे गीत त्यांच्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत समाविष्ट आहे. हे गीत स्वातंत्र्यलढ्यात प्रेरणास्रोत ठरले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम गायले. १९३७ मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या गाण्याचे पहिले दोन श्लोक भारताचे राष्ट्रीय गीत म्हणून स्वीकारले, ज्यामुळे ते राष्ट्रीय गीत बनले आहे. आज संपूर्ण देशामध्ये राष्ट्रीय गीत वंदे मातरमचे 150 वे वर्षे साजरे केले जात आहे.

07 नोव्हेंबर रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना

  • 1619 : एलिझाबेथ स्टुअर्टला बोहेमियाच्या राणीचा मुकुट देण्यात आला.
  • 1665 : लंडन गॅझेट हे सर्वात जुने जर्नल प्रथम प्रकाशित झाले.
  • 1875 : ‘वंदे मातरम्’, भारतमातेचे वर्णन करणारे गीत बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांनी लिहिले.
  • 1879 : वासुदेव बळवंत फडके यांना जन्मठेप शिक्षा ठोठवण्यात आली.
  • 1893 : महिला मताधिकार : अमेरिकेतील कोलोरॅडो राज्यातील महिलांना मतदानाचा अधिकार देण्यात आला, असे करणारे दुसरे राज्य.
  • 1917 : पहिले महायुद्ध – गाझाच्या तिसऱ्या लढाईत ब्रिटिश सैन्याने गाझा ताब्यात घेतला.
  • 1936 : प्रभात चा संत तुकाराम हा चित्रपट पुण्यातील प्रभात चित्र्पटगृहात प्रकाशित झाला.
  • 1944 : फ्रँकलिन डी. रुझवेल्ट चौथ्यांदा अमेरिकेच्या अध्यक्षपदी निवडून आले.
  • 1951 : एम. पतंजली शास्त्री यांनी भारताचे दुसरे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारला.
  • 1990 : मेरी रॉबिन्सन आयर्लंडच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष बनल्या.
  • 1996 : नासाने मार्स ग्लोबल सर्वेयर लाँच केले.
  • 2001 : बेल्जियमची राष्ट्रीय विमान कंपनी ‘सबेना’ दिवाळखोर झाली.

नवराष्ट्र विशेष लेख वाचण्यासाठी क्लिक करा

07 नोव्हेंबर रोजी जन्म दिनविशेष

  • 1858 : ‘बिपिन चंद्र पाल’ – स्वातंत्र्यसेनानी यांचा जन्म. (मृत्यू : 20 मे 1932)
  • 1867 : ‘मेरी क्यूरी’ – नोबेल पारितोषिक विजेत्या पोलिश-फ्रेन्च भौतिकशास्त्रज्ञ यांचा वाॅर्सा पोलंड येथे जन्म. (मृत्यू : 4 जुलै 1934)
  • 1868 : ‘मोरो केशव दामले’ – व्याकरणकार व निबंधकार यांचा जन्म. (मृत्यू : 30 एप्रिल 1913)
  • 1879 : ‘लिऑन ट्रॉट्स्की’ – रशियन क्रांतिकारक यांचा जन्म. (मृत्यू : 21 ऑगस्ट 1940)
  • 1884 : ‘डॉ. पांडुरंग सदाशिव खानखोजे’ – क्रांतिकारक, विद्वान, कृषीतज्ञ, इतिहासकार आणि गदर पार्टी चे शिल्पकार यांचा जन्म. (मृत्यू : 22 जानेवारी 1967)
  • 1888 : ‘सर चंद्रशेखर वेंकट रमण’ – नोबेल पारितोषिक विजेते भारतीय भौतिकशास्त्रज्ञ यांचा जन्म. (मृत्यू : 21 नोव्हेंबर 1970)
  • 1900 : ‘प्रा. गोगिनेनी रंगा नायकुलू’ – स्वातंत्र्यसैनिक, संसदपटू, शेतकरी चळवळीतील नेते आणि काँग्रेसचे पुढारी यांचा जन्म. (मृत्यू : 9 जून 1995)
  • 1903 : ‘भास्कर धोंडो कर्वे’ – शिक्षणशास्त्र, मानस व बालमानस या विषयांचे लेखक यांचा जन्म.
  • 1912 : ‘श्री चिथिरा थिरुनल बलराम वर्मा’ – त्रावणकोरचे महाराज यांचा जन्म.
  • 1915 : ‘गोवर्धन धनराज पारिख’ – महाराष्ट्रातील विचारवंत व शिक्षणतज्ञ यांचा जन्म.
  • 1954 : ‘कमल हासन’ – अभिनेता, निर्माता, दिग्दर्शक, पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1960 : ‘श्यामप्रसाद’ – भारतीय चित्रपट निर्माते यांचा जन्म.
  • 1971 : ‘त्रिविक्रम श्रीनिवास’ – भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1975 : ‘वेंकट प्रभू’ – भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि पटकथालेखक यांचा जन्म.
  • 1980 : ‘कार्तिक’ – भारतीय गायक-गीतकार यांचा जन्म.
  • 1981 : ‘अनुष्का शेट्टी’ – भारतीय अभिनेत्री यांचा जन्म.

राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

07 नोव्हेंबर रोजी मृत्यू दिनविशेष

  • 1562 : मारवाडचे ‘राव मालदेव राठोड’ यांचे निधन. (जन्म : 5 डिसेंबर 1511)
  • 1862 : ‘बहादूरशहा जफर’ – दिल्लीचा शेवटचा बादशहा यांचे निधन. (जन्म : 24 ऑक्टोबर 1775)
  • 1905 : ‘कृष्णाजी केशव दामले’ – आधुनिक मराठी काव्याचे प्रवर्तक म्हणून ओळखले जाणारे एक श्रेष्ठ कवी यांचे निधन. (जन्म : 7 ऑक्टोबर 1866)
  • 1923 : ‘अश्विनीकुमार दत्ता’ – भारतीय शिक्षक यांचे निधन. (जन्म : 25 जानेवारी 1856)
  • 1947 : ‘के. नतेसा अय्यर’ – भारतीय-श्रीलंकेचे पत्रकार आणि राजकारणी यांचे निधन.
  • 1963 : ‘यशवंत गोपाळ जोशी’ – मराठी लघुकथाकार व प्रसाद मासिकाचे संपादक यांचे निधन. (जन्म : 17 डिसेंबर 1901)
  • 1980 : ‘स्टीव्ह मॅकक्‍वीन’ – हॉलिवूड अभिनेता यांचे निधन. (जन्म : 24 मार्च 1930)
  • 1981 : ‘विल डुरांट’ – अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ यांचे निधन. (जन्म : 5 नोव्हेंबर 1885)
  • 1998 : ‘पं. जितेंद्र अभिषेकी’ – शास्त्रीय गायक, संगीतकार व शास्त्रीय संगीताचे अभ्यासक यांचे निधन. (जन्म : 21 सप्टेंबर 1929)
  • 2000 : ‘सी.सुब्रह्मण्यम’ – ज्येष्ठ गांधीवादी नेते, माजी केंद्रीयमंत्री, महाराष्ट्राचे माजी राज्यपाल आणि हरितक्रांतीचे अध्वर्यू यांचे निधन. (जन्म : 30 जानेवारी 1910)
  • 2006 : ‘पॉली उम्रीगर’ – भारतीय क्रिकेटर आणि मॅनेजर यांचे निधन. (जन्म : 28 मार्च 1926)
  • 2009 : ‘सुनीता देशपांडे’ – लेखिका व स्वातंत्र्यसैनिक यांचे निधन. (जन्म : 3 जुलै 1926)
  • 2015 : ‘बाप्पादित्य बंदोपाध्याय’ – भारतीय दिग्दर्शक आणि कवी यांचे निधन. (जन्म : 28 ऑगस्ट 1970)

Web Title: India national song vande mataram 150 years by bankim chandra chatterjee 07 november history

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 07, 2025 | 11:01 AM

Topics:  

  • dinvishesh
  • Dinvishesh news
  • marathi dinvishesh

संबंधित बातम्या

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आले ; जाणून घ्या ०६ नोव्हेंबर रोजीचा इतिहास
1

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा निवडून आले ; जाणून घ्या ०६ नोव्हेंबर रोजीचा इतिहास

बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या 05 नोव्हेंबरचा इतिहास
2

बराक ओबामा बनले अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष; जाणून घ्या 05 नोव्हेंबरचा इतिहास

सशस्त्र चळवळ उभी करणारे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती; जाणून घ्या 04 नोव्हेंबरचा इतिहास
3

सशस्त्र चळवळ उभी करणारे वासुदेव बळवंत फडके यांची जयंती; जाणून घ्या 04 नोव्हेंबरचा इतिहास

Dinvishesh: उत्तर पेशवाईमधील एक लोकप्रिय कलावंत अनंत फंदी यांचे निधन; जाणून घ्या 03 नोव्हेंबरचा इतिहास
4

Dinvishesh: उत्तर पेशवाईमधील एक लोकप्रिय कलावंत अनंत फंदी यांचे निधन; जाणून घ्या 03 नोव्हेंबरचा इतिहास

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.