
India’s 2,000-year-old Mundeshwari Temple the world’s oldest functioning shrine
Mundeshwari Temple : बिहारच्या (Bihar) कैमूर जिल्ह्यातील मुंडेश्वरी टेकडीवर वसलेले मुंडेश्वरी माता मंदिर आज जगातील सर्वात जुने कार्यरत मंदिर म्हणून ओळखले जाते. समुद्रसपाटीपासून ६०८ फूट उंचीवरील या टेकडीवर वसलेले हे प्राचीन शक्तीपीठ हजारो वर्षांपासून अखंडपणे पूजेचे केंद्रबिंदू राहिले आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने (ASI) विविध शिलालेख, शकेकालीन पुरावे आणि ब्राह्मी लिपीतील लेखांच्या आधारे या मंदिराचे बांधकाम सुमारे १०८ इसवी सनाचे असल्याचे मान्य केले आहे. यामुळे मुंडेश्वरी मंदिराला ‘जगातील सर्वात जुने अखंड कार्यरत मंदिर’ हा मान मिळाला आहे.
बिहारचा इतिहास अत्यंत समृद्ध मानला जातो. पाटलीपुत्र (आजचे पटना), मौर्य साम्राज्याची भरभराट, सम्राट अशोकाचे राजकारण आणि बौद्ध धर्माची वाढ यांच्यामुळे बिहारला प्राचीन भारतीय संस्कृतीतील अद्वितीय स्थान प्राप्त झाले. या ऐतिहासिक भूमीतच मुंडेश्वरी मंदिराची उभारणी झाली, ज्याचा उल्लेख मार्कंडेय पुराणातही आढळतो. मंदिरातील सापडलेल्या राजा दत्तगमनी यांच्या नाण्यामुळे त्याची प्राचीनता अधिक दृढ होते. बौद्ध साहित्य सांगते की राजा दत्तगमनी अनुराधापुर वंशातील होते आणि त्यांनी इ.स.पूर्व १०१ ते ७७ दरम्यान श्रीलंकेवर राज्य केले. या कालखंडाचा संबंध या मंदिराशी जोडला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Science News: विज्ञानात 100 वर्षानंतर क्रांती! ब्लॅकहोलच्या टक्करीनंतर ऐकू आला ‘रिंगडाउन’ सिग्नल; समजून घ्या यामागील तथ्य
मुंडेश्वरी मंदिराची वास्तुकला भारतीय मंदिर परंपरेतील एक दुर्मिळ रचना आहे. संपूर्ण मंदिर दगडांनी बांधले असून त्याची अष्टकोनी रचना अत्यंत अद्वितीय आहे. नागर शैलीतील या मंदिरात चार दिशांना दरवाजे आणि खिडक्या असून भिंतींवर सुबक शिल्पकला कोरलेली आहे. प्रवेशद्वारावर द्वारपाल, गंगा आणि यमुना यांच्या सुंदर मूर्ती दिसतात. मंदिराच्या गर्भगृहात भगवान शिवाचे पाचमुखी शिवलिंग विराजमान आहे, जे येथील मुख्य आकर्षण मानले जाते. या शिवलिंगाबद्दल लोककथा सांगते की ते सूर्यकिरणांच्या स्थितीनुसार दिवसातून तीन वेळा रंग बदलते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही वेळा ते वेगळ्या छटेत दिसते, असा जनविश्वास आहे.
मुंडेश्वरी देवीबद्दलची आख्यायिका देखील तितकीच रोचक आहे. असे मानले जाते की राक्षस चंड आणि मुंड यांनी परिसरात आतंक माजवला होता. लोकांनी देवी शक्तीला प्रार्थना केल्यानंतर देवी भवानी पृथ्वीवर अवतरल्या आणि दोन्ही राक्षसांचा वध केला. मुंडने आपला जीव वाचवण्यासाठी या टेकडीवर आसरा घेतला, परंतु देवीने त्याचा नाश याच ठिकाणी केला. म्हणून देवीला “मुंडेश्वरी” असे नाव मिळाले. येथे देवीला ‘वाराही’ स्वरूपात म्हणजेच महिषवाहिनी आकृतीत दर्शविले जाते.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Swarnagiri Venkateswara Temple : देव भेटतो तिथे!’असा’ अलौकिक चमत्कारातून झाला जन्म पृथ्वीवरील स्वर्ग असलेल्या स्वर्णगिरी मंदिराचा
आजही या मंदिरात अखंड पूजा, आरती, आणि धार्मिक विधी सुरू राहिले आहेत. हजारो वर्षांपासून एकही दिवस पूजा न थांबता सुरू असल्यामुळेच हे मंदिर जगातील सर्वात प्राचीन कार्यरत मंदिराचा दर्जा राखून आहे. भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने मंदिराचे जतन केले असून पर्यटकांच्या सोयीसाठी परिसर विकसित केला आहे.
Ans: भारताच्या बिहारमधील कैमूर जिल्ह्यातील मुंडेश्वरी मंदिर हे जगातील सर्वात जुने कार्यरत मंदिर मानले जाते.
Ans: विविध शिलालेख आणि पुराव्यानुसार हे मंदिर सुमारे १०८ इसवी सनातील आहे.
Ans: लोककथेनुसार हे शिवलिंग सूर्याच्या प्रकाशानुसार दिवसातून तीन वेळा रंग बदलते.