
most dangerous active volcano trekking spots kilimanjaro etna vesuvius
Best active volcano treks in the world 2026 : जेव्हा आपण ज्वालामुखीचा (Volcano) विचार करतो, तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आगीच्या नद्या, आकाशात झेपावणारे धुराचे लोट आणि विनाशाचे दृश्य उभे राहते. साधारणपणे ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यावर लोक तिथून लांब पळतात, पण जगात असे काही ‘वेडे’ साहसी प्रेमी आहेत जे या धगधगत्या लाव्हाच्या जवळ जाण्यासाठी चक्क डोंगर चढतात. १००० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त गरम लावा आणि कोणत्याही क्षणी होणारा स्फोट अशा परिस्थितीत ज्वालामुखीवर चढणे म्हणजे मृत्यूला आमंत्रण देण्यासारखेच आहे. तरीही जगभरातील अनेक सक्रिय ज्वालामुखींवर ट्रेकिंगला अधिकृत परवानगी आहे. आज आपण अशाच काही रोमांचक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या ज्वालामुखींची माहिती घेणार आहोत.
५,८९५ मीटर उंचीवर वसलेले माउंट किलिमांजारो हे आफ्रिकेतील सर्वात उंच शिखर असून ते तीन ज्वालामुखींचे (शिरा, मावेन्झी आणि किबो) मिश्रण आहे. हे केवळ एक पर्वत शिखर नसून एक सक्रिय ज्वालामुखी आहे. इथल्या ‘किबो’ विवराजवळ पोहोचणे हे कोणत्याही गिर्यारोहकाचे स्वप्न असते. हा ट्रेक पूर्ण करण्यासाठी साधारण नऊ दिवस लागतात. जानेवारी ते मार्च आणि जून ते ऑक्टोबर हा काळ या मोहिमेसाठी सर्वोत्तम मानला जातो. मात्र, इथली कमी होत जाणारी ऑक्सिजनची पातळी आणि तीव्र थंडी पर्यटकांची खरी परीक्षा घेते.
Magnificent view of Mount Kilimanjaro, Tanzania pic.twitter.com/pc19YUugOh — Zoom Afrika (@zoomafrika1) February 12, 2026
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : War Alert: इकडे तेल अवीवमध्ये PM मोदी, तर ‘तिकडे’ लँड झाले अनेक अमेरिकन F-22 फायटर जेट; ‘इस्लामिक नाटो’चे अस्तित्व संपवणारा प्लॅन
इटलीतील माउंट एटना हा युरोपमधील सर्वात सक्रिय आणि प्रसिद्ध ज्वालामुखी आहे. विशेष म्हणजे १५०० ईसापूर्व काळापासून या ज्वालामुखीचा उद्रेक सतत सुरू आहे. असे असूनही, येथे पर्यटकांना ट्रेकिंगची परवानगी आहे. जर तुमचे नशीब बलवत्तर असेल, तर ट्रेक दरम्यान तुम्हाला जमिनीतून निघणारा धूर आणि लाव्हाच्या हालचाली जवळून पाहता येतात. येथे मार्गदर्शकाशिवाय जाणे कायद्याने गुन्हा असून मे ते सप्टेंबर दरम्यान येथे जाणे अधिक सुरक्षित मानले जाते.
A drone captured stunning footage of lava flowing from a fissure on Italy’s Mount Etna on New Year’s Day. https://t.co/ND4WzBlEMK pic.twitter.com/CtsPagTvyJ — ABC News (@ABC) January 2, 2026
credit – social media and Twitter
इ.स. ७९ मध्ये ज्या ज्वालामुखीने संपूर्ण ‘पॉम्पेई’ शहर राखेत गाडले होते, तोच हा विनाशकारी माउंट व्हेसुव्हियस! आजही याच्या नावाचा थरकाप उडतो, पण साहसी प्रेमींसाठी हे एक आवडीचे ठिकाण आहे. विवराच्या शिखरापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त ३० मिनिटे लागतात, पण तिथून दिसणारे दृश्य आयुष्यभर लक्षात राहणारे असते. निसर्गाच्या विध्वंसक शक्तीचा अनुभव घेण्यासाठी येथे दरवर्षी लाखो पर्यटक गर्दी करतात.
In AD 79, Mount Vesuvius erupted in Italy, destroying Pompeii and nearby Herculaneum, home to a vast library full of Ancient Roman text. Today, just 1% of the library remains, crushed, carbonized, and vulcanized. These scrolls were left in the unrolled state by philologists,… pic.twitter.com/ANosQ80yMn — Big Think (@bigthink) February 21, 2025
credit – social media and Twitter
इंडोनेशियातील बाली हे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेच, पण तिथला ‘माउंट बतूर’ हा सक्रिय ज्वालामुखी ट्रेकर्सचा लाडका आहे. पहाटेचा सूर्योदय पाहण्यासाठी लोक येथे रात्रीपासूनच ट्रेकिंग सुरू करतात. साधारण दोन तासांच्या चढाईनंतर तुम्ही शिखरावर पोहोचता. एप्रिल ते ऑक्टोबर हा काळ या ट्रेकसाठी सर्वोत्तम आहे. इथून दिसणारा विस्तीर्ण लाव्हाचा परिसर आणि सभोवतालचे निसर्गसौंदर्य डोळ्यांचे पारणे फेडते.
On top of Mount Batur, Bali, Indonesia pic.twitter.com/LGhh4QRIBH — AP (@vithushaji) August 19, 2024
credit – social media and Twitter
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Turkey F-16 Crash: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात! उड्डाणानंतर काही मिनिटांतच तुर्कीचे F-16 फायटर जेट कोसळले; पहा भयानक VIDEO
इंडोनेशियातील ‘माउंट मेरापी’ वर चढाई करणे म्हणजे खरोखर मृत्यूशी खेळण्यासारखे आहे. हा जगातील सर्वात सक्रिय आणि धोकादायक ज्वालामुखींपैकी एक म्हणून ओळखला जातो. येथील हवामान आणि ज्वालामुखीची स्थिती कोणत्याही क्षणी बदलू शकते. तरीही, अंगावर काटा आणणारा अनुभव घेण्यासाठी जगभरातून पर्यटक येथे येतात. रात्रीचा प्रवास करून सूर्योदयाच्या वेळी विवराजवळ पोहोचणे हा एक अद्भूत अनुभव असतो. मे ते ऑक्टोबर दरम्यान येथे ट्रेकिंग करणे श्रेयस्कर ठरते.
#Indonesia – Lava flows from the crater of Mount Merapi as seen from Tunggularum, in Yogyakarta.
A picture by #AFP photographer
Agung Supriyanto pic.twitter.com/9M0QdugUO4 — AFP Photo (@AFPphoto) February 24, 2021
credit – social media and Twitter
Ans: हे अत्यंत जोखमीचे असते. स्थानिक प्रशासनाकडून परवानगी असल्यासच आणि तज्ज्ञ मार्गदर्शकासोबतच असा ट्रेक करावा. ज्वालामुखीच्या क्रिया वाढल्यास हे ट्रेक्स त्वरित बंद केले जातात.
Ans: बहुतांश ज्वालामुखींसाठी मे ते सप्टेंबर किंवा कोरडा ऋतू (Dry Season) सर्वोत्तम असतो, कारण पावसाळ्यात निसरड्या वाटांमुळे धोका वाढतो.
Ans: हो, मजबूत ट्रेकिंग शूज, श्वसनासाठी मास्क (विषारी वायूपासून वाचण्यासाठी), थर्मल कपडे आणि प्रथमोपचार किट सोबत असणे अनिवार्य आहे.