Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘मूल होत नाही कमतरता तर स्त्री मध्येच…’, टेस्ट केल्यानंतर सत्य समोर, आजही बाळ होण्यासाठी द्यावी लागते महिलांना परीक्षा

गर्भधारणा न होण्यासाठी अनेकदा महिलांना दोषी ठरवले जाते. टोमणे, प्रश्न आणि मानसिक दबाव यातून जे काही सहन केले ते अनेक महिलांनी आतापर्यंत सांगितले आहे. मात्र आता पुरुषांनीही टेस्ट करून घेणे गरजेचे आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Dec 27, 2025 | 02:01 PM
बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही टेस्ट करून घेणे आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)

बाळ होण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही टेस्ट करून घेणे आवश्यक (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:
  • गर्भधारणेपूर्वी तपासणी करणे किती आवश्यक?
  • महिला आणि पुरुषांनी दोघांनीही करावी तपासणी
  • आजही महिलांना बाळ न होण्यासाठी ठरवले जाते दोषी 
आजही, समाज असा दृष्टिकोन बाळगतो की जर स्त्रीला गर्भधारणा होत नसेल तर ती चूक स्त्रीचीच आहे. म्हणूनच लोक अनेकदा हे मान्य करण्यास नकार देतात की ही समस्या पुरुषाचीही असू शकते. पुरुषाच्या कमतरतेमुळेही गर्भधारणेत अडचणी येऊ शकतात हे समाजाला अजूनही स्वीकारणे कठीण आहे.

अशीच कहाणी नाव न सांगण्याच्या अटीवर एका महिलेने सांगितले. साक्षी (बदललेले नाव)च्या बाबतीतही हेच घडले. सर्वांनी तिला दोष दिला आणि तिचा नवरा आणि त्याचे संपूर्ण कुटुंबही चाचणी करून घेण्यास तयार नव्हते. साक्षी सांगते की हे तिच्यासाठी खूपच धक्कादायक आणि त्रासदायक होते. 

लग्नानंतर, मूल होण्याबाबत विचारणा 

लग्नानंतर सुमारे दोन वर्षांनी घरात सर्वांची विचारणा सुरू झाली, तेव्हा लोक म्हणू लागले, “तुम्ही आणखी किती वाट पाहणार आहात? आता बाळाला जन्म देण्यासाठी तयार व्हा.” लोक उदाहरणे देऊ लागले, “बघा, तुमच्या मावशीच्या मुलाचे लग्न झाले आणि त्यांना एका वर्षातच मूल झाले.” कोणी म्हणायचे, “बघा, तुमच्या आत्याच्या मुलीला मुलगी आहे.”

कुटुंबाकडून, नातेवाईकांकडून आणि अगदी शेजाऱ्यांकडून अशा गोष्टी ऐकून साक्षी पूर्णपणे थकली होती असं तिने म्हटले. दररोज कोणीतरी मूल होण्याचा विषय काढत असे. शेवटी, नवऱ्याला साक्षीने सांगितले की, आपण मूल होण्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे, कारण दबाव फक्त कुटुंबाकडून नव्हता, तर त्या विचारानेही तिला ताण येऊ लागला होता.

‘आईबाबा होऊ शकत नाही…’, वाढती व्यसनाधीनता, बदलती जीवनशैली कारणीभूत; ‘IVF’ उपचारातून वंध्यत्वावर मात शक्य

मुलासाठी प्रयत्न सुरू 

नवऱ्यानेदेखील होकार दिला आणि दोघेही गर्भधारणेचा प्रयत्न करू लागले. पण तो महिना यशस्वी झाला नाही. महिन्यानंतरही मासिक पाळी आली. नवऱ्याला जेव्हा हे सांगितले तेव्हा त्याने धीर दिला, “ठीक आहे, आपण पुन्हा प्रयत्न करू.” त्यानंतर, एक महिना दुसरा महिना, दुसऱ्या महिन्यातून तिसऱ्या महिन्यात असे महिने गेले, आशा पुन्हापुन्हा जागृत झाली आणि नंतर ती धुसर झाली. साक्षीने सांगितले की, कळायच्या आत, एक वर्ष उलटून गेले, पण अजूनही गर्भधारणा झाली नव्हती आणि लोकांमध्ये अजून कुजबूज वाढून मानसिक ताण वाढू लागला होता. 

डॉक्टरांचा सल्ला, साक्षीचे रिपोर्ट्स नॉर्मल

वर्षानुवर्षे प्रयत्न करून आणि लोकांच्या टोमण्यांना तोंड देऊन, साक्षी पूर्णपणे थकली. शेवटी, हार मानून डॉक्टरांची भेट घेतली. खूप संकोच केल्यानंतर, नवरा या गोष्टीसाठी सहमत झाला, पण तो पूर्णपणे तयार नव्हता. डॉक्टरकडे गेल्यानंतर त्यांनी काही चाचण्या लिहून दिल्या. साक्षीने सांगितले की, तिने त्या सर्व चाचण्या केल्या आणि काही दिवसांनी, रिपोर्ट आले. सर्व काही पूर्णपणे सामान्य होते. डॉक्टर म्हणाले, “तुमचे सर्व रिपोर्ट ठीक आहेत.”

मग डॉक्टरांनी नवऱ्याकडे पाहिले आणि म्हणाले, “तुझी तपासणी आता आवश्यक आहे.” हे ऐकून नवऱ्याच्या रागाचा स्फोट झाला, “माझी तपासणी? माझ्यात काय चूक असू शकते? समस्या तर महिलेमध्ये असते.” हे शब्द ऐकून साक्षीच्या पायाखालची जमीनच क्षणभर सरकली. तिच्या मनात फक्त एकच प्रश्न उभा राहिला तो म्हणजे आजही विचारसरणी किती मागासलेली आहे, जिथे आजही महिलांना मुले नसल्याबद्दल दोष दिला जातो.  त्या क्षणी तिचा नवरा दुसरे काहीही बोलला नाही; तो फक्त फाईल उचलून घरी परतला.

साक्षीचा त्रास 

यानंतर साक्षी शांतपणे खोलीत गेले आणि एकही शब्द न बोलता बेडवर झोपली. त्यानंतर, सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले, पण नेहमीप्रमाणे टोमणे मारायला सुरुवात झाली. कोणी म्हणायचे, “जर तुम्हाला आता मूल झाले नाही तर तुमचे वय सरेल,” तर कोणी टोमणे मारायचे, “तुम्ही डॉक्टरकडे गेलात, पण तरीही तुम्हाला मूल झाले नाही.” हे सर्व शांतपणे ती ऐकून खोलीत येऊन एकटीच रडायची. हळूहळू, हे दुःख वाढायला लागले आणि ते नवऱ्याच्या सर्व लक्षात येऊ लागले. त्याला साक्षीची शांतता, डोळ्यातील ओलावा आणि सतत तुटणे दिसले. त्यानंतरच यावर मार्ग काढावा लागेल हे त्याला कळले.

‘गरोदर न राहण्यासाठी Contraceptive Pill घेतली, मी आई नाही का होऊ शकणार?’, मुलीच्या प्रश्नावर डॉक्टरांनी सांगितले सत्य

नवऱ्याने घेतला चाचणीचा निर्णय, कमतरता निघाली

शेवटी, नवऱ्याने स्वतःची चाचणी घेण्याचा निर्णय घेतला. पुन्हा डॉक्टरांकडे गेलो. त्यांनी तपासणी केली आणि शुक्राणूंचा नमुना दिला. चाचणी पूर्ण झाली आणि काही दिवसांनी अहवाल आला. अहवालात असे दिसून आले की शुक्राणूंची गुणवत्ता खराब झाली होती, ज्यामुळे गर्भधारणेमध्ये समस्या येत होत्या. हे ऐकून साक्षीचा नवरा पूर्णपणे शांत झाला. त्याला शब्दही सुचत नव्हते. 

डॉक्टरांनी मग स्पष्ट केले की यात लाज वाटण्यासारखे काही नाही; उपचार शक्य आहेत आणि योग्य वेळी योग्य पावले उचलल्याने परिस्थिती सुधारू शकते. डॉक्टरांचे म्हणणे ऐकून दोघांचाही सर्व गोंधळ दूर झाला आणि काही महिन्यांच्या उपचारानंतर साक्षीला गर्भधारणा झाली आणि तिने गोंडस मुलीला जन्म दिला. 

सारांशः मूल होत नसेल तर वेळीच तपासणी करून घ्यायला हवी आणि दोष फक्त स्त्री मध्येच नसतो तर पुरुषामध्येही असू शकतो. आजही समाजात असणारी ही मानसिकता बदलण्याची गरज आहे. 

Web Title: Pregnancy tips how still women blamed for not conceiving baby how man needs to do test for this

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2025 | 02:01 PM

Topics:  

  • lifestyle news
  • pregnancy

संबंधित बातम्या

Bats: वटवाघूळ झाडाला कायमच उलटी लटकलेली का असतात? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण
1

Bats: वटवाघूळ झाडाला कायमच उलटी लटकलेली का असतात? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

FSSAI चा मोठा निर्णय: आता ‘ग्रीन टी’ला आता चहा म्हणता येणार नाही; विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा
2

FSSAI चा मोठा निर्णय: आता ‘ग्रीन टी’ला आता चहा म्हणता येणार नाही; विक्रेत्यांवर कारवाईचा इशारा

टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा
3

टक्कल पडलेल्या टाळूवर पुन्हा केस उगवायचा आहेत? मग नारळाच्या तेलात या 2 गोष्टी मिसळून मसाज करा आणि कमाल पहा

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे
4

महागडे सुपरफूड विसरा, भाजलेले चणे आणि मनुक्याचे मिश्रण आरोग्यासाठी कोणत्या खजिन्यातून कमी नाही; जाणून घ्या फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.