International Sudoku Day know who invented Sudoku Puzzel
International Sudoku Day : आज आंतरराष्ट्रीय सुडोको दिवस आहे. सुडोको जगभर प्रसिद्ध असलेले एक लोकप्रिय पझल आहे. तुम्ही हे पझल वर्तमानपत्रांमध्ये मासिकांमध्ये नक्कीच पाहिले असेल. यामध्ये एक अंकाचे सुडोको सोडवण्याचा अनेकवेळ प्रयत्नही केला असेल. पण तुम्हाला माहित आहे का या सुडोकूचा शोध कोणी आणि कधी लावला होता. काय आहे यामागाची कहाणी.
कोणी लावला सुडोकूचा शोध?
बहुतेक लोकांच्या मते, सुडोकूचा शोध हा जपानमध्ये झाला आहे. पण प्रत्यक्षात तसे नाही, तर सुडोकूचा शोध हा युरोप आणि अमेरिकेत झाला होता. १८ व्या शतकात स्वित्झर्लंडचे गणितज्ञ लिऑनहार्ड ऑइलन यांनी याचा शोध लावला होता. त्यांनी Latin Squares नावाने एक गणिती खेळ तयार केला होता. या खेळात त्यांनी संख्यांना अशा चौकोनी ग्रिडमध्ये ठेवायचे की, त्या एकाच ओळीत किंवा स्तंभात पुन्हा येणार नाहीत, अशी रचना केली होती.
सुरुवातील हा खेळ १९७९ मध्ये अमेरिकेमध्ये दिसून आला. Dell Pencil Puzzzles and Word Games या मासिकामध्ये हा खेळ छापण्यात आला होता. याला Number Place असे नाव देण्यात आले होते.
वाढते रस्ते अपघात ठरतायेत जीवघेणे; यावर नियमित उपाय करणं आहे गरजेचे
या खेळाचे नियम
सुरुवातील हा खेळ लोकांना खूप कठीण वाटला. तसेच हा खेळ खूप कमी लोकांपर्यंत पोहोचला होता, यामुळे हा खेळ तितका लोकप्रिय ठरला नाही.
जपानामध्ये मिळाली खरी ओळख
सुडोकी खरी ओळख ही जपानमध्ये मिळाली. जपानचे प्रकाशक आणि पझल प्रेमी माकी काजी यांना हा खेळ खूप आवडला. यामुळे त्यांनी हा खेळ त्यांच्या Nikoli मासिकामध्ये प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला. या खेळाला त्यांनी Sudoku असे नाव दिले.
हे नाव जपानी शब्दांच्या समूहापासून तयार करण्यात आले. “Sūji wa dokushin ni kagiru” या पासून हे नाव तयार झाले असून याचा अर्थ अंक फक्त एकदाच वापरा असा होतो. यामुळे माकी काजी यांनी हे नाव दिले. त्यांनी याचे नियम देखील सोपो केले आणि हा खेळ जपानमध्ये लोकप्रिय बनत गेला.
यानंतर हा खेळ २००० च्या दशकात ब्रिटन आणि अमेरिकन वृत्तपत्रांनी छापण्यासही सुरुवात केली. यामुळे हा खेळ जगभर लोकांपर्यंत पोहोचला. आजही अनेक लोक विरंगुळा म्हणून हा खेळ खेळतात. पण तुम्हाला माहिती आहे का, हा खेळ केवळ मनोरंजनासाठीच नाही तर मेंदूची क्षमता वाढवण्यासाठी देखील आहे.हा खेळ फोकस, तर्कशक्त तीक्ष्ण करण्यासाठी अत्यंत चांगला आहे. या खेळाचा शोध अमेरिकेत लागला असला तरी जपानचे माकी काजी यांच्यामुळे हा जगभर प्रसिद्ध झाला. यामुळे त्यांना सुडोकूचे गॉड फादर असे म्हटले जाते.
पुतिन-जिनपिंग यांना दुर्घायुषी होण्याची आशा; 150 वर्षे जगण्याची करत आहेत आकांशा