
International Artist Day 2026 International Artist Day History
कलेच्या माध्यमातून जगामध्ये रंग भरणाऱ्या, भावनांना शब्द अन् सुरांचे रूप देणाऱ्या आणि संस्कृतीला जिवंत ठेवणाऱ्या जगभरातील तमाम कलाकारांचा सन्मान करण्याचा दिवस म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय कलाकार दिन’ (International Artist Day). दरवर्षी २५ ऑक्टोबर रोजी हा विशेष दिवस जागतिक पातळीवर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. चित्रकार असो वा संगीतकार, लेखक असो वा अभिनेता किंवा एखादा शिल्पकार हे सर्वच कलाकार आपल्या अनोख्या दृष्टीकोनातून मानवी जीवनाला आणि समाजाला समृद्ध करत असतात. कला ही केवळ करमणुकीचे साधन नसून ती मानवी आत्म्याची अभिव्यक्ती आहे, याची जाणीव हा दिवस आपल्याला करून देतो.
आंतरराष्ट्रीय कलाकार दिन साजरा करण्याची सुरुवात कशी झाली, हा इतिहास अतिशय रंजक आहे. २००४ मध्ये कॅनडातील प्रसिद्ध चित्रकार ख्रिस मॅक्लूर (Chris MacClure) यांनी या विशेष दिवसाची स्थापना केली. ख्रिस मॅक्लूर हे ‘रोमँटिक रिअॅलिझम’ (Romantic Realism) या शैलीतील चित्रकलेसाठी ओळखले जातात. कलाकारांना त्यांच्या कष्टाची आणि कल्पकतेची योग्य ओळख मिळावी, तसेच समाजातील कलाप्रेमींना एकत्र आणता यावे, या उद्देशाने त्यांनी या चळवळीची पायाभरणी केली.
२५ ऑक्टोबर या तारखेची निवड करण्यामागे एक महत्त्वाचे कारण आहे. याच दिवशी जगातील महान आणि प्रभावशाली चित्रकार पाब्लो पिकासो (Pablo Picasso) यांचा जन्म झाला होता. पिकासो यांच्या कलाविश्वातील महान योगदानाचा आदर करण्यासाठी आणि त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून २५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक कलाकार दिन म्हणून निश्चित करण्यात आला. तेव्हापासून आजपर्यंत दरवर्षी जगभरातील अनेक देशांमध्ये कला प्रदर्शन, कार्यशाळा आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून हा दिवस साजरा केला जातो.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला
कला ही कोणत्याही एका चौकटीत किंवा मर्यादेत बांधलेली नाही. मानवी भावना व्यक्त करण्याचे शेकडो मार्ग कलेच्या माध्यमातून उपलब्ध होतात. चित्रकला, संगीत, नृत्य, साहित्य (लेखन), अभिनय, शिल्पकला आणि आताच्या डिजिटल युगातील डिजिटल आर्ट किंवा फोटोग्राफी—या सर्वच क्षेत्रांतील कलाकार आपल्या कौशल्याने जग सुंदर बनवत असतात.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Philippines Plane Crash: हवेतच झाला चक्काचूर! फिलीपिन्समध्ये 2 लष्करी प्रशिक्षण विमानांची एकमेकांना टक्कर; 4 वैमानिकांचा मृत्यू
कॅनव्हासवर रंगांची उधळण करणारे चित्रकार किंवा दगडाला आकार देऊन जिवंत शिल्पात रूपांतरित करणारे शिल्पकार मानवी संस्कृतीचा इतिहास जपत असतात. प्राचीन गुंफाचित्रांपासून ते आधुनिक म्युरल्सपर्यंतचा प्रवास हा चित्रकलेच्या सामर्थ्याची साक्ष देतो.