• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Special Coverage »
  • International Lefthanders Day Why Only 12 Are Left Handed

International Lefthanders Day 2025 : जगात सरासरी 12% लोक आहेत डावखुरे; जाणून घ्या यामागील रंजक कारण

International Lefthanders Day : जगभरातील बहुतेक लोक उजव्या हाताने काम करतात, परंतु सुमारे १२ टक्के लोक असे आहेत जे त्यांचे दैनंदिन काम डाव्या हाताने करतात. फक्त एक टक्के लोक दोन्ही हातांनी त्यांचे काम करू शकतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Aug 13, 2025 | 06:30 AM
International Lefthanders Day Why only 12% are left-handed

International Lefthanders Day : जगात सरासरी १२% लोक आहेत डावखुरे; जाणून घ्या यामागील रंजक कारण ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

International Lefthanders Day 2025 : दरवर्षी १३ ऑगस्ट हा दिवस जगभरात एक वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या लोकांसाठी खास ठरतो  आंतरराष्ट्रीय डावखुरा दिन. उजव्या हाताचा वापर बहुतेक लोकांचा जीवनशैलीचा भाग असला तरी, सुमारे १२% लोक आपली सर्व कामे डाव्या हाताने करतात. अजूनही आश्चर्याची गोष्ट म्हणजे, केवळ १% लोक अशा दुर्मिळ श्रेणीत मोडतात, जे दोन्ही हातांनी समान कौशल्याने काम करू शकतात.

इतिहास : गैरसमजांपासून गौरवापर्यंतचा प्रवास

डावखुरा दिन साजरा करण्यामागे जागरूकतेचा मोठा हेतू आहे. हा दिवस १९७६ मध्ये डीन आर. कॅम्पबेल यांनी ‘लेफ्ट हँडर्स इंटरनॅशनल’ या संस्थेद्वारे सुरू केला. परंतु डावखुरा लोकांचा इतिहास सोपा नाही. १६०० च्या दशकात डावखुरेपणाला सैतानाशी जोडून पाहिले जात असे. शाळांमध्ये मुलांना जबरदस्तीने उजव्या हाताने लिहायला लावले जाई, तर समाजात त्यांच्या क्षमतांकडे दुर्लक्ष केले जाई. आज मात्र ही परिस्थिती बदलली आहे आणि डावखुरा लोकांचा विशेषपणे गौरव केला जातो.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : ऊर्जाक्षेत्रात रशियाची LNG झेप; जागतिक ऊर्जा खेळातील नवा मोहरा, अमेरिका–युरोपलाही नितांत गरज

विशेष गुण आणि आव्हाने

डावखुरा व्यक्ती मेंदूच्या उजव्या बाजूचा अधिक वापर करतो, ज्यामुळे त्यांच्यात सर्जनशीलता, कलात्मकता आणि विचारांची वेगळी दिशा दिसून येते. चित्रकार, संगीतकार, वास्तुविशारद अशा अनेक कलाक्षेत्रात डावखुरांचा मोठा वाटा आहे.
तथापि, त्यांना काही आव्हानेही असतात.

  • उजव्या हाताच्या लोकांसाठी डिझाइन केलेली साधने वापरताना अडचण
  • ऍलर्जी व दुर्मिळ स्वयं-रोगप्रतिकारक आजारांचा अधिक धोका
  • मायग्रेन आणि झोपेच्या गुणवत्तेशी संबंधित समस्या

विज्ञान काय सांगते?

  • जगातील ८७% लोक उजव्या हाताचे आहेत, तर फक्त १२% लोक डावखुरे
  • डावखुरांना स्ट्रोकमधून तुलनेने लवकर बरे होण्याची शक्यता
  • QWERTY कीबोर्डवर डाव्या हाताने ३,००० पेक्षा अधिक इंग्रजी शब्द टाइप होऊ शकतात, तर उजव्या हाताने केवळ ३०० शब्द
  • गर्भाशयात गर्भ डावा हात चोखतोय का हेही त्याच्या आयुष्यातील हाताची प्रवृत्ती ठरवू शकते
  • डावखुरेपणावर अनुवंशशास्त्राचाही प्रभाव असतो

डावखुरा दिन साजरा करण्यामागील उद्दिष्ट

हा दिवस फक्त ‘वेगळेपण’ साजरा करण्यापुरता मर्यादित नाही. तो डावखुरांना समाजात भेडसावणाऱ्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करतो.

  • जागरूकता निर्माण करणे – शिक्षण, क्रीडा, तंत्रज्ञानात डावखुरांना भेडसावणाऱ्या अडचणींवर प्रकाश टाकणे.
  • विविधता साजरी करणे – डावखुरांच्या अद्वितीय प्रतिभा व योगदानाला ओळख देणे.
  • बदलांची मागणी – उत्पादक व उद्योगांना डावखुरांसाठी अनुकूल साधने व उपकरणे तयार करण्यास प्रवृत्त करणे.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : डंकी रूटच्या शेवटच्या दरवाजाला का म्हटले जाते मृत्यूचे द्वार? वाचा याबाबत धक्कादायक तथ्ये

डावखुरांचा सन्मान : आपली जबाबदारी

डावखुरा दिन म्हणजे फक्त एक तारीख नाही, तर मानवी मेंदूची अद्वितीय रचना, विविधतेची ताकद आणि सर्जनशीलतेचा उत्सव आहे. आपल्या आजूबाजूच्या डावखुरा व्यक्तींना त्यांच्या वेगळेपणाचा अभिमान वाटावा, यासाठी हा दिवस एक उत्तम निमित्त ठरतो.

Web Title: International lefthanders day why only 12 are left handed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2025 | 06:30 AM

Topics:  

  • Lifesciences
  • lifestyle news
  • navarashtra special story
  • special story

संबंधित बातम्या

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा
1

काळवंडलेल्या अंडरआर्म्सपासून कायमची सुटका; ३ घरगुती उपाय देतील नैसर्गिक उजळपणा

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल
2

जमिनीवर नाही तर हवेत लटकत आहेत या अनोख्या हॉटेलच्या खोल्या; इतकी लग्झरी की 5 स्टारही यापुढे फेल

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…
3

अहो आश्चर्यम! भारतातील असं अनोखं मंदिर जिथे पुजली जाते Bullet 350, ‘तो’ एक अपघात आणि पुढे जे घडलं…

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक
4

1 रुपयांच्या शॅम्पूने करा गंजलेला तवा साफ, दोन मिनिटांतच कोणत्याही मेहनतीशिवाय मिळेल नव्यासारखी चमक

ताज्या बातम्या

पुढे वाचा
PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

PMP मधून नक्की जाऊ कोणत्या गावा? केवळ 500 रूपयांचा ‘हा’ बोर्ड…; प्रवाशांना प्रचंड मनस्ताप

Feb 17, 2026 | 02:35 AM
टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

टिपू सुलतानवरुन महाराष्ट्रात पेटला वाद! सपकाळांच्या कौतुकावर मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार पलटवार

Feb 17, 2026 | 01:15 AM
पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

पुणे पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश, 6 जणांना अटक; तब्बल ‘इतक्या’ कोटींचे ड्रग्ज पकडले

Feb 17, 2026 | 12:30 AM
पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

पुढील आठवड्यात PM मोदी इस्रायलच्या दौऱ्यावर? भारत-इस्रायल FTA कराराची शक्यता

Feb 16, 2026 | 11:23 PM
AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

AUS vs SL: ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून बाद? कांगारूंना 8 विकेट्सने पराभूत करत श्रीलंकेची सुपर 8 मध्ये एंट्री; निसांकाचे नाबाद शतक

Feb 16, 2026 | 10:24 PM
‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

‘या’ तीन 350CC बाईकवर धडकते प्रत्येक तरुणाचे हृदय! मायलेज 40 किमी आणि बजेट फ्रेंडली किमतीची हमी

Feb 16, 2026 | 09:45 PM
Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Supreme Court: “कोणावरही इतका…”; लग्नापूर्वीच्या शारीरिक संबंधांवर सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिप्पणी

Feb 16, 2026 | 09:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM
Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Pune BJP Congress Rada : तपासात जो कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल- पोलीस आयुक्त

Feb 16, 2026 | 05:55 PM
Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Ahilyanagar : भिंगारमध्ये बिबट्याचा थरार! 3 तासांच्या प्रयत्नानंतर वनविभागाकडून पकडण्यात यश

Feb 16, 2026 | 03:33 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.