Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Yoga Day 2026 : डिजिटल तणावावर योगाचं प्रभावी औषध; स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा

International Yoga Day 2026 : सध्या डिजिटल युगात, नोटिफिकेशनच्या गजरात मनाला शांततेचा विसर पडत चालला आहे. यावर उपाय म्हणून तज्ज्ञांनी योग हेच उत्तम आणि प्रभावी औषध असल्याचे म्हटले आहे. मानसिक संतुलनासाठी दररोज केवळ ३० मिनिटं योग करा तुम्हाला मन:शांती नक्की मिळेल.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 21, 2026 | 02:04 PM
International Yoga Day 2026

International Yoga Day 2026

Follow Us
Follow Us:
  • डिजिटल तणावावर योगाच प्रभावी औषध
  • स्क्रीन टाईम, फोमो अन् बर्नआउटपासून मिळेल दिलासा
  • दिवसातून फक्त ३० मिनिटं कराव अन्…
International Yoga Day 2026 : सुनयना सोनवणे : ‘लाईक्स’, ‘फॉलोअर्स’ आणि नोटिफिकेशन्सच्या गर्दीत आजची पिढी स्वतःशी संवाद साधायलाच विसरत आहे. स्क्रीनसमोर तासन्तास घालवताना शरीर थकतेच, पण मनही नकळत ताण, चिंता आणि अस्वस्थतेच्या विळख्यात अडकते. अशा डिजिटल धावपळीच्या काळात या योग दिनानिमित्त काही वेळ थांबून स्वतःकडे पाहण्याची आणि मानसिक आरोग्य जपण्याची गरज आहे.

जांभूळ मधाचे आरोग्यदायी गुणधर्म वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध, पुण्यातील शास्त्रज्ञांचे संशोधन प्रकाशित

यंदाची थीम

यंदाच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची ‘योगा फॉर हेल्दी एजिंग’ (निरोगी वृद्धत्वासाठी योग) ही संकल्पना आहे. नियमित योगाभ्यासाद्वारे सर्व वयोगटांतील नागरिकांनी आयुष्यभर शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य जपावे, हा संदेश यानिमित्ताने दिला जात आहे.

डिजिटल तणाव आणि त्याचे परिणाम

ऑनलाइन शिक्षण, घरून काम करण्याची पद्धत, करिअरमधील स्पर्धा आणि सोशल मीडियावरील आभासी तुलना यामुळे तरुणांमध्ये तणावाचे प्रमाण वाढले आहे. ‘फोमो'(फिअर ऑफ मिसिंग आऊट), ऑनलाइन प्रतिमा टिकवून ठेवण्याचे दडपण, झोपेच्या समस्या, कमी झालेली एकाग्रता आणि वाढती चिडचिड यांसारख्या समस्या अधिक प्रकर्षाने जाणवत आहेत. आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांमध्ये दीर्घकाळ संगणकासमोर बसून काम केल्याने मानसिक थकवा आणि ‘बर्नआउट’चे प्रमाणही वाढत आहे.

मानसिक संतुलनासाठी फायदेशीर

अशा परिस्थितीत योग हा केवळ शारीरिक व्यायाम नसून शरीर, मन आणि श्वास यांचा समतोल साधणारी जीवनपद्धती म्हणून महत्त्वाचा ठरत आहे. नियमित योगासने, प्राणायाम आणि ध्यानामुळे तणाव कमी होण्यास, एकाग्रता वाढण्यास आणि मानसिक स्थैर्य प्राप्त होण्यास मदत होते. तज्ज्ञांच्या मते, दिवसातून केवळ २० ते ३० मिनिटांचा योगाभ्यासही मानसिक आरोग्यासाठी लाभदायक ठरू शकतो.

तज्ज्ञांचे मत

मानसशास्त्रज्ञ विश्वजीत भालेराव सांगतात, योग म्हणजे केवळ शरीराची हालचाल नसून शरीर आणि मनाला जोडणारी जीवनपद्धती आहे. आजच्या डिजिटल युगात वाढणारा मानसिक ताण आणि अस्वस्थता कमी करण्यासाठी दररोजचा योगाभ्यास आणि ध्यान आवश्यक ठरत आहे. मानसिक आरोग्य जपण्यासाठी योग ही प्रभावी गुरुकिल्ली आहे.

तसेच योद प्रशिक्षक अपेक्षा कुटवड यांच्या मते, ‘तंत्रज्ञानापासून पूर्णपणे दूर जाणे शक्य नसले तरी त्याच्याशी संतुलित नाते राखणे आवश्यक आहे. ‘डिजिटल डिटॉक्स’ आणि नियमित योगाभ्यास यांचा समन्वय साधल्यास मानसिक तणावावर नियंत्रण मिळवणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे अधिक सोपे होते. योगाला एक दिवसाचा उपक्रम न मानता तो दैनंदिन जीवनाचा भाग बनविण्याची गरज आहे.’

Mental Health Tip : धावपळीच्या आयुष्यात शांतता हवीय? मग ‘हा’ मंत्र वापरुन पहा, मानसिक शांतता मिळेल

Web Title: International yoga day 2026 yoga remedy for digital stress

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Health News
  • Health Tips
  • international yoga day

संबंधित बातम्या

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप
1

Satara Health News: तळीये गावात गॅस्ट्रोची भीषण साथ! ५०० रुग्णांवर उपचार सुरू; ग्रामपंचायतीच्या कारभारावर संताप

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं
2

Health Tips: जेवणानंतर चालल्याने जास्त फॅट बर्न होते? विज्ञान काय सांगतं

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश
3

Health: ‘औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची…’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी दिले ‘हे’ स्पष्ट निर्देश

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच
4

Work From Home: तुम्हालाही घरातून काम करावं वाटतंय का? मानसिक आरोग्यासाठी किती धोकादायक, एकदा वाचाच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.