बिहारमध्ये पार पडले पहिल्या टप्प्यातील मतदान (फोटो- सोशल मीडिया)
बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण
11 तारखेला होणार दुसऱ्या टप्प्यातील मतदान
14 नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार
Bihar Voting: आज बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. आज बिहारमध्ये पहिल्या टप्प्यात रेकॉर्डब्रेक मतदान झाल्याचे समोर आले आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार बिहारमध्ये आज पहिल्या टप्प्यासाठी तब्बल 64.66 टक्के मतदान झाले आहे. आज 18 जिल्ह्यांमधील 121 जागांसाठी मतदान पार पडले.
आज बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले. 121 उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद झाले आहे. यामध्ये तेजस्वी यादव, तेज प्रताप आणि उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदान करणारे एकूण 3 कोटी 75 लकह मतदान होते. यामध्ये जवळपास 2 कोटी पुरुष व 1.80 कोटी महिलांचा समावेश होता.
Press Note
06.11.2025 pic.twitter.com/QqN9w4cR8V — Chief Electoral Officer, Bihar (@CEOBihar) November 6, 2025
बिहारचे DCM विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांना लखीसराय यांना विरोध करण्यात आला आला. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. हा हल्ला झाल्यावर सिन्हा यांनी राजदवर आरोप केला आहे. ताफ्यावर हल्ला झाल्यानंतर उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी हा प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. याब हल्ल्यासाठी त्यांनी राजदला जबाबदार धरले आहे. उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांच्या ताफ्यावर लखीसपुर येथे हल्ला करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री आणि लखीसराय मतदारसंघातील भाजप उमेदवार विजय कुमार सिन्हा यांच्या गाडीला राजद समर्थकांनी घेरले. त्यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. तसेच मुर्दाबाद आशा घोषणा देण्यात आल्या.
मोठी बातमी! बिहारचे DCM विजय सिन्हांच्या ताफ्यावर हल्ला; नक्की घडले काय?
काय म्हणाले उपमुख्यमंत्री विजय सिन्हा?
हे राजदचे गुंड आहेत. एनडीएची सत्ता येणार आहे. यांचे गुंड मला गावात जाऊन देत नाहीत. विजय सिन्हा जिंकणार आहेत. त्यांनी माझ्या पोलिंग एजंटला हाकलून लावले. त्याला मतदान करू दिले नाही.
मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार चक्क म्हशीवर आला
बिहारच्या वैशाली जिल्ह्यात देखील आज मतदान सुरू आहे. या जिल्ह्यातील एका उमेदवाराचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला आहे. वैशाली जिल्ह्यातील भगवानपुर मतदारसंघातील आरजेडी नेता चक्क म्हशीवर बसून मतदानासाठी आल्याचे दिसून आले. आरजेडी पक्षाचे उमेदवार केदार प्रसाद यादव हे चक्क म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आले होते. याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
जिया हो बिहार के लाला! मतदान करण्यासाठी लालू यादवांचा उमेदवार म्हशीवर बसला अन्….; Video Viral
काय म्हणाले उमेदवार केदार प्रसाद यादव?
पाच वर्षांनी लोकशाहीचा उत्सव आला आहे. आज सर्वांनी मतदान केले पाहिजे. शेतकरी असल्याने मी आज म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. मी सर्वांना मतदान करण्याचे आवाहन करतो.
भारत एक कृषीप्रधान देश आहे. आम्ही शेतकरी आहोत. यासाठी मी म्हशीवर बसून मतदान करण्यासाठी आलो. केदार प्रसाद यादव यांचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.






