Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

सकाळी उठताच पोट फुगणं आणि गॅसचा त्रास जाणवतोय का? यामागे आजार नव्हे तर तुमच्या रोजच्या काही चुकीच्या सवयी कारणीभूत असू शकतात. वेळेत लक्ष दिलं नाही तर याचा वाईट परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो.

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 28, 2025 | 08:15 PM
सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

सकाळी उठताच पोट फुगल्यासारखं वाटतं? नकळत करताय या 8 मोठ्या चुका; आजपासूनच सुधार आणा नाहीतर महागात पडेल

Follow Us
Close
Follow Us:
  • उशिरा आणि भरपूर खाल्ल्यामुळे पचन मंदावते आणि सकाळी पोट जड वाटते.
  • अन्न न चावता गिळणे, तळलेले व प्रक्रिया केलेले पदार्थ गॅस वाढवतात.
  • कमी पाणी पिणे आणि मानसिक ताण यामुळे पचन बिघडून पोटफुगी होते.
दिवसभराच्या ऊर्जेसाठी सकाळची वेळ महत्त्वाची माली जाते. आपली सकाळची सुरुवात जर चांगली असेल तर संपूर्ण दिवस चांगला जातो. तथापि सकाळची सुरुवातच जर वाईट झाली तर दिवसभरासाठीचा आपला मूड खराब होऊन जातो. अनेकदा काही चुकीच्या सवयींमुळे सकाळी उठताच पोटफुगी आणि गॅसच्या समस्या जाणवू लागतात. याचा संपूर्ण दिवसाच्या दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. सतत जर तुम्हाला ही समस्या उद्भवत असेल तर आपल्या रोजच्या सवयींमध्ये तुम्ही काही महत्त्वपूर्ण बदल करणे गरजेचे आहे. चला तर मग सकाळी गॅस आणि पोटफुगी निर्माण करणाऱ्या वाईट सवयी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.

डाय-केमिकल्सना करा रामराम! पांढरे केस 7 दिवसांतच नैसर्गिकरित्या होतील काळे, या घरगुती पदार्थांची पेस्ट केसांना लावा

रात्रीचे जड जेवण

अनेकदा रात्रीच्या वेळी आपण भरगच्च आहार घेतो. रात्रीच्या वेळी कधीही जड अन्न खाऊ नये यामुळे पचनक्रिया मंदावते आणि अन्न व्यवस्थित पचत नाही. हेच कारण आहे की सकाळी उठताच पोट जड वाटू लागते.

अन्न न चावता गिळणे

अनेकांना अन्न न चावट पटकन गिळून टाकण्याची सवय असते. तुमची ही सवय अत्यंत चुकीची असून यामुळे शरीरात वायू निर्माण होण्याची शक्यता असते. कधीही अन्न हे व्यवस्थित चावून मग गिळावे.

तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न

तळलेले आणि प्रक्रिया केलेले अन्न शरीरात चरबीचा थर जमा करते, ज्यामुळे पोटफुगी आणि गॅसची समस्या आणखीन वाढते.

पुरेसे पाणी न पिणे

शरीराला पाण्याची नितांत गरज असते. कमी पाणी पिल्याने पचनसंस्था कमकुवत होऊ शकते, ज्यामुळे पचनक्रिया बिघडू शकते आणि गॅस तयार होतो. शिवाय यामुळे डिहायड्रेशनची समस्याही उद्भवते.

ताणतणाव असणे

मानसिक ताणाचा थेट परिणाम पोटाच्या आरोग्यावर होतो. चिंता पचनक्रियेत व्यत्यय आणते, ज्यामुळे गॅस वाढतो.

चेहऱ्यावरील ग्लो वाढवण्यासाठी वाफ घेण्याच्या पाण्यात मिक्स करा ‘हे’ पदार्थ, त्वचा होईल आतून स्वच्छ

गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे

काही असे पदार्थ जे शरीरात गॅस जमा करतात. हरभरा, राजमा, कोबी, ब्रोकोली यांसारख्या भाज्या आणि डाळींचे सेवन सकाळी पोटफुगीची समस्या निर्माण करते. तुम्हाला दररोज पोट फुगण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत असेल तर या गोष्टींचा विचार करा आणि आपल्या जीवनशैलीत योग्य ते बदल घडवून आणा.

टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Web Title: Unhealthy habits that causes morning bloating gas issue lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 08:15 PM

Topics:  

  • gas home remedies
  • Health Tips
  • lifestyle news
  • stomach health

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा
1

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
2

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक
3

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा
4

कॅन्सर उपचारावर आता आयुर्वेदाचीही जोड, टाटा स्मारक केंद्रात ‘समाकलन 2.0’ची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.