Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Picnic Day 2025: या दिवसाची सुरुवात कशी झाली? पिकनिकसाठी ‘ही’ ठिकाणे आहेत परिपूर्ण

International Picnic Day 2025: तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी 18 जून रोजी 'आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन' म्हणून साजरा केला जातो? या खास दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Jun 18, 2025 | 08:20 AM
International Picnic Day 2025 Origin and Best Picnic Spots

International Picnic Day 2025 Origin and Best Picnic Spots

Follow Us
Close
Follow Us:

International Picnic Day 2025 : पिकनिक… एक असा शब्द, जो ऐकला की लगेचच मनात उत्साह निर्माण होतो. मित्रमंडळी, निसर्गरम्य ठिकाण, घरून आणलेले स्वादिष्ट पदार्थ आणि आनंदी हास्याचे क्षण यामुळे पिकनिक हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक संस्मरणीय अनुभव ठरतो. पण तुम्हाला माहिती आहे का की दरवर्षी १८ जून रोजी ‘आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन’ म्हणून साजरा केला जातो? या खास दिवशी लोक आपल्या कुटुंबीयांसह किंवा मित्रांबरोबर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवतात.

पिकनिक दिनाची सुरुवात फ्रान्समध्ये झाली. ‘पिकनिक’ हा शब्द मूळतः फ्रेंच आहे. १८०० च्या दशकात फ्रेंच राज्यक्रांतीनंतर लोकांना सार्वजनिक बागांमध्ये जाऊन आपल्या प्रियजनांसोबत जेवण घेण्याची मुभा मिळाली. त्यावेळी लोकांनी हे आनंदाचे क्षण साजरे करणे सुरू केले आणि यालाच पुढे ‘पिकनिक’ असे नाव मिळाले. याच पार्श्वभूमीवर हा दिवस आंतरराष्ट्रीय स्वरूपात स्वीकारण्यात आला.

उन्हाळ्याच्या सुट्ट्या, लांब वीकेंड किंवा ऑफिसमधून मिळालेली विश्रांती – या सगळ्या गोष्टी पिकनिकसाठी योग्य कारणं ठरतात. आल्हाददायक हवामान, हिरवळ आणि जवळचे लोक असेल तर पिकनिकची मजा दुप्पट होते. या आंतरराष्ट्रीय पिकनिक दिनी तुम्हीही काही खास करण्याचा विचार करत असाल, तर भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जी पिकनिकसाठी परिपूर्ण आहेत. खाली दिलेल्या काही निवडक ठिकाणांची माहिती आपल्याला यंदाचा पिकनिक डे संस्मरणीय बनवण्यास मदत करेल.

१. राजदरी धबधबा, उत्तर प्रदेश

वाराणसीपासून अवघ्या ७० किलोमीटर अंतरावर असलेला हा धबधबा अत्यंत रम्य आणि निसर्गसंपन्न आहे. वाहणाऱ्या पाण्याचा आवाज, आजूबाजूची हिरवळ आणि शांतता – हे सर्व मिळून हे ठिकाण पिकनिकसाठी सर्वोत्तम बनवतात.

हे देखील वाचा : Viscacha : किती गोड! दक्षिण अमेरिकेतील आळशी दिसणारा, पण साहसी आणि कणखर असा ‘हा’ गोंडस छोटा प्राणी

२. लोधी गार्डन, दिल्ली

राजधानी दिल्लीमधील खान मार्केटजवळ असलेले लोधी गार्डन हे इतिहास आणि निसर्ग यांचे संगमस्थान आहे. सय्यद मोहम्मद शाह आणि सिकंदर लोधी यांची मकबरे, सुंदर फुले आणि विस्तीर्ण हरित क्षेत्र यामुळे हे ठिकाण दिल्लीकरांचे आवडते पिकनिक स्पॉट बनले आहे.

३. दशम धबधबा, झारखंड

रांचीपासून ४० किलोमीटर अंतरावर असलेला दशम धबधबा शांतता आणि निसर्गप्रेमींना भुरळ घालतो. १४४ फूट उंचीवरून कोसळणारा हा धबधबा ‘कांची’ नदीमुळे तयार झाला असून शहराच्या धावपळीपासून दूर जाऊन वेळ घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे.

credit : social media

४. कुकराईल राखीव वन, लखनऊ

लखनऊ शहराजवळील हे राखीव वन म्हणजे एक नैसर्गिक खजिना आहे. झाडाझुडपांमध्ये हरवलेले ट्रेल्स, विविध प्राणीप्रजाती आणि सायकलिंगचा आनंद घेण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. कुटुंबासोबत येथे वेळ घालवणे ही एक सुखद अनुभूती असते.

पिकनिक डे साजरा करण्याचे उपाय

या दिवशी तुम्ही तुमच्या मित्र-परिवारासोबत निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवू शकता. घरून तुमचे आवडते स्नॅक्स घेऊन जा, काही मैदानी खेळ खेळा, गाणी ऐका किंवा गप्पा मारा, हे सगळे मिळून हा दिवस खास बनवू शकतात.

जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Israel Iran War : महायुद्ध अटळ! ‘इराणने इस्रायलसाठी नरकाचे दरवाजे उघडले’; प्रचंड क्षेपणास्त्र हल्ल्याने तणाव शिगेला

आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन

आंतरराष्ट्रीय पिकनिक दिन म्हणजे केवळ निसर्गात फिरणे नाही, तर तणावमुक्त होण्याची, आपल्या प्रियजनांसोबत आनंद साजरा करण्याची एक संधी आहे. यंदाचा १८ जून एक आठवणींनी भरलेला दिवस ठरावा यासाठी निसर्गरम्य ठिकाणांना भेट देण्याची आणि पिकनिकचा आनंद लुटण्याची तयारी जरूर करा!

Web Title: International picnic day 2025 origin and best picnic spots

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2025 | 08:18 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special story
  • special story
  • travel news

संबंधित बातम्या

Happy International Men’s Day 2025: पुरुषदिनानिमित्त घरातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा ‘या’ खास शुभेच्छा, नातं आनंदाने जाईल बहरून
1

Happy International Men’s Day 2025: पुरुषदिनानिमित्त घरातील वडील, भाऊ आणि पतीला पाठवा ‘या’ खास शुभेच्छा, नातं आनंदाने जाईल बहरून

International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का?  जाणून घ्या यामागील रंजक इतिहास
2

International Men’s Day : ‘हा’ खास दिवस साजरा करण्यासाठी कुणी केला प्रारंभ आणि का? जाणून घ्या यामागील रंजक इतिहास

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक
3

TT आणि TC दोघांमध्ये काय फरक असतो? कोण तुमचे तिकीट चेक करू शकतो? जाणून घ्या फरक

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी
4

खुले झाले जगातील सर्वात मोठे तीर्थस्थळ, हजारो भाविकांची गर्दी; राष्ट्रपती मुर्मू़ंनेही लावली हजेरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.