Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

World Forest Day 2025 : “हिरवाई जपूया, पृथ्वीला वाचवूया!” निसर्गाचे संरक्षण म्हणजे भविष्यासाठी योगदान

International Day of Forests 2024 : संपूर्ण जगभर 21 मार्च रोजी जागतिक वन दिन साजरा केला जातो. हा दिवस जंगलांचे महत्त्व आणि त्यांचे पर्यावरणातील योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Mar 21, 2025 | 10:44 AM
International Day of Forests Preserve greenery protect the future

International Day of Forests Preserve greenery protect the future

Follow Us
Close
Follow Us:

International Day of Forests 2024 : संपूर्ण जगभर 21 मार्च रोजी जागतिक वन दिन (International Day of Forests) साजरा केला जातो. हा दिवस जंगलांचे महत्त्व आणि त्यांचे पर्यावरणातील योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी समर्पित आहे. वन ही पृथ्वीवरील पर्यावरणाचा आधारस्तंभ आहेत. हवा, पाणी, अन्न आणि औषधे यांसारख्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी वने महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. त्यामुळे संयुक्त राष्ट्र महासभेने 2012 मध्ये अधिकृतपणे आंतरराष्ट्रीय वन दिनाची घोषणा केली, आणि तेव्हापासून हा दिवस दरवर्षी मोठ्या प्रमाणावर साजरा केला जात आहे.

जागतिक वन दिन: इतिहास आणि सुरुवात

1971 मध्ये युरोपियन कृषी संघटनेच्या 23 व्या बैठकीत जगभरातील जंगलांचे लयास जाणारे प्रमाण लक्षात घेऊन 21 मार्च हा दिवस जागतिक वनीकरण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर, 2012 मध्ये संयुक्त राष्ट्र महासभेने या दिवसाला अधिकृत मान्यता दिली, आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर वनसंवर्धनाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी अनेक प्रयत्न सुरू झाले. संयुक्त राष्ट्र महासभेच्या नेतृत्वाखालील वनांवरील सहयोगी भागीदारी, युनायटेड नेशन्स फोरम ऑन फॉरेस्ट्स आणि अन्न व कृषी संघटना (FAO) या संस्थांच्या सहकार्याने हा दिवस जगभरात साजरा केला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : शहरेच नव्हे, गावातूनही होताहेत चिमण्या गायब, महाराष्ट्रात चिमणी पक्षांचे संवर्धन गरजेचे

2024 ची थीम : “वन आणि नवोपक्रम – चांगल्या जगासाठी नवीन उपाय”

यावर्षीच्या जागतिक वन दिनाची थीम आहे – “वन आणि नवोपक्रम: चांगल्या जगासाठी नवीन उपाय”.

ही थीम स्पष्टपणे दाखवते की मानवाच्या अस्तित्वाचा आणि विकासाचा मुख्य आधार वने आहेत. आपण घेत असलेले ऑक्सिजन, पिण्याचे पाणी, अन्न, औषधे आणि निवारा हे सर्व जंगलांशी निगडीत आहेत. त्यामुळे वनसंवर्धनाशिवाय मानवाच्या पुढील पिढ्यांचे भविष्य सुरक्षित होऊ शकत नाही.

भारत आणि वनसंवर्धनाचे प्रयत्न

स्वातंत्र्यानंतर भारताची लोकसंख्या तिपटीने वाढली, मात्र देशातील वनक्षेत्र सतत राखले गेले आहे.

द्विवार्षिक वन अहवालानुसार (2019) भारतातील एकूण वनक्षेत्र 3,576 चौरस किमीने वाढले आहे, जी 0.56% वाढ दर्शवते. 2007 पासून, घनदाट जंगलांचे क्षेत्रफळ 1,275 चौरस किमीने वाढले आहे, ज्यात अपवादात्मक घनदाट जंगल (70% पेक्षा जास्त कॅनोपी घनता) आणि मध्यम घनता असलेली जंगले (40-70% घनता) यांचा समावेश आहे. भारत सरकार आणि विविध संस्थांकडून सातत्याने वृक्षारोपण, वनसंवर्धन आणि पर्यावरणीय पुनरुज्जीवनाच्या मोहिमा राबवल्या जात आहेत.

वनसंवर्धनाचे महत्त्व आणि जबाबदारी

  1. पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी जंगले महत्त्वाची भूमिका बजावतात.
  2. जंगले हवामान बदलावर नियंत्रण ठेवतात आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेतात.
  3. सेंद्रिय जैवविविधता टिकवण्यासाठी जंगले आधारभूत आहेत.
  4. वनाशेजारील समुदायांचे जीवनमान सुधारण्यासाठी आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी वने महत्त्वाची भूमिका बजावतात.

जागतिक वन दिनानिमित्त संकल्प

जागतिक वन दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून, पर्यावरण जतन करण्याच्या संकल्पाचा दिवस आहे. आजच्या पिढीने वनसंवर्धनासाठी पुढाकार घेतला नाही, तर भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागतील. प्रत्येक व्यक्तीने झाडे लावणे, जंगलतोड थांबवणे आणि नैसर्गिक संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : भारतात देखील आहेत CIAचे सिक्रेट अड्डे? JFK च्या फाईल्समध्ये अमेरिकन गुप्तचर संस्थेची गुपिते उघड

जागरूकतेचा संदेश

21 मार्च रोजी साजरा केला जाणारा जागतिक वन दिन हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित नसून, तो पर्यावरण रक्षणाच्या दिशेने एक जागरूकतेचा संदेश आहे. वने ही आपली नैसर्गिक संपत्ती असून, ती टिकवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. भारतासह संपूर्ण जगभरात विविध स्तरांवर वनसंवर्धनासाठी नवीन उपाययोजना आणि नवोपक्रम राबवले जात आहेत, जे भविष्यातील पिढ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

Web Title: International day of forests preserve greenery protect the future nrhp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 21, 2025 | 05:30 AM

Topics:  

  • Forest Range
  • lifestyle news
  • Wild Animals

संबंधित बातम्या

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय
1

वॅक्स, रेझर की ट्रिमर… वजाईनावर कशाचा वापर करावा? महिलांनो, आजच जाणून घ्या योग्य पर्याय

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria
2

शरीराच्या ‘या’ भागात असते सर्वात जास्त घाण, आंघोळीनंतरही राहतात लाखो Bacteria

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato
3

Gardening Tips: आता बाजारातून महागडे टॉमेटो विकत घ्यायची गरज नाही, घरीच पिकवा ‘लालचुटूक’ Tomato

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!
4

सुंदर दिसण्याच्या नादात चेहऱ्यावर कधीच लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा चेहरा अक्षरहः सडेल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.