Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 27 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Sports Day : खेळातून घडणार शांततामय जग! जाणून घ्या खेळांचे महत्त्व आणि ‘या’ दिवसाचा रंजक इतिहास

International Sports Day : आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन दरवर्षी ६ एप्रिल रोजी साजरा केला जातो. खेळ आणि शारीरिक हालचालींच्या माध्यमातून शांतता, सहकार्य आणि सामाजिक विकासाला चालना देणे हा या दिवसाचा उद्देश आहे.

  • By हर्षदा पाटोळे
Updated On: Apr 06, 2026 | 06:30 AM
international sports day april 6 importance significance peace development 2026

international sports day april 6 importance significance peace development 2026

Follow Us
Follow Us:
  • शांततेसाठी क्रीडा
  • संयुक्त राष्ट्रांचा पुढाकार
  • सर्वांगीण विकास

International Sports Day 2026 : खेळ हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. मैदानावरील घाम गाळणे असो किंवा विजयाचा जल्लोष, खेळ आपल्याला बरंच काही शिकवून जातो. आज, ६ एप्रिल रोजी संपूर्ण जग ‘आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन’ (International Sports Day ) साजरा करत आहे. हा दिवस केवळ खेळाडूंसाठी नसून, तो प्रत्येक त्या व्यक्तीसाठी आहे जो खेळाला परिवर्तनाचे साधन मानतो. संयुक्त राष्ट्रांनी हा दिवस केवळ मनोरंजनासाठी नाही, तर जागतिक शांतता, सहकार्य आणि सामाजिक विकासाला चालना देण्यासाठी समर्पित केला आहे.

खेळ: शांतता आणि एकतेचे जागतिक व्यासपीठ

इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत, जिथे युद्धभूमीवरचे शत्रुत्व खेळाच्या मैदानात मैत्रीत बदलले आहे. खेळ वय, लिंग, जात किंवा सामाजिक वर्गाचा कोणताही विचार न करता लोकांना एकत्र आणतो. जेव्हा अकरा खेळाडू मैदानात उतरतात, तेव्हा त्यांच्यासाठी फक्त ‘विजय’ आणि ‘देश’ महत्त्वाचा असतो. हीच भावना समाजात रुजवण्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रीडा दिन महत्त्वाचा ठरतो. संयुक्त राष्ट्र आणि आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने हा दिवस खेळांमधील समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळावी यासाठी घोषित केला आहे.

हे देखील वाचा : US-Iran War: क्षणात घडवून आणेल विध्वंस! अमेरिकेने इराणवर डागले सर्वात घातक ‘स्टेल्थ’ क्षेपणास्त्र; काय आहे ‘JASSM-ER’ ची ताकद?

केवळ फिटनेस नाही, तर जीवनाची शिस्त

खेळ खेळण्यामुळे केवळ शरीर तंदुरुस्त राहते असे नाही, तर ते मानसिक आरोग्यासाठीही उत्तम आहे. खेळामुळे आपल्यात हार स्वीकारण्याची ताकद, जिद्द, चिकाटी आणि टीमवर्क (सहकार्य) यांसारखे गुण विकसित होतात. आजच्या ताणतणावाच्या युगात ‘निरोगी जीवनशैली’ हा मंत्र खेळांमुळेच यशस्वी होऊ शकतो. मुलांमध्ये लहानपणापासूनच खेळांची आवड निर्माण केल्यास, त्यांच्यामध्ये शिस्त आणि एकाग्रता वाढते, ज्याचा फायदा त्यांना आयुष्याच्या प्रत्येक वळणावर होतो.

कसा साजरा केला जातो हा दिवस?

आंतरराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जगभरातील शाळा, महाविद्यालये आणि क्रीडा संघटनांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. कुठे मॅरेथॉन धावली जाते, तर कुठे मैदानी खेळांच्या स्पर्धा रंगतात. अनेक ठिकाणी चर्चासत्रे आयोजित करून खेळांमधील करिअरच्या संधी आणि आरोग्यदायी फायद्यांवर प्रकाश टाकला जातो. काही स्वयंसेवी संस्था या दिवशी गरिबांना क्रीडा साहित्याचे वाटप करून त्यांना खेळांच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करतात. हा दिवस समाजात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी एक मोठी प्रेरणा म्हणून काम करतो.

हे देखील वाचा : RIAC: रशियाची नवी खेळी! भारतासोबतची मैत्री आता केवळ वरवरची नसेल; तद्यांनी मांडला परराष्ट्र धोरणाचा नवा ‘रोडमॅप’

 खेळाला आयुष्याचा भाग बनवा

आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून दररोज किमान अर्धा तास कोणत्याही एका खेळासाठी दिला पाहिजे. मग तो क्रिकेट असो, फुटबॉल असो किंवा अगदी चालणे असो. खेळांमुळे आपण केवळ स्वतःलाच नाही, तर पर्यायाने देशालाही एक सुदृढ पिढी देऊ शकतो. आजच्या या दिवशी संकल्प करा की, आपण स्वतः खेळू आणि इतरांनाही खेळण्यासाठी प्रोत्साहित करू. कारण ‘खेळेल भारत, तरच वाढेल भारत!’

 

Web Title: International sports day april 6 importance significance peace development 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 06, 2026 | 06:30 AM

Topics:  

  • day history
  • navarashtra special
  • navarashtra special story

संबंधित बातम्या

27 October Dinvishesh: आज जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन; जाणून घ्या २७ ऑक्टोबरचा इतिहास..
1

27 October Dinvishesh: आज जागतिक दृश्य-श्राव्य वारसा दिन; जाणून घ्या २७ ऑक्टोबरचा इतिहास..

Skincare : स्किन सीरम इतके महाग का असतात? 20 मिलीच्या बाटलीमागील ‘हे’ रहस्य नक्कीच तुम्हाला माहित असेल
2

Skincare : स्किन सीरम इतके महाग का असतात? 20 मिलीच्या बाटलीमागील ‘हे’ रहस्य नक्कीच तुम्हाला माहित असेल

National Keema Day: आज आहे ‘राष्ट्रीय खिमा दिवस’; जाणून घ्या या पारंपरिक पदार्थाचा इतिहास आणि खाद्यसंस्कृतीतील महत्त्व
3

National Keema Day: आज आहे ‘राष्ट्रीय खिमा दिवस’; जाणून घ्या या पारंपरिक पदार्थाचा इतिहास आणि खाद्यसंस्कृतीतील महत्त्व

Sant Namdev Jayanti: संत नामदेव यांची जयंती जाणून घ्या २६ ऑक्टोबरचा इतिहास..
4

Sant Namdev Jayanti: संत नामदेव यांची जयंती जाणून घ्या २६ ऑक्टोबरचा इतिहास..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.