
Image
Sant Namdev Jayanti: वारकरी संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचे आणि महाराष्ट्रातील अग्रगण्य संत-कवी नामदेव यांची आज जयंती आहे. त्यांनी आपल्या अभंगवाणीच्या व भक्तीच्या माध्यमातून संपूर्ण समाजात समता, बंधुभाव आणि विठ्ठलभक्तीचा संदेश पोहोचवला. महाराष्ट्राबाहेर म्हणजेच पंजाबमध्ये जाऊन शीख बांधवांपर्यंत विठ्ठलभक्तीचा प्रसार करून त्यांनी राष्ट्रीय ऐक्याची मुहूर्तमेढ रोवली. शीख धर्माच्या पवित्र ‘गुरु ग्रंथ साहिब’ या ग्रंथातही संत नामदेवांचे काही अभंग समाविष्ट असून त्यांना आदराचे स्थान देण्यात आले आहे. त्यांची सुप्रसिद्ध अभंग रचना आणि सोप्या भाषेतील ओव्या आजही वारकऱ्यांच्या मुखोदगत व अत्यंत लोकप्रिय आहेत. वारकरी संप्रदायाचा आणि मराठी संस्कृतीचा विस्तार करण्यात संत नामदेवांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आणि ऐतिहासिक ठरले आहे.