क्षणात घडवून आणेल विध्वंस! अमेरिकेने इराणवर डागले आपले सर्वात घातक क्षेपणास्त्र; काय आहे 'JASSM-ER' चे वैशिष्ट्य? ( फोटो सौजन्य : सोशल मीडिया )
US Iran War JASSM-ER missile : मध्य-पूर्वेतील रणधुमाळी (US-Israel Iran War) आता अशा एका वळणावर पोहोचली आहे जिथे जगाला महायुद्धाची भीती वाटू लागली आहे. ५ एप्रिल, २०२६ रोजी मिळालेल्या ताज्या अपडेटनुसार, इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेला संघर्ष आता भीषण वळणावर आला आहे. अमेरिकेने आता आपले सर्वात ‘ब्रह्मास्त्र’ समजले जाणारे JASSM-ER (Joint Air-to-Surface Standoff Missile – Extended Range) हे क्षेपणास्त्र युद्धाच्या मैदानात उतरवले आहे. हे क्षेपणास्त्र शत्रूसाठी यमदूत ठरत असले तरी, यामुळे खुद्द अमेरिकेच्या संरक्षण साठ्यात मोठी घट झाली आहे.
‘JASSM-ER’ हे साधेसुधे क्षेपणास्त्र नसून ते एक ‘स्टेल्थ’ क्रूझ क्षेपणास्त्र आहे. याची सर्वात मोठी ताकद म्हणजे हे शत्रूच्या प्रगत रडार यंत्रणेला चकवा देऊन त्यांच्या क्षेत्रात शिरू शकते. ६०० मैलांपेक्षा जास्त अंतरावरून डागता येणारे हे क्षेपणास्त्र वैमानिकांना शत्रूच्या हवाई संरक्षण क्षेत्राच्या बाहेर ठेवून सुरक्षितपणे हल्ला करण्याची मुभा देते. एका क्षेपणास्त्राची किंमत सुमारे १२.५ कोटी रुपये इतकी अवाढव्य आहे. अमेरिकेने पॅसिफिकमधील आपल्या तळांवरून मोठ्या प्रमाणावर ही क्षेपणास्त्रे मध्य-पूर्वेत हलवली आहेत.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : RIAC: रशियाची नवी खेळी! भारतासोबतची मैत्री आता केवळ वरवरची नसेल; तद्यांनी मांडला परराष्ट्र धोरणाचा नवा ‘रोडमॅप’
युद्धाच्या मैदानात वर्चस्व गाजवत असतानाच अमेरिकेसमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे. इराण युद्ध सुरू झाल्यापासून अवघ्या एका महिन्यात अमेरिकेने तब्बल १,००० हून अधिक JASSM-ER क्षेपणास्त्रे खर्च केली आहेत. युद्धापूर्वी अमेरिकेकडे या क्षेपणास्त्रांचा साठा सुमारे २,३०० होता, जो आता केवळ ४२५ वर येऊन ठेपला आहे. सध्याचा उत्पादनाचा वेग पाहता, हा साठा पुन्हा भरून काढण्यासाठी अमेरिकेला अनेक वर्षे लागू शकतात. ही परिस्थिती चीनसारख्या इतर प्रतिस्पर्ध्यांसोबतच्या संभाव्य युद्धासाठी अमेरिकेला कमकुवत बनवू शकते, अशी भीती लष्करी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
🚨 HEROIC RECAP: How a US F-15E Strike Eagle Was Shot Down Over Iran — And How American Warriors Brought the Crew Home! Flying at Mach 2.8 over southwestern Iran, the powerful F-15E Strike Eagle was suddenly slammed by a Russian-made surface-to-air missile. The proximity fuse… pic.twitter.com/ZULKatr30R — JD Vance News 🇺🇸 (@JDVance_News) April 5, 2026
credit – social media and Twitter
व्हाईट हाऊस आणि पेंटागॉनने इराणची हवाई सुरक्षा पूर्णपणे निकामी केल्याचा दावा केला असला तरी, जमिनीवरील वास्तव काही वेगळेच आहे. इराणने अमेरिकेच्या हवाई शक्तीला चोख प्रत्युत्तर दिले आहे. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, इराणने अमेरिकेचे एक अत्याधुनिक F-15E Strike Eagle लढाऊ विमान पाडले आहे. इतकेच नाही, तर आतापर्यंत १२ हून अधिक महागडी MQ-9 Reaper ड्रोन्स, एक A-10 अटॅक एअरक्राफ्ट आणि दोन रेस्क्यू हेलिकॉप्टर्स इराणी हल्ल्यात नष्ट झाली आहेत. यामुळे अमेरिकेला केवळ आर्थिकच नाही तर लष्करी प्रतिष्ठा गमावण्याचाही मोठा फटका बसला आहे.
जागतिक घडामोडी संबंधित बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : Iran Pakistan Ties : एक ट्विट अन् सगळं शांत! इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानला दिलेला ‘तो’ निरोप नक्की काय होता?
केवळ आक्रमक क्षेपणास्त्रेच नाही, तर इराणच्या शाहेद ड्रोन आणि बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांना हवेतच नष्ट करणाऱ्या पॅट्रियट (Patriot) आणि थाड (THAAD) सारख्या बचावात्मक यंत्रणांचा साठाही वेगाने संपत आहे. इराणकडून होणारा सातत्यपूर्ण गोळीबार अमेरिकेच्या संरक्षण भिंतीला तडे देत आहे. आता प्रश्न असा उरतो की, जर अमेरिकेचा शस्त्रसाठा असाच संपत राहिला, तर इराणविरुद्धचा हा संघर्ष अमेरिका किती काळ ताणून धरू शकेल?
Ans: हे क्षेपणास्त्र ६०० मैलांपेक्षा जास्त अंतरावरून मारा करू शकते आणि एका युनिटची किंमत सुमारे १२.५ कोटी रुपये (१.५ दशलक्ष डॉलर) आहे.
Ans: इराणने अमेरिकेचे अत्याधुनिक F-15E लढाऊ विमान आणि १२ हून अधिक MQ-9 रीपर ड्रोन पाडल्याचा दावा केला आहे.
Ans: ताज्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणावर वापर झाल्यामुळे अमेरिकेकडे आता केवळ ४२५ क्षेपणास्त्रे शिल्लक राहिली आहेत.






